मोबाईल हँग होत आहे...या टिप्स वापरा! मोबाईल कधीही हँग होणार नाही.

Mobile hang problem solution in marathi मित्रांनो दिवसेंदिवस स्मार्टफोन हा नवीन प्रोसेसर आणि फिचर्स सोबत लाँच होत आहे. आपण सर्वजण स्मार्टफोन वापरतो परंतु आपल्याला ही कधीतरी मोबाईल हँगच्या समस्येचा सामना करावा लागला असेल किंवा आपण आपला मोबाईल हँग पण झालेला पाहिला असेल. आपला मोबाईल हँग होत आहे काळजी करू नका कारण आजच्या पोस्टमधे आपण मोबाईल हँग कशामुळे होतो? मोबाईल हँग होण्याचे कारण काय आहेत? मोबाईल हँग झाल्यावर काय करावे? याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया...


मोबाईल हँग होत आहे.

मोबाईल हँग होत आहे...या टिप्स वापरा! मोबाईल कधीही हँग होणार नाही.  


तसे पाहिले तर स्मार्टफोन हँग होणे हि सामान्य गोष्ट आहे. जेव्हा आपण एखादा नवीन स्मार्टफोन विकत घेतो तेव्हा तो अजिबात हँग होत नाही. परंतु जस-जसे आपण त्या स्मार्टफोन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अॅप्लिकेशन इंस्टॉल करून वापरतो तेव्हा आपला स्मार्टफोन हळू हळू कार्य करतो आणि मोबाइल फोन हँग होऊ लागतो.

मोबाईल हँग होण्याचे कारण

सर्वप्रथम हे माहीत करून घेऊया की मोबाईल हँग कशामुळे होतो? तर मोबाईल हँग होण्याचे अनेक कारणे आहेत. महत्त्वाचे कारण म्हणजे फोन मध्ये ओवरलोड होणे.


अनेक मोबाईल अ‍ॅप्स एकाच वेळी चालविल्याने म्हणजे मल्टीटास्किंग केल्याने मोबाईल हँग होऊ शकतो.


स्मार्टफोनचे इंटरनल स्टोरेज भरल्याने देखील बरेच स्मार्टफोन हळू हळू कार्य करतात आणि हँग होतात.


कॅशे फाईल्स न हटविण्यामुळे देखील मोबाईल स्लो आणि हँग होऊ शकतो.


कमी मेमरी आणि कमी रॅम असलेल्या मोबाईल मध्ये हैवी अ‍ॅप्स वापरल्याने मोबाइल हँग होऊ शकतो.


मोबाइल मध्ये व्हायरस आल्याने देखील मोबाइल हँग होऊ शकतो.


तर ही मोबाईल हँग होण्याची महत्त्वाची कारणे होती...


मोबाईल हँग झाल्यावर काय करावे? Mobile hang problem solution in marathi


आपण आपल्या मोबाईल चि इंटरनल स्टोरेज  खाली ठेवा. कारण जेव्हा आपल्या फोन चि इंटरनल स्टोरेज फूल असते तेव्हा फोनच्या कार्य क्षमतेवर परिणाम होतो आणि डाटा रीड करण्यास समस्या येते. यामुळे मोबाईल हँग होतो. म्हणुन मोबाईल चि इंटरनल स्टोरेज नेहमी 25% खाली ठेवा. इंटरनल स्टोरेज भरलेले असेल तर त्यामधला डाटा मेमोरी किंवा पेन ड्राईव्ह मध्ये टाका. यामुळे आपल्या फोन चि इंटरनल स्टोरेज रिकामी राहील.


फोन सिस्टम आणि अॅप्स नेहमी अपडेट करत रहावे. कारण फोन चि सिस्टम अपडेट केल्याने देखील फोन हँग होणे थांबते. आपण जर फोन चि सिस्टम अपडेट नाही केली तर फोन हळू हळू कार्य करायला लागेल आणि हँग पण होईल. यामुळे नेहमी फोन सिस्टम आणि अॅप्स अपडेट करत रहावे.


आपल्या मोबाईलमध्ये असा बराच नको असलेला डेटा असतो, ज्याचा मोबाईलमध्ये काहीच उपयोग नाही, ज्यामुळे आपल्या मोबाईलचे इंटरनल स्टोरेज वाढले आहे. जेव्हा आपण आपल्या मोबाईल मध्ये वेबसाइट किंवा अॅप्स उघडतो तेव्हा त्यांची कॅशे फाईल्स आणि कुकीज इंटरनल स्टोरेज मध्ये तयार होतात. यामुळे पण मोबाईल हँग होतो म्हणुन अनावश्यक डेटा नेहमी डिलीट करा.


आपल्या मोबाईल मध्ये असे अॅप्स आहेत ज्यांचा वापर आपण खूप कमी करतो. तर त्या अॅप्स ला फोर्स स्टॉप (force stop) केले पाहिजे. कारण हे अ‍ॅप्स बॅकग्राउंडमध्ये चालतात ज्यामुळे रॅमचा अधिक वापर होतो. यामुळे, बर्‍याच वेळा आपला मोबाइल हँग होतो.


आपला फोन हँग होत असेल तर आपण फोन ला रीस्टार्ट / रीबूट (Restart / Reboot) केले पाहिजे कारण असं केल्याने बॅकग्राउंडमध्ये चालू असलेले सर्व अॅप्स बंद होतात आणि रॅम साफ होते. जेव्हा जेव्हा आपल्याला फोन च्या हँगिंगची समस्या उद्भवते तेव्हा फोन रीस्टार्ट / रीबूट केला पाहिजे.


मित्रांनो वरच्या सर्व टिप्स वापरून हि आपल्या फोन हँग ची समस्या दूर होत नसेल तर आपल्याकडे शेवटचे एक सोल्यूशन आहे ते म्हणजे फोन ला रीसेट (Reset) करणे. रीसेट केल्याने आपल्या फोन मधला सर्व डाटा डिलीट होतो. त्यामुळे फोन चे सर्व बॅकअप घेऊनच फोन ला रीसेट करा. रीसेट झाल्यानंतर आपला फोन नवीन फोन प्रमाणे कार्य करेल आणि फोन हँग पण होणार नाही.


तर या प्रकारे आपण आपल्या फोन ला हँग होण्यापासून थांबवू शकतो.


मला आशा आहे की, आपल्याला आपला मोबाईल हँग होत आहे त्यामुळे आपल्या मोबाईल ला हँग होण्यापासून कसे थांबवावे? याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना किंवा फेसबुक आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने