Hotspot काय आहे? कसे वापरावे? Hotspot information in marathi

Hotspot information in marathi 

कदाचित मित्रांनो आपल्याला माहीत असेल की, Hotspot म्हणजे काय? कारण या काळामध्ये जवळजवळ सर्वच स्मार्टफोन मध्ये Hotspot हॉटस्पॉट उपलब्ध आहे. एखाद्या वेळेस आपला इंटरनेट डाटा संपला असेल, तर त्याचवेळेस आपल्याला महत्वाचा मेल करायचा असेल किंवा असे काही महत्त्वाचे काम आहे त्या कामाला फक्त इंटरनेट चि आवश्यकता आहे. तर अश्या परिस्थितीत आपण hotspot च्या मदतीने इंटरनेट कनेक्शन वापरू शकतो.


Hotspot काय आहे? What is Hotspot in marathi

आज या काळात कोट्यावधी लोक त्यांच्या इंटरनेट गरजा पूर्ण करण्यासाठी दररोज Hotspot वापरतात. हा hotspot आपल्या मोबाईल मधला असू शकतो. किंवा अश्या बर्‍याच सार्वजनिक ठिकाणी hotspot उपलब्ध केलेला आहे. जसे की, रेल्वे स्टेशन, विमानतळ, हॉटेल्स, पर्यटन स्थळ, मंदिर ईत्यादी... बरेच सार्वजनिक हॉटस्पॉट्स विनामूल्य वायरलेस प्रवेश प्रदान करतात, तर काहींना फी द्यावी लागते. एका सर्वेक्षणानुसार, जगभरात 10 लाखाहून अधिक Hotspot उपलब्ध आहेत. तर आजच्या पोस्टमधे आपण Hotspot काय आहे? Hotspot कशाप्रकारे काम करतो? याबद्दल पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.


Hotspot काय आहे? What is Hotspot in marathi


hotspot meaning in marathi

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर Hotspot हे स्पेसिफिक लोकेशन आहे. येथे लोक वायरलेस द्वारा आपल्या मोबाईल, टॅबलेट, कॉम्प्युटर, लॅपटॉप यांसारखे devices Hotspot सोबत कनेक्ट करून इंटरनेट वापरतात Hotspot हा wireless local area network (WLAN) म्हणजेच Wi-Fi द्वारा कनेक्ट करून वापरला जातो.


Hotspot कशाप्रकारे काम करतो?


Hotspot ते WiFi प्रमाणेच कार्य करते. एखादा wireless access point दुसर्‍या कॉम्प्युटर WiFi device यांच्याबरोबर कनेक्ट होण्यासाठी रेडियो व्हेव्स पाठवत असतो. हे Wi-Fi access point इंटरनेट बरोबर कनेक्ट केलेले असतात. जे बर्‍याचदा राउटर किंवा एखाद्या सर्व्हर बरोबर कनेक्ट असतात. सर्व्हर हा WiFi access करण्यासाठी सिग्नल send आणि receive करत असतो. याला standardized करण्यासाठी 80211 standards वापरला जातो. जो Institute of Electrical and Electronics Engineers (IEEE) द्वारा तयार केलेला असतो.


➡️Hotspot काय आहे? कसे वापरावे?


* एक असा hotspot असतो जो एका फिजिकल लोकेशन वर लावलेला असतो. ज्याला आपण एका जागेवरून दुसर्‍या जागी हलवू शकत नाही. असे hotspot साधारणतः पब्लिक प्लेस आणि प्रायव्हेट प्लेस वर लावलेले असतात. हे hotspot wireless local area network (WLAN) द्वारा router सोबत जोडलेले असतात.


* मोबाईल Hotspot याला आपण कोठेही हलवू शकतो. कारण तो आपला मोबाईल च आहे. आपल्याला जेव्हा हवा तेव्हा आपण मोबाईल मधला hotspot चालू बंद करू शकतो. मोबाईल Hotspot ला portable Hotspot देखील म्हटले जाते. आपल्या मोबाईल चा डाटा कनेक्शन आणि Hotspot चालू करून याच्यासोबत आपला लॅपटॉप किंवा एखादा दुसरा मोबाईल कनेक्ट करून इंटरनेट वापरू शकतो. याच प्रोसेसिंग ला tethering असे म्हणतात.


Hotspot चे दोन प्रकार आहेत.

1.Free Wi-Fi Hotspots
2.Commercial Hotspots (काही रक्कम Pay करावी लागते)


➡️Wi-Fi काय आहे? Wi-Fi कशाप्रकारे काम करतो?


WiFi Hotspot शी कसे कनेक्ट करावे?


Wi-Fi हॉटस्पॉटशी कनेक्ट करणे ही एक सोपी प्रक्रिया आहे. सर्वप्रथम settings उघडा. settings मध्ये Wi-Fi दिसेल त्याच्यावर क्लिक करा.


Wi-Fi settings



Wi-Fi ला चालू करा... 


Wi-Fi Turn On
Wi-Fi Turn On


WiFi ला चालू केल्यानंतर जेवढे पण आपल्या जवळ Hotspot असतील ते आपल्या मोबाईल मध्ये दिसतील. आता आपल्याला ज्या hotspot सोबत connect करायचे आहे त्यावर क्लिक करा. >> क्लिक केल्यानंतर ईथे अगोदर सांगितल्याप्रमाणे 2 प्रकारचे hotspot असतात. काही hotspot फ्री असतात. त्यावर आपल्याला पासवर्ड टाकण्यासाठी विचारात नाहीत. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण इंटरनेट वापरण्यासाठी कनेक्ट होतो.
तर काही Hotspot वर पासवर्ड विचारला जातो. म्हणजेच ह्या hotspot साठी Pay करावे लागेल. म्हणजेच हा hotspot फ्री नाही. जोपर्यंत आपण पासवर्ड टाकत नाही तोपर्यंत आपण त्या hotspot बरोबर कनेक्ट होऊ शकत नाही.


जे लोक वारंवार प्रवास करतात आणि ज्यांना नेहमीच इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता असते अशा सर्वांसाठी मोबाइल हॉटस्पॉट्स खूपच महत्त्वपूर्ण आहे.


मला आशा आहे की, आपल्याला Hotspot काय आहे? Hotspot information in marathi  याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला Hotspot कशाप्रकारे काम करतो? हे समजलेच असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना किंवा फेसबुक आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻


1 टिप्पण्या

  1. नमस्कार जर मी मोबाईलचा हॉटस्पॉट लॅपटॉप साठी वापरत असेल तर जास्त वापर केल्यामुळे बिल जास्त येत असल्यास त्यावर तोडगा काय असेल

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने