Samsung ने F सीरिजचा पहिला फोन Galaxy F41 लॉन्च केला आहे. किंमत आणि फिचर्स जाणून घ्या...

Samsung galaxy f41 information in marathi

Samsung ने भारतामध्ये Galaxy F41 हा फोन लाँच केला आहे. हा Samsung च्या नवीन Galaxy F सीरिजचा हा पहिला स्मार्टफोन आहे. या Samsung च्या नव्या फोन मध्ये वाटरड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्ले येतो. तसेच हा फोन तरुणांच्या लक्षात ठेवून तयार करण्यात आलेला आहे.

Samsung Galaxy F41

Samsung Galaxy F41 फिचर्स आणि किंमत

Samsung Galaxy F41 च्या स्मार्टफोन मध्ये 6.4 इंचाचा सुपर अमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले, 64 मेगापिक्सल ट्रिपल प्राइमरी कॅमेरा सेटअप आणि 6000 एमएएच बॅटरी आहे.
Samsung Galaxy F41 हा दोन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध (लॉन्च) करण्यात आला आहे.
भारतात Samsung Galaxy F41 च्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे, तर 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 17,999 रुपयांना विकला जाईल.

Samsung Galaxy F41 colour

16 ऑक्टोबरपासून बिग बिलियन डेज सेल दरम्यान हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विकला जाईल. बिग बिलियन डेज दरम्यान खास ऑफर अंतर्गत या स्मार्टफोन वर 1500 रुपयांची सूट मिळेल.
म्हणजेच...
* (6+64 GB) ₹15499
* (6+128 GB) ₹16499
हा फोन फ्यूजन ग्रीन, ब्लू आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. 

Samsung Galaxy F41 specifications

Samsung Galaxy F41 मध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी + सुपर अमोलेड इन्फिनिटी-यू डिस्प्ले आहे.  यात एक्झिनोस 9611 प्रोसेसर, 4 जीबी आणि 6 जीबी रॅम आहे आणि 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज आहे. तसेच मायक्रो-एसडी कार्ड टाकून याचे स्टोरेज 512 GB पर्यंत वाढविले जाऊ शकते.

Samsung Galaxy F41 मध्ये ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप आहे.  यात 64 मेगापिक्सेल प्राइमरी सेन्सरसह, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड-एंगल लेंस आणि 5 मेगापिक्सल लाइव फोकस सपोर्ट सेन्सर समाविष्ट आहेत. यात 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग, लाइपरलैप्स, स्लो मोशन सारख्या कॅमेरा मोड आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

सॅमसंगच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 6,000 एमएएच ची दमदार बॅटरी आहे, जी 15 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  फोन अँड्रॉइड 10 वर कार्य करतो.  फोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.  कनेक्टिव्हिटीसाठी, Galaxy F41 मध्ये 4 जी एलटीई, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट चार्जिंगसाठी देण्यात आले आहे. एकदा फोन चार्जिंग केला तर 21 तास ब्राउझिंग किंवा 48 तासांपर्यंत व्हॉईस कॉलिंग बॅकअप प्रदान करू शकतो असा कंपनीचा दावा आहे.

Samsung Galaxy F41 या फोन च्या किंमतीनुसार हा फोन मार्केट मध्ये Realme 7 आणि Redmi Note 9 Pro Max सारख्या स्मार्टफोन ला टक्कर देऊ शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने