Twitter म्हणजे काय? ट्विटर अकाउंट कसे चालवावे? twitter information in marathi

मित्रांनो आपण सर्वजण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतो. आणि आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाने असे ऐकले असेल की, एखाद्या सेलिब्रिटीने हे ट्विट केले आहे ते ट्विट केले आहे. म्हणजे नेमके त्या व्यक्तीने काय केले आहे? तर आजच्या पोस्टमधे आपण ट्विटर (Twitter) म्हणजे काय? ट्विटर कोणी तयार केले? ट्विटरचे फायदे आणि तोटे काय आहेत? twitter information in marathi ट्विटर कसे वापरावे? आणि ते कसे कार्य करते? याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत...


ट्विटर म्हणजे काय? twitter information in marathi

ट्विटर म्हणजे काय? twitter information in marathi 

Twitter चा फूल फॉर्म आहे - TYPING WHAT I’M THINKING THAT EVERYONE’S READING

Twitter हे फेसबुक प्रमाणेच एक सोशल मीडिया नेटवर्किंग वेबसाइट आहे ज्याचा वापर करून आपण त्यावरील लोकांशी संपर्क साधू शकतो. देशातील आणि जगातील सर्व लोक ट्विटर चा वापर करतात.

ट्विटर ला मार्च 2006 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. ज्याचे मुख्य मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया येथे आहे. 2006 पासून ट्विटर चि लोकप्रियता अधिक प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ट्विटर चा वापर आजकाल सर्वचजण करतात.

Twitter वापरून आपण दररोज देश आणि जगामध्ये सर्वाधिक चर्चा होणार्‍या सर्व विषयांबद्दल जाणून घेऊ शकतो. आणि त्या विषयांवर आपण आपले विचार देखील व्यक्त करू शकतो. ट्विटरचे मुख्य काम म्हणजे लोकांद्वारे झालेल्या समस्येवर आपण आपले मत व्यक्त करू शकतो.

ट्विटरचे ट्वीट म्हणजे काय?

ट्विटरवर माहिती शेअर करण्याच्या प्रक्रियेस ट्वीट म्हणतात. ट्विटरवर एकावेळेस ट्वीट करण्यासाठी 140 शब्द मिळतात. म्हणजे आपल्याला आपले ट्वीट 140 शब्दांमध्येच पूर्ण करावे लागते. आपल्याला पाहिजे तितके ट्विट आपण करू शकतो.

ट्विटरवर ट्विट करतो म्हणजे आपण एक लहान संदेश शेअर करतो. म्हणजे आपल्याला जे फॉलो करतात त्यांना तो संदेश पाठविल्या जातो. बरेच वापरकर्ते त्यांच्या आवडीच्या लोकांना फॉलो करतात जेणेकरून ते एकमेकांशी संवाद साधू शकतील. 

ट्विटरवर जे प्रोफाईल असतात ते बर्‍याचदा सार्वजनिक असतात. म्हणजे आपण जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात असलो तरी आपण ते प्रोफाइल पाहू आणि वाचू शकता. जर कोणाची प्रोफाइल प्रायव्हेट असेल तर आपण ती प्रोफाइल पाहू आणि वाचू शकणार नाही.

ट्विटर कोणी तयार केले?

Twitter जॅक डोर्सी, नोहा ग्लास, बिझ स्टोन आणि इव्हान विल्यम्स यांनी मार्च 2006 मध्ये तयार केले होते. या अ‍ॅपबद्दल प्रथम विचार करणार्‍या जॅक डोर्सी म्हणाले की त्यांना खरोखर अशी एक सेवा बनवायची आहे ज्यामध्ये लोक आपल्या मित्रांना काय करीत आहेत, कोठे फिरत आहेत याबद्दल माहिती होईल.

➡️ई-मेल आयडी म्हणजे काय? 

ट्विटर टीमचे म्हणणे आहे की त्यांनी प्रथम त्याचे नाव “Twitch” ठेवले. नंतर त्या Twitch चे Twitter झाले. जर आपण ऑक्सफॉर्म डिक्शनरीमध्ये त्याचा अर्थ पहिला तर त्याचा अर्थ 'खूप वेगवान बोलणे, ते देखील चिंताग्रस्त मार्गाने'.

ट्विटर चे CEO कोण आहेत?

तर ट्विटर चे CEO जॅक पॅट्रिक डोर्सी आहेत.

त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1976 रोजी झाला होता.  हे  एक अमेरिकन संगणक प्रोग्रामर आणि इंटरनेट उद्योजक आहेत जे ट्विटरचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. 

ट्विटर कसे कार्य करते?

Twitter ही टेक्नॉलॉजी फ्रेमवर्क वेब इंटरफेस (FWI) हा रुबी ऑन रेल्स फ्रेमवर्कचा वापर करते. ट्विटर पोस्ट handling हे एका सॉफ्ट्वेअर द्वारे केले जाते ज्याला प्रोग्रामिंग भाषेच्या स्केलासह लिहिले जाते. हे फ्रेमवर्क अतिरिक्त वेब सेवा आणि अॅप्लिकेशन ला ट्विटरसह परस्पर संवाद साधण्याची आणि एकत्रित करण्याची अनुमती देते. ट्विटरची सर्च कार्यक्षमता विशिष्ट संदेश शोधण्यासाठी हॅशटॅग चा वापर केला जातो. हॅशटॅग (#) हे एक चिन्ह symbol असते. ज्या शब्दाला हॅशटॅग (#) हे चिन्ह लावून सर्च केले तर त्या संबंधित आपल्या पोस्ट उपलब्ध होतील.

आपल्याला माहीत आहे का? भारतात सर्वात जास्त ट्विटर फॉलोअर्स कोणाचे आहेत?

तर भारतात सर्वात जास्त ट्विटर फॉलोअर्स नरेंद्र मोदीचे आहेत. ज्यांचे ट्विटर हॅन्डल आहे @narendramodi

नरेंद्र मोदीच्या फॉलोअर्स ची संख्या आहे 64.3 दशलक्ष +.

ट्विटरचे अकाऊंट कसे तयार करावे? 

जर मित्रांनो आपल्याला फेसबुकवर अकाऊंट तयार करता येत असेल तर ट्विटरवर अकाऊंट तयार करणे आपल्यासाठी फार कठीण नाही. कारण ट्विटरवर अकाऊंट बनवणे म्हणजे फेसबुकसारखेच.

Twitter वर अकाऊंट तयार करण्यासाठी आपण मोबाइलमध्ये क्रोम ब्राउझर किंवा ट्विटर अ‍ॅप वापरू शकतो. आम्ही ट्विटर अकाउंट तयार करण्यासाठी क्रोम ब्राउझर चा वापर करणार आहे. चला तर मग ट्विटर अकाउंट कसे तयार करावे ते पाहूया...

ट्विटर अकाउंट तयार करण्यासाठी >> सर्वप्रथम क्रोम ब्राउझर उघडा >> https://mobile.twitter.com हि साइट गूगलवर सर्च करा >> Sign up ला क्लिक करा...


create a Twitter account


आता या स्टेप ला फॉलो करा...

तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि Date of birth टाका >> Next ला क्लिक करा >> परत Next ला क्लिक करा >> Sign up ला क्लिक करा >> verify phone Ok करा >> आता तुमच्या मोबाईल नंबर वर एक Veficication code येईल. तो code ईथे टाका >> Next ला क्लिक करा >>  आता 8 अंकी Password टाका >> Next करा >> profile picture अॅड करा किंवा skip for now वर क्लिक करा. >> skip करा >> तुमची भाषा निवडा आणि Next वर क्लिक करा>> तुमचे interested अॅड करा किंवा Skip for now वर क्लिक करा >> Next >> तुम्हाला ट्विटर चे अॅप डाऊनलोड करायचे असेल तर Download Now वर क्लिक करा किंवा Not today ला क्लिक करा.

आता आपले ट्विटरचे अकाऊंट पूर्णपणे तयार झालेले आहे.


ट्विटर कसे वापरावे?


ट्विटर कसे वापरावे? 

ट्विटर अकाउंट तयार केल्यानंतर आता ट्विटरच्या मूलभूत गोष्टींबद्दल बोलूया...

ट्विटर वापरण्यापूर्वी आपणास ट्विटरच्या मूलभूत गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला ट्विटरबद्दल माहिती होईल आणि आपण ट्विटर चांगल्याप्रकारे वापरू शकू.

ट्विटर वापरण्यासाठी आपल्याला या गोष्टींबद्दल माहित असणे आवश्यक आहे.

1. Twitter user Name(@)
2. Tweets
3. Retweets
4. Followers and Following
5. HashTag(#)

1. Twitter user Name(@) - ट्विटरवर आपल्याला प्रत्येक वापरकर्त्याच्या नावापुढे At The Rate (@) चे चिन्ह पाहायला मिळते. हे चिन्ह (@) वापरकर्त्याच्या Username च्या समोर वापरले जाते.

2. Tweets - जेव्हा आपण ट्विटरवर काही लिहिता किंवा पोस्ट करता तेव्हा त्यास ट्वीट असे म्हणतात

3. Retweets - हे अगदी शेअर करण्यासारखेच आहे, जेव्हा आपल्याला एखाद्याचे ट्विट आवडते तेव्हा आपण ते रीट्वीट करू शकतो. असे केल्याने, ते ट्विट आपल्या टाइमलाइनवर दिसण्यास सुरवात होते, जे आपल्याला फॉलो करणार्या लोकांपर्यंत पोहोचते.

4. Followers and Following - ट्विटरवर आपल्याला वापरकर्त्याच्या प्रोफाईल वर Follow बटन मिळतो. आपण या Follow बटनवर क्लिक केले तर या आपल्याला त्या वापरकर्त्याच्या प्रत्येक ट्विटबद्दल माहिती मिळते. म्हणजे आपण त्या व्यक्तीला Following करत आहे.

जे लोक आपल्या प्रोफाइलवर येतात आणि आपल्या प्रोफाईलवर असलेल्या फॉलो बटणावर क्लिक करतात. तेव्हा ते वापरकर्ते आपले Followers होतात.

5. HashTag(#) - ट्विटरवर पोस्ट लिहिताना याचा वापर केला जातो आणि जे लोक हॅशटॅग (#) वापरतात तेव्हा ते ग्रुप सारखे कार्य करते ज्यात लोक त्या विषयावर चर्चा करतात. या हॅशटॅगचा वापर करुन कोणीही या चर्चेत अॅड होऊ शकते.

ट्विटर अकाउंट कसे चालवावे?

1. Home
जेव्हा आपण ट्विटर उघडतो तेव्हा आपल्याला प्रथम होम बटण दिसते, ज्यावर आपल्याला आपण फॉलो करीत असलेल्या सर्व लोकांचे ट्वीट पाहायला मिळतात.

2. Search
हे सर्च बटण वापरुन आपण ट्विटरवर काहीही शोधू शकतो. येथे आपण आपल्या मित्रांना शोधू शकतो. जसे की @indian_tech_marathi हे सर्च करून किंवा यावर क्लिक करून तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता.

3. Notification Bell
येथे आपल्याला सर्व प्रकारच्या सूचना मिळतात जसे की कोणीतरी आपल्याला फॉलो केले, रीट्वीट ट्विट इ.

4. Message Request
या बटणावर क्लिक केल्यानंतर, आपल्याला पाठविलेले सर्व संदेश पाहायला मिळतात.

5. Tweets Button
या बटणावर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या ट्विटर खात्यावर ट्विट करुन आपले विचार शेअर करू शकतो.

मित्रांनो, आपण वर नमूद केलेल्या सर्व स्टेप ला फॉलो करुन सहजपणे ट्विटर चालवू शकता.

ट्विटरचे फायदे आणि तोटे

ट्विटर हे जगामध्ये काय चालू आहे हे जाणून घेण्याचे एक अतिशय सोपे आणि प्रभावी माध्यम आहे आणि त्याची लाकप्रियता सतत वाढत आहे. त्यामूळे ट्विटर वापरण्याचे काही फायदे आणि तोटे आहेत पण हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे की आपण याचा वापर कसा करतो. चला ट्विटरचे फायदे आणि तोटे जाणून घेऊया.

 ट्विटरचे फायदे 

ट्विटरच्या मदतीने आपण आपल्या मित्र आणि नातेवाईकांशी संपर्कात राहू शकतो.

ट्विटर हे हिंसा, छळ आणि इतर तत्सम वागणूक करणाऱ्या लोकांना व्यक्त करण्यापासून परावृत्त spam करते.

ट्विटर हे राज्यातील कोणतीही माहिती मिळविण्यासाठी एक सोपं साधन आहे.

ट्विटर हे प्रचार करण्यासाठी एक उत्तम माध्यम आहे.

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला फॉलो करून त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊ शकतो.

 ट्विटरचे तोटे

ट्विटरच्या शब्दाच्या मर्यादेमुळे काही वेळा लोकांना काही ट्वीट समजण्यात अडचण येते आणि मग काहीवेळा त्या ट्विट चा काहीवेळा वेगळा अर्थ काढला जातो.

शब्दाच्या मर्यादेमुळे, लोक ट्विटर वापरण्यास टाळाटाळ करतात कारण प्रत्येकजण आपला मुद्दा थोडक्यात सांगू शकत नाही.

काही लोक ट्विटर मुळे सहज संभ्रम पसरवू शकतात.

➡️हॅलो! गुगल असिस्टंट काय आहे? कसे वापरावे?

मला आशा आहे की, आपल्याला ट्विटर म्हणजे काय? ट्विटर कोणी तयार केले? ट्विटरचे फायदे आणि तोटे काय आहेत? twitter information in marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला ट्विटर कसे वापरावे? हे समजलेच असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना किंवा फेसबुक, आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.  🙏🏻
1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने