गूगल ड्राईव्ह म्हणजे काय? कसे वापरावे? Google drive information in marathi

Google drive information in marathi

मित्रांनो आपल्या फोन मध्ये असे अनेक अॅप आहेत, असेच एक महत्त्वाचे अॅप आहे ते म्हणजे गूगल ड्राइव्ह. हे अ‍ॅप आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तर आजच्या या पोस्ट मध्ये गूगल ड्राइव्ह म्हणजे काय? गूगल ड्राईव्ह कसे वापरावे? Google drive information in marathi गूगल ड्राइव्हवर खाते तयार करण्यापासून ते कसे वापरावे याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.


गूगल ड्राईव्ह म्हणजे काय? कसे वापरावे? Google drive information in marathi

गूगल ड्राईव्ह म्हणजे काय? What is Google drive in marathi? 


 गूगल ड्राइव्ह ही गूगल द्वारे निर्मित एक फाईल स्टोरेज सेवा आहे, ज्याद्वारे आपण त्यात कोणत्याही प्रकारची फाईल स्टोर करू शकतो! गूगल ड्राइव्ह एक विनामूल्य क्लाऊड-आधारित स्टोरेज सेवा आहे जी वापरकर्त्यांना फाईल्स ऑनलाइन स्टोर अणि access करण्यास मदत करते.


आपला स्मार्टफोन असो की संगणक असो सर्व डिव्हाइसमध्ये स्टोरेज मर्यादा आहे, जेव्हा जेव्हा आपला डेटा वाढू लागतो तेव्हा तेव्हा आपल्याला Storage space चि कमतरता जाणवते, तेव्हा आपल्याला गुगल ड्राईव्हच्या क्लाऊड स्टोरेजमुळे फ्री space मिळतो. त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही.


 कारण या सेवेद्वारे आपण आपल्या डिव्हाइसमधील ऑडिओ, व्हिडिओ,फोटो किंवा कोणत्याही प्रकारची डिजिटल फाइल किंवा फोल्डर सहजपणे ऑनलाईन स्टोर करू शकतो. आपण मोबाइल, टॅब्लेट आणि संगणकांसह सर्व डिव्हाइसमध्ये गूगल ड्राइव्ह ही सेवा वापरू शकतो. 


आपला फोन हरवला असेल किंवा खराब झाला असेल, तरीही आपण गूगल ड्राइव्ह वापरल्यास आपला डेटा आपल्या गूगल ड्राइव्हमध्ये नेहमीच सुरक्षित राहतो त्यामुळे आपला डाटा loss होण्याची भीती राहणार नाही आणि आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असलो तरीही आपण त्याचा वापर चांगल्याप्रकारे करू शकतो...फक्त आपल्याला Gmail ने login करायचे आहे. 


➡️हॅलो! गुगल असिस्टंट काय आहे? कसे वापरावे?

➡️गूगल मॅप काय आहे? कसे वापरावे? 

➡️GPS म्हणजे काय हे कशासाठी वापरले जाते?


गूगल ड्राइव्ह मध्ये आपल्याला फ्री 15GB पर्यंत स्टोरेज मिळते. ज्यामधे आपण खूप काही स्टोर करू शकतो. आणि आपल्याला स्टोरेज वाढवायचे असले तरीही आपण ते वाढवू शकतो. त्यासाठी आपल्याला काही रक्कम Pay करावी लागेल. (म्हणजेच 100GB साठी ₹130 एका महिन्यासाठी - 200GB साठी ₹210 एका महिन्यासाठी) ज्या लोकांना खूप मोठ मोठ्या files स्टोर करून ठेवायच्या आहेत. त्या लोकांसाठी हे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो आपण आपला डाटा गूगल ड्राइव्ह मध्ये स्टोर केल्याच्या नंतर आपला डाटा नेहमी सुरक्षित राहतो. 


गूगल ड्राइव्हची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला गूगल ड्राइव्ह डाउनलोड करण्याची देखील आवश्यकता नाही कारण ती प्रत्येक Android फोनवर आधीपासूनच install केलेली आहे. आणि install नसेल तर ते आपण प्ले स्टोर मधून सहजपणे install करू शकतो... 


गूगल ड्राइव्हवर खाते कसे तयार करावे? How to create account on Google Drive in marathi? 


सर्वप्रथम आपल्याकडे एक Gmail असणे गरजेचे आहे आणि नसेल तर create account करून घ्या. >> नंतर Google drive app किंवा drive.google.com वर या. >> Gmail टाकून sign in करा. 

आता आपले Drive खाते पूर्णपणे तयार झाले आहे. 


गूगल ड्राईव्ह कसे वापरावे? How to use Google Drive in marathi? 


Google Drive उघडा. +icon वर क्लिक करा. 

Google Drive काय आहे आणि ते कसे वापरावे?

*ईथे आपण आपल्याला हवे तसे folder तयार करू शकतो. 


* ईथे आपण आपल्या डिव्हाइसमधील ऑडिओ, व्हिडिओ,फोटो किंवा कोणत्याही प्रकारची डिजिटल फाइल किंवा फोल्डर सहजपणे upload करू शकतो. एखादा फोटो अपलोड केल्या नंतर त्या फोटो ला शेअर, send, डाऊनलोड, print, add to home screen, या प्रकारे use करू शकतो. तसेच त्या फोटो चि लिंक पण कॉपी करू शकतो. 

Google drive

* ईथे आपण document स्कॅन करू शकतो. 


* Google Docs एक विनामूल्य वेब-आधारित सेवा(app) आहे. ज्यामध्ये दस्तऐवज आणि स्प्रेडशीट ऑनलाइन तयार केल्या जातात ज्याद्वारे आपण त्यांना सुधारू आणि Save करू शकतो. Google Docs मध्ये बरेच users फाईल किंवा शीटवर एकत्र काम करू शकतात. Google docs जास्त प्रमाणात प्रेजेंटेशन सॉफ्टवेयर आणि वर्ड प्रोसेसर प्रोग्राम या कामांसाठी वापरला जातो. 


* Google sheets एक वेब-आधारित program आहे. यामधे आपण एमएस एक्सेल सारख्या शीट्स बनवू शकतो. आणि तसेच शीट्स एडिट, update आणि शेअर सुद्धा करू शकतो. Google sheets ला मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल चाच प्रकार मानला जातो कारण Google sheets ची वैशिष्ट्ये एमएस एक्सेलप्रमाणेच आहेत. 


* Google sheets एक विनामूल्य वेब-आधारित प्रेजेंटेशन program आहे. यामधे आपल्याला ऑनलाईन स्लाइडचे संपादन करणे आणि तयार करणे, नोट्स तयार करणे, ग्रुप चर्चा करणे, स्लाइड्स अपडेट करणे इत्यादी कामे सहज करता येतात. ऑनलाइन बिजनेस, ब्लॉगर्स, फ्री लांसर्स, कंटेट राइटर्स हे users Google slides चा जास्त प्रमाणात वापर करतात. 


वाचा ➡️ इंटरनेट म्हणजे काय? इंटरनेट चे फायदे व तोटे


मला आशा आहे की, आपल्याला गूगल ड्राईव्ह म्हणजे काय? गूगल ड्राईव्ह कसे वापरावे? Google drive information in marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी फेसबुक आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करा.🙏🏻


1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने