सोशल मीडिया म्हणजे काय? Social Media Information In Marathi - सोशल मीडिया मराठी माहिती

मित्रांनो आजच्या काळात सोशल मीडिया (Social Media) हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. माझ्या मते तर असा एकही व्यक्ती नसेल जो सोशल मीडिया वापरत नसेल. कदाचित आपल्या माहिती असेल आजच्या काळात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे एक उत्तम माध्यम बनले आहे. तर या पोस्टमध्ये आपण सोशल मीडिया म्हणजे काय? What Is Social Media In Marathi? सोशल मीडिया चे फायदे व तोटे, सोशल मीडिया चे प्रकार काय आहेत?, Social Media Information In Marathi सोशल मीडिया बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया...


सोशल मीडिया म्हणजे काय?  Social Media Information In Marathi - सोशल मीडिया मराठी माहिती

सोशल मीडिया माहिती - Social Media Information In Marathi 

सोशल मीडिया एक असे साधन बनले आहे ज्याने बऱ्याच लोकांना एका रात्रभरात सुपर स्टार किंवा प्रसिद्ध बनवले आहे. याची ताजी उदाहरणे आपण दररोज पाहत असतो. विशेषतः न्यूज चॅनल्सवर कारण सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल झाला की प्रसिद्ध होतो. असे बरेच लोक आहेत ज्यांना सोशल मीडियाने नाव आणि पैसे दोन्ही दिले आहेत.


आज प्रत्येक व्यक्ती 2 ते 3 तास आपला वेळ इंटरनेट चालवण्यासाठी आणि सोशल मीडिया वापरण्यासाठी घालवत असतो. तर अंदाज लावु शकता की इंटरनेट आणि सोशल मीडियाने आपले जीवन कसे बदलले आहे.


सोशल मीडिया हे आजच्या आधुनिक युगात एक ऑनलाईन बाजारपेठ आणि व्यवसायाचे रुप बनले आहे. येथे जगभरातील लोकं ऑनलाईन राहत असतात आणि दररोज येथे कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय चालतो.


सोशल मीडिया म्हणजे काय? What Is Social Media In Marathi

इंटरनेट एक वर्चुअल जग आहे आणि सोशल मीडिया एक विशाल नेटवर्क आहे. या विशाल नेटवर्कशी कनेक्ट होण्यासाठी आपल्याला इंटरनेट वापरणे आवश्यक आहे. जे आपल्याला जगभरातील लोकांशी कनेक्ट करते किंवा सोशल मीडिया हि अशी सेवा आहे जी इंटरनेटद्वारे चालू राहते. ज्याद्वारे आपण संपूर्ण जगाशी संपर्क साधू शकतो आणि ते देखील कधीही, कोठेही फक्त आपल्याला सोशल मीडियावर उपलब्ध असणे आवश्यक आहे.


सोप्या शब्दात सांगायचे झाले तर सोशल मीडिया म्हणजे social communication द्वारे लोकांशी ऑनलाईन संपर्क साधणे. आत्ताचे युग हे डिजीटल ऑनलाईन चे असल्याने लोकं सोशल मीडिया चा वापर आपापसात संवाद-संपर्क किंवा कोणत्याही प्रकारच्या वस्तूची देवाण-घेवाण करण्यासाठी करताय. आपल्यापैकी बऱ्याच लोकांचे मित्र किंवा नातेवाईक हे परदेशात साता-समुद्रापार असतात. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया हे एक उपयुक्त साधन बनले आहे.


लोकांना एकत्र जोडण्याचे काम करणार्‍या वेबसाइटला सोशल मीडिया वेबसाइट म्हटले जाते ज्यावर कोणतीही व्यक्ती सहजपणे स्वत: चे प्रोफाइल डीपी तयार करू शकते.


सोशल मीडिया चे प्रकार

आपल्याला तर माहितच असेल की, सोशल मीडिया चे क्षेत्र बरेच विस्तृत आहे. त्यामूळे सोशल मीडिया चे प्रकार देखील बरेच आहेत. आपण काही महत्वाच्या सोशल मीडियाच्या प्रकरांबद्दल पाहूया.


▪️ सोशल मीडियाच्या प्रकारांबद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये सोशल नेटवर्क जसे की, व्हॉट्सॲप फेसबूक, टेलिग्राम, ट्विटर, लिंक्डइन, पिंटरेस्ट हे प्रकार आहेत.


▪️ सोशल शेअरिंग नेटवर्क यामध्ये फोटो आणि व्हिडिओ व्दारे लोकांनी आकर्षित करण्यासाठी यूट्यूब, इंस्टाग्राम, स्नैपचैट हे प्रकार आहेत.


वाचा ➡️इंटरनेट म्हणजे काय? इंटरनेट चे फायदे व तोटे

➡️Twitter म्हणजे काय? ट्विटर अकाउंट कसे चालवावे? 


सोशल मीडिया चे फायदे व तोटे Social media Advantages and Disadvantages In Marathi

सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म आहे ज्यावर संपूर्ण जगा-बरोबर कनेक्ट केले जाऊ शकते. पण  याचा उपयोग करण्याचे बरेच फायदे आणि तोटे देखील आहेत. तर मग त्याचे फायदे आणि तोटे याबद्दल जाणून घेऊया.


सोशल मीडिया चे फायदे 

▪️ जर आपल्याकडे एखादा ब्रांड असेल आणि आपल्याला त्या ब्रांड चे मार्केटिंग करायचे असेल तर सोशल मीडिया मार्केटिंग एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. यासारखा चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला कुठेही मिळणार नाही.

▪️ आपल्याकडे लोकांची कमतरता असेल तर आपण सोशल मीडियाचा वापर करून लोकांना एकत्रित करु शकतो.

▪️ आपल्याकडे अशी काही कौशल्ये आहेत जी आपण आपल्या नावाने जगाला दाखवू इच्छित आहात. तर आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून सहजपणे करु शकतो. आजकाल बरेच लोक आपली कौशल्ये दाखवून प्रसिद्ध झाले आहेत.

▪️ याद्वारे आपण शिक्षण मिळवू शकतो.

▪️ आपण आपल्या देशात आणि परदेशात सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन मित्र बनू शकतो.

▪️ सोशल मिडियाचा उपयोग जाहिरातींसाठी आणि प्रोडक्ट ला प्रमोट करण्यासाठी केला जाऊ शकतो.

▪️ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपल्या मित्रांशी नेहमीच संपर्कात राहतो.

▪️ एका देशातून दुसर्‍या देशात असलेल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

▪️ याद्वारे आपण आपल्या व्यवसायाला वाढवू शकतो.

▪️ आपण सोशल मीडियाद्वारे घरी बसून पैसे कमवू शकतो.


सोशल मीडिया चे तोटे 

▪️ सोशल मीडियावर आपल्याला बर्‍याच प्रकारची  चुकीची माहिती मिळते ज्यावर आपण सहज विश्वास करतो.

▪️ सोशल मीडियाच्या अत्यधिक वापरामुळे आपण व्यसनाधीन होऊ शकतो.

▪️ फेक खाते तयार करण्याची शक्यता अधिक वाढते.

▪️ येथे कोणताही अज्ञात आणि धोकादायक व्यक्ती आपल्या सर्व वैयक्तिक माहितीमध्ये प्रवेश मिळवू शकतो आणि ज्याचा नंतर ते चुकीचा वापर करू शकतो.

▪️ सोशल मीडियाचा वापर मोबाईल व संगणकावर होत असल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.

▪️ विद्यार्थी त्यांचा मौल्यवान वेळ सोशल मीडियावर वाया घालवतात जे त्यांच्या भविष्यासाठी बरोबर नसतो.

▪️ सोशल मीडियामुळे फसवणूक आणि हॅकिंग केली जावू शकतो.

तर मित्रांनो, सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत, परंतु हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे की आपण कश्या प्रकारे सोशल मीडियाचा वापर करत आहोत.


सोशल मीडिया चे भविष्य

आता आपण विकसित तंत्रज्ञानाच्या जगात राहत असल्यामुळे आपल्या सर्व गोष्टी ह्या तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहेत. त्यामूळे येणाऱ्या भविष्यामध्ये नक्कीच सोशल मीडिया उज्वल ठरणार आहे. हळू हळू आपल्या सर्व गोष्टी वर्चुअल जगाकडे जात आहेत अश्या परिस्थितीत तो दिवस दूर नाही जेव्हा आपल्या सर्व गोष्टी या सोशल मीडियावर ऊपलब्ध असतील. 


➡️7 useful whatsapp new Features, secret tricks & tips in marathi

➡️7 Facebook tricks & tips || important settings || in marathi


मला आशा आहे की, आपल्याला सोशल मीडिया म्हणजे काय? What Is Social Media In Marathi? सोशल मीडिया चे फायदे व तोटे, सोशल मीडिया चे प्रकार काय आहेत? Media Information In Marathi सोशल मीडिया बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना हि पोस्ट शेअर करायला विसरू नका. ☺️


आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने