अँड्रॉइड मोबाईलवर संपर्क कसे import आणि export करावे?...संपूर्ण माहिती

आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे अँड्रॉइड मोबाईल असणे ही एक सामान्य गोष्ट आहे. आज प्रत्येक व्यक्ती अँड्रॉईड मोबाईल वापरत आहे, मग कीपैड मोबाईल असो की अँड्रॉईड मोबाईल, प्रत्येक मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहेत पण जवळपास सर्वच लोकांसाठी कॉन्टॅक्ट नंबर खूप महत्वाचे आहेत.  परंतु कधीकधी खराब फोन झाल्याने, फोन चोरीला गेल्याने, फोन फॉरमॅट केल्याने किंवा फोन चेंज केल्याने आपले संपर्क contact निघून जातात, ज्यामुळे आपल्याला बर्‍याच अडचणी येतात. ही समस्या टाळण्यासाठी आपण Android मोबाईलमध्ये आपले सर्व संपर्क contact सहज import आणि export करू शकतो.


contact import export


import export काय आहे? 

import म्हणजे आयात आणि export म्हणजे निर्यात. 
मित्रानो, एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी डेटा ट्रान्सफर करतो किंवा सेव्ह करतो यालाच import / export असे म्हणतात.

समजा आपण आपल्या मोबाईल मधले संपर्क Contact नंबर जीमेल आईडी वर सेव्ह करतो. तर याला export असे म्हणतात. आणि जर आपण तेच संपर्क Contact नंबर कोणत्याही मोबाईल किंवा सिममध्ये पुन्हा सेव्ह केले तर याला import असे म्हणतात.

import / export या दोन्ही मार्गाने file ला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पाठवले जाते, फरक फक्त इतकाच आहे की Import केलेली फाईल सक्रिय झालेली असते. आणि ती कार्य करण्यास सुरुवात करते, परंतु export केलेली फाईल एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी save केली जाते. आणि ती निष्क्रिय असते. त्यामुळे ती कार्य करण्यास सक्षम नसते.

मित्रांनो आपण कोणत्याही फाईलचा बॅकअप घेण्यासाठी Export हा ऑप्शन वापरतो आणि तोच बॅकअप पुन्हा लागू करण्यासाठी Import या ऑप्शन चा वापर करतो.

Contact import / export कसे करावे?

संपर्क Contact नंबर ला आपल्या मोबाईल मध्ये import / export बर्‍याच प्रकारे करू शकतो.
जसे की,
* आपण जुन्या सिम कार्ड मधले नवीन सिम कार्ड मध्ये संपर्क Contact नंबर import / export करू शकतो. 

* sim1, sim2 किंवा phone storage मधले Contact संपर्क Gmail ID वर import करू शकतो.
यासाठी आपण सर्वप्रथम contact वर या >> उजव्या side च्या 3 डॉट वर क्लिक करा >> imoprt/export contacts >> import


contact import export

* तसेच sim1, sim2 किंवा phone storage मधले संपूर्ण Contact संपर्क Gmail ID वर export / save करू शकतो.
उजव्या side च्या 3 डॉट वर क्लिक करा >> imoprt/export contacts >> export

contact import export

* आणि ज्यांच्याकडे mi Account आहे ते mi account मध्ये contact import /export export करू शकतात.
उजव्या side च्या 3 डॉट वर क्लिक करा >> imoprt/export contacts >> import to Mi account

Contact import to mi account

* Google drive मध्ये पण contact संपर्क save करू शकतो.
उजव्या side च्या 3 डॉट वर क्लिक करा >> imoprt/export contacts >> share contacts >> save to drive सिलेक्ट करा.

contact share

मला आशा आहे की, आपल्याला Contact import / export काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला contact import / export कसे करावे हे समजले असेल. तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी फेसबुक, आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करा.🙏🏻

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने