व्हॉट्सअ‍ॅप चे नवीन फिचर, फालतू मेसेज कधीही परेशान करणार नाहीत Whatsapp new features in marathi

Whatsapp new features in marathi मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की, व्हॉट्सअ‍ॅप हे जगाचे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप्स आहे. अश्यातच व्हॉट्सअ‍ॅप ने एक नवीन फिचर लाँच केले आहे. हे फिचर ऐंड्रॉयड आणि iOS या दोन्ही वापरकर्त्यांसाठी रोलआउट केले आहे. त्यामुळे दोघेही या फिचर ला वापरू शकतात. या नवीन फिचर च्या साहाय्याने जे आपल्याकडे फालतू व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत त्या सर्वांचे नोटिफिकेशन कायमचे म्यूट करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या नवीन अपडेट बद्दल... 

Whatsapp new features in marathi


व्हॉट्सअ‍ॅप चे नवीन फिचर, फालतू मेसेज कधीही परेशान करणार नाहीत Whatsapp new features in marathi

WhatsApp Always Mute Feature 

आजच्या काळात पाहिले तर जवळजवळ प्रत्येक वापरकर्त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर असे बरेच ग्रुप असतात, ज्यामधे आपली इच्छा नसतानाही आपल्याला अॅड केलेले असते. आपल्याला हे ग्रुप सोडून पण जाता येत नाही कारण हे ग्रुप आपल्या परिवारातील, मित्र सर्कल, किंवा अधिकृत ग्रुप असू शकतात. ज्यावर येणारे masseges आपल्या काहीही कामाचे नाही किंवा त्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही. असे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आता आपण कायमचे म्यूट करू शकणार आहोत. म्हणजेच यामुळे ग्रुप येणारे फालतू मेसेज चे नोटिफिकेशन आपल्याला परेशान करणार नाही.


व्हॉट्सअ‍ॅप ने त्यांच्या ट्विटर अकाऊंट वरुन या Always फिचर बद्दल सांगितले आहे. जर आपण व्हॉट्सअॅप ग्रुपच्या म्युट नोटिफिकेशन सेटिंग्जवर गेलात तर येथे आपल्याला तीन पर्याय दिसतील. पहिला 8 Hours, दुसरा 1 week, तिसरा 1 year. म्हणजेच आपण येथे जास्तीत जास्त फक्त एका वर्षासाठीच ग्रुप नोटिफिकेशन म्यूट करू शकत होतो.


Whatsapp notification

पण आता आपण या 1 वर्षाएवजी always निवडू शकतो. always निवडल्या नंतर आपल्याला कधीही ग्रुप नोटिफिकेशन येणार नाही. म्हणजेच आपण याला कायमचे बंद करू शकणार आहोत.


whatsapp Always

व्हॉट्सअ‍ॅप बर्‍याच दिवसापासून आपल्या बीटा व्हर्जनमध्ये या फिचरची टेस्टिंग करत आहे आणि आता हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही अ‍ॅप्सवर सर्व वापरकर्त्यांसाठी आणण्यात आले आहे. जर आतापर्यंत आपल्याला Always हे ऑप्शन म्यूट सेटिंग्ज मध्ये दिसत नसेल तर सर्वप्रथम आपल्याला आपले व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करावे लागेल. यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने त्याच्या सर्व वापरकर्त्यांसाठी एडवांस सर्च हे ऑप्शन आणले आहे. याच्या मदतीने आपण फोटो, विडियो, लिंक, GIFs, ऑडिओ आणि डॉक्युमेंट फिल्टर करून शोधू शकतो.


Whatsapp New Search



जर मित्रानो आपल्यालाही एखाद्या ग्रुप चे नोटिफिकेशन म्यूट करायचे असेल तर सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप उघडा. >> नंतर ज्या ग्रुप चे नोटिफिकेशन म्यूट करायचे आहे त्या ग्रुप वर या >> ग्रुप वर
आल्यानंतर उजव्या साइड ला वरच्या तीन डॉट वर क्लिक करा >> Mute notifications वर क्लिक करा >> Always निवडा. 

Always निवडल्या नंतर ग्रुप चे नोटिफिकेशन कायमचे बंद होतील.


मला आशा आहे की, आपल्याला Whatsapp Always feature काय आहे? Whatsapp new features in marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला whatsapp Always feature कशाप्रकारे काम करते? हे समजलेच असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना किंवा फेसबुक, आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.


आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻 



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने