मोबाईल म्हणजे काय? मोबाईल चा शोध कोणी लावला? Mobile information in marathi

मित्रांनो आपण सर्वजण मोबाईल फोन वापरतो. आज प्रत्येकाला मोबाइल फोनचे महत्त्व समजले आहे. परंतू कधी आपण हा विचार केला आहे का, की हा मोबाईल फोन कश्या प्रकारे कार्य करतो? तर आजच्या पोस्टमधे आपण मोबाईल फोन कश्या प्रकारे कार्य करतो? मोबाईल म्हणजे काय? मोबाईल चा शोध कोणी लावला? मोबाईल ला मराठी मध्ये काय म्हणतात? Mobile information in marathi मोबाईल बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया...


मोबाईल म्हणजे काय? Mobile information in marathi

मोबाईल म्हणजे काय? Mobile information in marathi

मोबाईल चा फुल फॉर्म मॉडिफाइड ऑपरेशन बाइट इंटिगेशन लिमिटेड एनर्जी (Modified Operation Byte Integration Limited Energy) हा आहे.

मोबाईल फोन एक इलेक्ट्रॉनिक आणि वायरलेस हेंडहेल्ड उपकरण आहे. ज्याच्या मदतीने आपण सहजपणे कोणाशीही संपर्क, संवाद साधू शकतो. हवी ती माहिती मिळवू शकतो. मोबाईल मध्ये इंटरनेट वापरून ऑनलाईन चे कार्य करू शकतो. मोबाईल फोन ला सेल्युलर फोन, सेल फोन, वायरलेस फोन अश्या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. 


मोबाईल ला मराठी मध्ये काय म्हणतात?

मोबाईल ला मराठीत 'भ्रमणध्वनी' असे म्हणतात.


मोबाईल चा शोध कोणी लावला?

जगातील पहिला मोबाइल फोन मोटोरोला कंपनीचे इंजीनियर जॉन एफ मिशेल (john f. mitchell) आणि मार्टिन कूपर (martin cooper) यांनी 3 April 1973 मध्ये लाँच केला होता. त्या मोबाईल चे वजन 2 किलो होते आणि किम्मत 2 लाख रुपये होती.


मोबाईल चा शोध कोणी लावला?
john f. mitchell and martin cooper


मोबाईल फोन चा इतिहास

यानंतर 1983 मध्ये मोटोरोलाचे डायनाटेक 8000 एक्स मॉडेल आले, ज्याची एकदा बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 35 मिनिटे बोलता येत होते. 

जगामध्ये सर्वप्रथम Automated Cellular Network जपानने 1979 मध्ये सुरू केले, ज्याचे नाव होते First Generation (1G) System. ज्याच्या मदतीने अनेक लोक एकाच वेळी कॉल करू शकले.

याच्यानंतर 1991 मध्ये 2G मोबाईल रेडिओलिन्जाद्वारे फिनलँडमध्ये आणला गेला आणि 1997 मध्ये प्रथम कॅमेरा मोबाइल तयार केला गेला.

2G मोबाईल तयार केल्याच्या एका वर्षानंतर जपानच्या NTT Docomo द्वारा 3G मोबाईल 2001 मध्ये तयार केला. 

आजकाल 4G आणि 5G मोबाइल फोनचे युग चालू आहे.


मोबाईल फोन कश्या प्रकारे कार्य करतो?

मोबाईल फोन कश्या प्रकारे कार्य करतो?

मोबाईल फोन कम्युनिकेशन करण्यासाठी रेडिओ तरंग (Radio waves) वापरत असतो. जेव्हा आपण फोन वर बोलतो त्या आवाजाला रेडिओ तरंग इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड म्हणून प्रसारित करतात. ज्याला आपण इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड असे म्हणतो. मोबाईल फोन मधून निघणारे रेडिओ वेव्ह प्रत्येक दिशेने जात असतात आणि जवळच्या टॉवर🗼पर्यंत पोहचत असतात.


mobile towers

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर मोबाईल फोन हा दोन मार्गाने चालणारा रेडिओ आहे. ज्यामधे एक पाठवणारा (sender) आणि दुसरा स्वीकारणारा (Acceptor) असतो. जेव्हा आपण आपल्या मोबाईल फोन वरुन एखाद्या व्यक्तीला बोलत असतो, तेव्हा आपल्या मोबाईल च्या मायक्रोफोनद्वारे आपला आवाज ऐकला जातो MEMS सेंसर आणि आईसी (IC) मायक्रोफोन च्या मदतीने आपला आवाज इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये रुपांतरीत करतो. ज्यानंतर रेडिओ वेव्ह हे जवळच्या सेल टॉवरवर प्रसारित केले जातात. आणि आता त्या सेल टॉवरचे नेटवर्क त्या व्यक्तीच्या मोबाईल फोनवर रेडिओ वेव्ह पाठवतो. ज्यामुळे आपला कॉल त्याच्यासोबत जोडला जातो. नंतर इलेक्ट्रिकल सिग्नल या रेडिओ वेव्ह ला आवाजामध्ये-ध्वनीमध्ये रूपांतरित करतात. 


मला आशा आहे की, आपल्याला मोबाईल म्हणजे काय? मोबाईल चा शोध कोणी लावला? मोबाईल ला मराठी मध्ये काय म्हणतात? Mobile information in marathi मोबाईल बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना हि पोस्ट शेअर करायला विसरू नका. ☺️


आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने