मोबाईल हरवला तर काय करावे? मोबाईल हरवला कसा शोधायचा?

How to find a lost mobile in marathi?  मित्रांनो आजच्या काळात मोबाईल प्रत्येक व्यक्तींकडे आहे. मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. अशा परिस्थितीत जर आपला मोबाईल चोरीला गेला तर आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो. कारण आपला महत्त्वाचा डाटा मोबाईलमध्ये सेव्ह असतो. आपला मोबाईल हरवला आहे काळजी करू नका कारण आजच्या पोस्टमधे आपला मोबाईल हरवला तर काय करावे? मोबाईल हरवला कसा शोधायचा? आपला चोरीला गेलेला मोबाईल परत कशाप्रकारे मिळवू किंवा शोधू शकतो. याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट पूर्णपणे वाचा. जेणेकरून आपला मोबाईल आपल्याला सहज मिळू शकेल.


मोबाईल हरवला तर काय करावे? मोबाईल हरवला कसा शोधायचा?

मोबाईल हरवला तर काय करावे? मोबाईल हरवला कसा शोधायचा?


मोबाईल चोरीला गेला तर आपण हे उपाय नक्की करावे?

आपला हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी आपल्याला एक application डाऊनलोड करायचे आहे ज्याचे नाव आहे Google Find My Device. तर हे application आपल्या मित्राच्या किंवा आपल्या घरच्या फोन मध्ये install करायचे आहे. Application install झाल्यानंतर आपला जो मोबाईल हरवला त्या मध्ये जी Gmail ID लॉगीन होती त्याच जीमेल I'd ने हे application लॉगीन करायचे आहे.

मोबाईल ट्रॅक कसा करावा?


Google Find My Device

या application च्या मदतीने आपण आपल्या हरवलेल्या मोबाईल चे लोकेशन चेक करु शकतो. पण त्यासाठी आपला हरवलेला मोबाईल चालू पाहिजे, त्याचे GPS चालू पाहिजे आणि त्या मोबाईल चे इंटरनेट कनेक्शन पण चालू पाहिजे. या application मध्ये आपल्याला तीन पर्याय मिळतात. रिंग, लॉक आणि erase या पर्यायाने आपण आपला हरवलेला मोबाईल कंट्रोल करू शकतो. 


1.Ring - जर आपल्याला वाटत आहे की आपला मोबाईल चोरीला गेला आहे तर आपण अजिबात Ring चा वापर करू नका. कारण ring चा वापर केला तर आपला मोबाईल आवाज करेल यामुळे समोरच्याला माहीत होईल होईल की आपण फोन ला ट्रैक करत आहोत. आणि जर घरातच कुठे आपला मोबाईल हरवला असेल तर या पर्यायाचा वापर आपण करू शकतो. 

2.lock - जर आपल्याला आपला फोन सापडत नाही असे वाटत असेल तर या lock च्या पर्यायाने आपण आपला फोन lock करू शकतो. येथे आपण एखादा मेसेजही सेट करू शकतो ज्यात एखाद्याला सापडल्यास हा मोबाईल हरवला आहे असे लिहू शकतो. किंवा या क्रमांकावर संपर्क साधा. येथे आपण बक्षीस देऊ असे ही लिहू शकतो. कारण जर एखाद्याला मोबाइल मिळाला असेल तर तो बक्षीसच्या लोभाने आपल्याशी संपर्क साधू शकेल.

3. Erase - आपल्या मोबाईल मध्ये आपली बरीच पर्सनल माहिती आणि फाईल असतात. किंवा आपले महत्वाचे डॉक्युमेंट असतात. मोबाईल मिळणारा जर आपली महत्त्वाची माहिती use करू शकतो, असे आपल्याला वाटत असेल तर या erase पर्यायाने आपण आपल्या मोबाईल मधला डाटा पूर्णपणे डिलीट करू शकतो. 


IMEI नंबरवरुण मोबाईल कसा शोधावा? 


मित्रांनो जर शोधूनही आपला मोबाईल सापडला नसेल तर आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन FIR नोंदवावी लागेल. FIR नोंदविण्यासाठी आपल्याला कडे हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या मोबाईल चा IMEI नंबर असणे आवश्यक आहे. कारण IMEI नंबरवरुन पोलीस आपला हरवलेला किंवा चोरी झालेला मोबाईल ट्रॅक करत असतात.


IMEI नंबर कसा माहीत करावा? 

सर्व मोबाईल मध्ये IMEI हा नंबर स्पेशल असतो. हा नंबर आपल्या फोन च्या बॉक्स वर असतो. आपल्या कडे फोन चा बॉक्स नसेल तर आपल्याला आपल्या फोन मध्ये *#06# हा नंबर डायल करायचा आहे. डायल केल्याच्यानंतर आपल्याला IMEI नंबर मिळतो. किंवा हा IMEI नंबर फोन च्या बिल वर पण असतो. 


मोबाईल चोरीला गेला तर काय करावे? सरकारची नवी संस्था CEIR करेल आपल्याला मदत


हरवलेला किंवा चोरी गेलेला मोबाईल शोधण्यासाठी सरकारने एक नविन पर्याय CEIR (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) हि संस्था जवळ-जवळ संपूर्ण राज्यात हळूहळू उपलब्ध करून दिली जात आहे. या सरकारच्या CEIR या नव्या पर्यायामुळे मोबाईलचे इंटरनेट किंव कोणत्याही लॉगिन शिवाय हि संस्था फक्त IMEI नंबरव्दारे मोबाईल शोधू शकते.

या नव्या CEIR च्या मदतीने असा शोधा तुमचा मोबाईल

सर्वप्रथम तुमच्या हरवलेल्या किंवा चोरी गेलेल्या मोबाईलची FIR हि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन नोंदवा. FIR च्या दोन प्रत काढून घ्या.

नंतर टेलिफोन ऑपरेटरकडून एक नविन सिम घ्या.

नंतर सरकारच्या CEIR या वेबसाईट ला उघडा.

CLICK HERE ➡️ https://ceir.gov.in


वेबसाईट उघडल्यानंतर सर्वप्रथम तुमच्या हरवलेल्या किंवा किंवा चोरीला गेलेला मोबाईलचा IMEI नंबर ब्लॉक करा. कारण असं केल्याने तुमचा मोबाईल कोणीही वापरु शकणार नाही.

लक्षात ठेवा: IMEI नंबर ब्लॉक करण्यासाठी तुमच्याकडे हरवलेल्या मोबाईल चा IMEI नंबर, फोन नंबर, मोबाईल कंपनीचे नाव, मोबाईल हरवलेले ठिकाण, पत्ता, तुमचे ओळखपत्र, मोबाईल चे बिल आणी FIR ची एक प्रत इत्यादी जवळ असणे आवश्यक आहे.

वेबसाईट उघडा आणि त्यात हि माहिती टाका. माहिती टाकल्यानंतर OTP conformation सबमिट करा.

आता तुम्हाला एक Request ID मिळेल. या ID मुळे तुम्हाला  मोबाईल ट्रॅकिंग बद्दल सर्व माहिती मिळेल.

मोबाईल सापडल्यानंतर तो मोबाईल  वापरण्यासाठी  ब्लॉक केलेला IMEI नंबर हा unblock करावा लागेल. IMEI नंबर unblock करण्यासाठी तुम्हाला परत CEIR च्या वेबसाईट वर जावे लागेल. Unblock found Mobile हा ऑप्शन निवडावा लागेल आणि येथे तुम्हाला जी Request ID मिळाली आहे ती येथे टाका आणि मोबाईल नंबर टाका. अश्याने तुमच्या मोबाईलचा IMEI नंबर unblock होईल. IMEI unblock झाल्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल वापरु शकाल.


या नंबर वर कॉल केल्याने आपला मोबाईल परत मिळू शकतो. 


मोबाइल चोरीच्या तक्रारीसाठी केंद्र सरकारने 14422 हा हेल्पलाईन नंबर तयार केला आहे आहे, ज्यावर आपण आता कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकतो. ज्यामुळे आपला मोबाईल आपल्याला परत मिळू शकतो.


मला आशा आहे की, आपल्याला मोबाईल हरवला तर काय करावे? मोबाईल हरवला कसा शोधायचा? याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला IMEI नंबरवरुण मोबाईल कसा शोधावा? हे समजलेच असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना किंवा फेसबुक, आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.


आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने