हॅलो! गुगल असिस्टंट काय आहे? कसे वापरावे? Google assistant information in marathi

गुगल हे एक असं सर्च इंजिन आहे ज्यावर आपल्याला सर्व प्रकारची माहिती मिळते. आपल्याला जी माहिती हवी आहे ती आपण गूगल वर टाइप करून शोधू शकतो. परंतु आपल्याला माहित आहे का? की आता आपण गुगल असिस्टंट ( Google Assistant) च्या मदतीने काहीही टाइप न करता हे कार्य करू शकतो.


हॅलो! गुगल असिस्टंट

गुगल असिस्टंट ची माहिती 

गुगल सुरुवातीपासूनच आपल्याला बरेच फीचर्स देत आहे आणि आता हे एक नवीन फिचर घेऊन आला आहे, जे आपल्याला गुगलवर काहीही  शोधण्यासाठी सोप्पं करेल. हे इंग्रजी, हिंदी आणि मराठी अश्या अनेक भाषांमध्ये कार्य करते. गुगल असिस्टंट हे सर्व Android device मध्ये उपलब्ध आहे. तर मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये गुगल असिस्टंट काय आहे? तसेच गुगल असिस्टंट कसे कार्य करते? Google assistant information in marathi गुगल असिस्टंट ची माहिती संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.


गुगल असिस्टंट काय आहे? what is Google assistant in marathi


गुगल असिस्टंट एक voice स्मार्ट असिस्टंट(सहाय्यक) आहे. याचा वापर करून आपण बरेच कामे करू शकतो, जसे की मेसेज वाचणे, टाइमर लावणे, अलार्म लावणे, गाणी प्ले करणे, फोन लावले, हवामान तपासणे, जवळचे रेस्टॉरंट शोधणे, भाषांतर करणे इ. यासह, आपण आपल्या फोनचे बहुतेक कार्य करू शकतो.  आपण गुगल असिस्टंट वर कोणताही प्रश्न विचारल्यास ते 90% उत्तर अचूकपणे देतो.


गुगल असिस्टंट सोबत लिहून किंवा बोलून आदेश देऊन आपण काहीही करू शकतो.  आपल्याला इंटरनेटवर कशाचाही शोध घ्यायचे आहे की नाही ते आपण बोलून करू शकतो. आता गुगल असिस्टंट आपल्याला मराठी भाषेमध्ये देखील मदत करेल.


महत्वाचे म्हणजे आपल्याला गुगल असिस्टंट डाउनलोड करण्याची गरज नाही आहे कारण प्रत्येक Android device मध्ये अगोदर पासूनच install केलेली आहे. 


गुगल असिस्टंट कसे चालू करावे? 


सर्वप्रथम आपल्याला आपल्या फोन च्या होम बटणावर काही सेकंदासाठी टच करून ठेवायचे आहे. आता आपल्याला गुगल असिस्टंट activate करण्यासाठी काही permission मागितले जाईल. तेव्हा आपल्याला permission द्यायचे आहे.


आता आपल्याला आपला voice recognize करावा लागेल. यासाठी get started वर क्लिक करा. येथे आपल्याला 3 वेळा OK Google म्हणावे लागेल. हे केल्यानंतर आपले गुगल असिस्टंट पूर्णपणे activate झालेले असेल. 


गुगल असिस्टंट कसे वापरावे? how to use Google assistant in marathi 


आपल्याला आपल्या फोनचे होम बटण टच करून लागेल.  मग आपल्याला येथे गुगल असिस्टंट दिसेल.  आता आपण असिस्टंट च्या माइक चिन्हावर क्लिक करून काहीही करू शकतो.  गुगल असिस्टंटबरोबर आपल्याला जे काही काम करण्याची गरज आहे त्या सर्वासाठी सर्वप्रथम तुम्हाला ओके गुगल म्हणावे लागेल.  यानंतर आपले कार्य माइकमध्ये बोला आणि ते कार्य आपल्यासाठी करेल.  उदा. आपण एखाद्यास कॉल करू इच्छित असल्यास, आपण गुगल असिस्टंट च्या माइकमध्ये बोलून त्यांचे नाव सांगून कॉल करू शकतो.


गुगल असिस्टंट चे फायदे 


गुगल असिस्टंट वापरण्याचे बरेच फायदे आहेत.
जसे जसे आपण गुगल असिस्टंट वापरु तसे तसे गुगल असिस्टंट चे फायदे आपल्याला माहिती होतील.


1. आपल्याला आपल्या जवळच्या रेस्टॉरंटमध्ये जायचे आहे, परंतु आपल्याला आपल्या जवळ कोणते रेस्टॉरंट आहे हे माहिती नसेल ते आपल्याला शोधण्यात मदत करते.


2. जर आपल्याला कोणतेही application ओपन करायचे आहे तर आपल्याला OK Google म्हणावे लागेल आणि त्या application चे नाव सांगावे लागेल. नाव सांगल्यानंतर ते application ओपन होईल.


3. आपण कोणालाही फोन लावू शकतो आपल्याला फक्त गुगल असिस्टंट ओपन करावे लागेल आणि ज्या व्यक्तीला फोन लावायचा आहे त्याचे नाव सांगावे लागेल.


* म्हणजेच ईथे आपल्याला जे हवे आहे ते बोलल्यानंतर गुगल असिस्टंट शोधण्यास मदत करेल. आपण गुगल असिस्टंट वर कोणताही प्रश्न विचारल्यास ते 90% उत्तर अचूकपणे देईल.


Hey google talk in marathi


तसेच आपण गुगल असिस्टंट चि भाषा बदलू शकतो.
जसे, इंग्लिश, मराठी, हिंदी...


* भाषा बदलण्यासाठी आपल्याला >> सर्वप्रथम आपल्या फोन च्या होम आयकॉन वर टच करून ठेवा >> गुगल असिस्टंट ओपन होईल >> डाव्या साईडला खालच्या बाजूला असलेल्या आयकॉन वर क्लिक करा >> नंतर उजव्या साईडला असलेल्या जीमेल आयकॉन वर क्लिक करा.

Google Assistant

नंतर assistant वर क्लिक करा >> languages(भाषा) >> आता ईथे आपल्याला जी language(भाषा) गुगल असिस्टंट सोबत activate झालेली आहे ती दिसेल त्यावर क्लिक करा >> आता आपल्या समोर बर्‍याच languages(भाषा) येतील >> आपल्याला जी भाषा हवी आहे त्या भाषेला सिलेक्ट करा.


Google Assistant Language change

असे बरेच फीचर्स गुगल असिस्टंट मध्ये आहेत. जी वापरकर्त्यांना बरेच फायदे प्रदान करतात.  यासह, गुगल असिस्टंट आणखी यात अनेक फीचर्स आणणार आहे. त्यामुळे आपल्याला गुगल असिस्टंट वापरणे आणखी सोपे होईल.

आता गुगल असिस्टंट गूगल होम, modern Android devices, Android TV, Headphones, गुगल स्मार्ट displays यांमध्ये install आहे. आजकाल तर घरांमध्ये देखील अशा बर्‍याच स्मार्ट उपकरणांमध्ये याचा उपयोग  केला जातो, ज्यांमध्ये गुगल असिस्टंट install केली आहे.  जसे स्मार्ट लाइट बल्ब, स्मार्ट स्पीकर, स्मार्ट लॉक, स्मार्ट टीव्ही इ.


तसेच गुगल ने कन्फर्म केले आहे की आता अश्या बर्‍याच devices मध्ये directly गुगल असिस्टंट लाँच केले जाणार आहे. जसे की, कार्स...


मला आशा आहे की, आपल्याला गुगल असिस्टंट काय आहे? Google assistant information in marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला गुगल असिस्टंट कसे वापरावे हे समजले असेल. तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी फेसबुक आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करा.🙏🏻टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने