मोबाईल पाण्यात पडल्यावर काय करावे? हे उपाय करा.

मोबाईल पाण्यात पडल्यावर काय करावे? मित्रांनो आजच्या काळात मोबाईल हि टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता मोबाईल कंपनीने मोबाईल हे वॉटर प्रूफ बनवले आहेत. जे पाण्यात पडल्यानंतरही खराब होत नाहीत. या फोन चि डिझाईन च या प्रकारे केली आहे की, हे फोन पाण्यात जरी पडले किंवा भिजले तरी या फोन च्या आत मध्ये पाणी जात नाही. 

पण आपल्यालापैकी बर्‍याच लोकांकडे वॉटर प्रूफ हे मोबाईल नाहीत. त्यामुळे अचानक किंवा आपल्या निष्काळजीपणामुळे जर आपला मोबाईल फोन पाण्यात पडला तर आपण हे उपाय नक्की केले पाहिजे ज्यामुळे आपला पाण्यात पडलेला मोबाईल खराब होण्यापासून वाचला जाईल, फोन खराब हि होणार नाही आणि आपल्या फोन मध्ये असलेला आपला महत्वाचा डाटा पण डिलीट होणार नाही. म्हणुन आजच्या पोस्टमधे मोबाईल पाण्यात पडल्यावर काय करायचे? पाण्यात पडलेला मोबाईल कसा दुरुस्त करावा? कोणते उपाय केले पाहिजेत. याबद्दल पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया.


मोबाईल पाण्यात पडल्यावर काय करावे?


मोबाईल पाण्यात पडल्यावर काय करावे?

मोबाईल पाण्यात पडल्यास हे उपाय करा...

▪ मोबाइल पाण्यात पडला असेल किंवा भिजला असेल तर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मोबाइल पाण्यातून बाहेर काढा. बाहेर काढल्यानंतर ताबडतोब मोबाईल बंद करा, जर आपल्या मोबाईल फोन चि बॅटरी निघत असेल तर बॅटरी काडून ठेवा. आणि आपल्या मोबाईल चि बॅटरी निघत नसेल तर मोबाईल बंद करा. कारण असं केल्याने पाण्यामुळे मोबाईल मध्ये शॉट सर्किट होणार नाही.

▪ मोबाईल फोन मध्ये असलेले सिम कार्ड आणि मेमोरी कार्ड काढून टाका.

▪ मोबाईल ला कपड्याने पुसून घ्या.

▪ अर्धा ते एक तास मोबाईल कोरडा होण्यासाठी ठेवा. (जेथे थोडीफार हवा येते किंवा फॅन लाऊन फॅन खाली ठेवा)

▪ यानंतर मोबाइल फोन ला सुमारे 22 ते 24 तासांसाठी तांदळाच्या बंद पॅकेटमध्ये किंवा बॉक्समध्ये ठेवा. तांदूळ हा ओलावा वेगाने शोषून घेण्याचे कार्य करतो.

▪ 24 तास झाल्यानंतर मोबाईल तांदळाच्या पॅकेट मधून बाहेर काढा. मोबाईल ला चालू करा. मोबाईल चालू होत नसेल तर मोबाईल चार्जिंग ला लावा आणि अर्ध्या तासानंतर मोबाईल चालू करा.

हे उपाय करूनही आपला मोबाईल फोन दुरुस्त होत नसेल तर आपण सर्विस सेंटर ला भेट द्या.


मोबाइल पाण्यात पडला किंवा भिजला असेल तर या चुका अजिबात करू नका.


▪ मोबाईल पाण्यात पडला असेल तर मोबाईल अजिबात चालू करू नये.

▪ मोबाईल चे कोणतेही बटन प्रेस करू नये.

▪ मोबाईल कोरडा करण्यासाठी हेअर ड्रायर वापरू नये.

▪ फोन पाण्यात पडला असेल किंवा भिजला असेल तर अजिबात फोन चार्जिंग ला लावू नका. फोन चार्जिंग ला लावला तर शॉट सर्किट होऊ शकतो.

▪ फोन पूर्णपणे कोरडे होईपर्यंत हेडफोन जॅक आणि यूएसबी पोर्ट वापरू नका.


➡️ मोबाईल हँग होत आहे...या टिप्स वापरा! मोबाईल कधीही हँग होणार नाही.  


मला आशा आहे की, आपल्याला पाण्यात पडलेला मोबाईल कसा दुरुस्त करावा? याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला मोबाईल पाण्यात पडल्यास कोणते उपाय केले पाहिजे? हे समजलेच असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना किंवा फेसबुक आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने