माहूरगड ची माहिती - रेणुका देवीची कथा Mahurgad information in marathi माहुर गड दत्त मंदिर

माहूर गडाला एक महान तीर्थक्षेत्र व महाराष्ट्रातील शक्तीपीठ मानले जाते. हे शहर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले आहे. तसेच माहूर या शहराला चहूबाजूंनी डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेढले आहे. तर या पोस्टमध्ये माहूरगड ची माहिती - रेणुका देवीची कथा जाणून घेऊया...


रेणुका माता मंदिर माहूरगड महाराष्ट्र

माहूरगड ची माहिती - रेणुका देवीची कथा  Mahurgad information in marathi


माहूर हे श्रीक्षेत्र महाराष्ट्रातील मराठवाडा नांदेड जिल्ह्यात आहे. नांदेड शहरापासून जवळपास १३० किलोमीटर अंतरावर आहे. माहूर या क्षेत्राच्या तीनही बाजूंनी पैनगंगा नदी वाहते. येथे श्री रेणुका माता, अनुसया माता आणि दत्तात्रय प्रभु यांची मंदिरे आहेत. पण त्याचबरोबर तेथे इतिहासाला जोडणारा रामगड नावाचा किल्ला आहे. हा किल्ला माहूर चा किल्ला नावाने ओळखला जातो. हा किल्ला पर्यटकांचे आणि ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी आकर्षण आहे. तसेच येथे पांडवलेणी नावाची ऐतिहासिक वास्तु आहे. हि ऐतिहासिक वास्तु खूप सुंदर आहे.

माहूर किल्ला

रेणुका मातेची कथा - रेणुका देवीची माहिती - रेणुका माता मंदिर माहूरगड महाराष्ट्र

महाराष्ट्रात एकूण साडेतीन शक्तीपीठ आहेत आणि त्यापैकी माहूर हे एक आहे. येथील मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. परशुरामांची आई असलेल्या श्री रेणुका मातेचे मंदिर येथे आहे. परशुरामाची आई रेणुका येथे सती गेली, असे पुराणात म्हटले आहे. गुरुचरित्रात या स्थानाचे ओझरते उल्लेख आहेत. महाराष्ट्रात अनेक भक्तांचे कुलदेवत असलेले हे स्थळ आहे. येथे दर्शनासाठी खूप दूरदुरून भाविक येतात. प्रत्येक नवरात्रोत्सवात येथे प्रचंड प्रमाणात गर्दी होते. १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधलेले हे श्री रेणुकामातेचे मंदिर आहे असे म्हटले जाते. धार्मिक महत्त्व असणाऱ्या ठिकाणांना हिंदू धर्मातील परंपरेत 'श्रीक्षेत्र' माहूर जोडलेले आहे. 


माहुर गड दत्त मंदिर

माहुर गड दत्त मंदिर व अनुसया माता मंदीर येथून भोवतालचा प्रदेश फारच रमणीय दिसतो. दत्तात्रेयाचे मंदिर माहूरपासून सहा मैलांवर एका शिखरावर आहे. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. दत्तशिखरावरील मूळ मंदिर १०-१२ फूट एवढय़ाच लांबीरुंदीचे आहे. मूळ मंदिराची बांधणी संवत १२९७ मध्ये महंत मुकुंदभारती यांनी केली. माहूरपासून सहा किमी अंतरावर अत्रीऋषीव महासती अनुसया मातेचा आश्रम आणि मंदिर आहे.


दत्तात्रेयांच्या मंदिरापासून दक्षिणेस दोन किमी अंतरावर वनदेव देवस्‍थान आहे. वनात असलया मुळे त्‍या ठिकाणास वनदेव असे म्‍हणतात. हृया ठिकाणी यदुराजाने तपःश्‍चर्या करून दत्‍तात्रयांना प्रसन्‍न करून घेतले होते. तेव्‍हा दत्‍तात्रयाने मी कोणापासून कोणता गुण घेतला अशा चोवीस गुणाचे वर्णन युदराजास या ठिकाणी सांगितले आहे.


वनदेवपासून एक किमी अंतरावर कैलासटेकडी आहे. कैलासटेकडी ही सहयाद्री पर्वतावरील सर्वात उंच टेकडी असून अत्‍यंत जागृत ठिकाण आहे. दत्‍तात्रयांच्‍या पादुका ह्या ठिकाणी आहे. हृया ठिकाणी भगवान दत्‍तात्रयांनी गोरखनाथांना दर्शन दिले होते असे हे पवित्र ठिकाण आहे.


आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने