कॉल बॅरिंग म्हणजे काय? कसे वापरावे? Call barring information in marathi

Call Barring Meaning In Marathi

आजच्या वेळेमध्ये मोबाइल फोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्याशिवाय असे वाटते की आपण काहीतरी विसरलो आहोत. मोबाइल फोनमध्ये असे अनेक फीचर्स आहेत. ज्यांच्याबद्दल आपल्याला फारच कमी माहिती आहे. असेच एक महत्त्वाचे फीचर्स आहे ते म्हणजे कॉल बॅरिंग (Call Barring). हे फीचर्स जवळपास प्रत्येक स्मार्ट फोनमध्ये उपलब्ध आहे. तर आजच्या पोस्टमधे आपण Call barring information in marathi कॉल बॅरिंग म्हणजे काय? कॉल बॅरिंग कसे वापरावे?, कॉल बॅरिंगचे फायदे काय आहेत? आणि मोबाइलमध्ये कॉल बॅरिंग चालू आणि बंद कसे करावे? याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.


कॉल बॅरिंग म्हणजे काय?

कॉल बॅरिंग म्हणजे काय? कसे वापरावे? Call barring information in marathi


आपल्या फोनवर असे बरेच अनावश्यक कॉल येतात.  ज्यामुळे आपण खूप परेशान होतो.  विशेषत: जेव्हा आपण काही महत्त्वाचे काम करत आहोत. अशा परिस्थितीत हे कॉल येतात. अशावेळेस आपल्याही मनात असा विचार येतो की या कॉलला कस तरी बंद केल पाहिजे. तर हो मित्रांनो आपण या फीचर्स ने करू शकतो. 


कॉलिंग बॅरिंग म्हणजे काय? What is call barring in marathi?


कॉल बारिंग म्हणजे कॉल थांबविणे. आपल्या फोनवर येणारे कोणतेही इनकमिंग कॉल, किंवा आउटगोइंग कॉल या कॉल बॅरिंग सेटिंग्जद्वारे आपण ब्लॉक(stop) करू शकतो.


कॉल बॅरिंग हे असे फीचर्स हे जे आपल्याला काही विशिष्ट नंबरवर कॉल करण्यापासून प्रतिबंध(stop) करण्यास परवानगी देते. विशिष्ट प्रकारचे आउटगोइंग कॉल म्हणजे उदा. नको असलेले कॉल बंद करू शकतो, इनकमिंग कॉल बंद करू शकतो, तसेच इंटरनॅशनल नंबर वरुन येणारे फेक कॉल किंवा Unknown नंबर वरुन येणारे कॉल देखील याद्वारे बंद करू शकतो.


कॉल बॅरिंगसह आपण आपल्या फोनवरुन काही प्रकारचे कॉल ब्लॉक करू शकतो आणि येणारे कॉल देखील बंद करू शकतो.


* बऱ्याचदा आपल्यासोबत असे घडते, जेव्हा आपल्याला कोणी कॉल करुन त्रास देत असेल तर अश्या वेळस कॉल बॅरिंग चा उपयोग होतो. 


* आपल्याला वाटते की आपल्या मोबाईल मध्ये फक्त इनकमिंग कॉलच आले पाहिजे आणि आउटगोइंग कॉल बंद झाले पाहिजे तर अश्या वेळी पण कॉल बॅरिंग चा उपयोग होतो.

कॉल बॅरिंग च्या मदतीने,

* आउटगोइंग कॉल
* इनकमिंग कॉल
* इंटरनॅशनल कॉल
* रोमिंग कॉल
* Unknown नंबरवाले कॉल बंद (ब्लॉक) करू शकतो. 

कॉल बॅरिंग चालू आणि बंद करण्याचे दोन प्रकार आहेत. 

(1). शॉर्टकट कोड

शॉर्टकट कोड हा कॉल बॅरिंग चा प्रकार नाही पण आपण याला कॉल बॅरिंग प्रमाणे वापरू शकतो.
याला सुरू करण्यासाठी *31# हा नंबर डायल करा. डायल केल्यानंतर ही सेवा active होईल.

active झाल्यानंतर आपल्या मोबाईलचे सर्व आउटगोइंग कॉल ब्लॉक होतील. म्हणजेच आपण कोणताही प्रकारचे कॉल करू शकणार नाही.

ही sarvice deactivate बंद करण्यासाठी #31* हा नंबर डायल करा. डायल केल्यानंतर ही sarvice बंद होईल.

तर पाहू शकता आपण किती सोप्या पद्धतीने शॉर्टकट कोड वापरून आउटगोइंग कॉल ब्लॉक करू शकता. तर या sarvice ने आपण फक्त आउटगोइंग कॉलच ब्लॉक करू शकतो.

(2). कॉल सेटिंग

सर्वप्रथम आपण आपल्या फोन च्या कॉल setting मध्ये या >> कॉल बॅरिंग सिलेक्ट करा.
* जर आपल्याला कॉल बॅरिंग सापडत नसेल तर आपण Setting मध्ये call barring नावाने सर्च करा.
आपण येथे इनकमिंग कॉल, आउटगोइंग कॉल, इंटरनॅशनल कॉल, रोमिंग कॉल बंद (ब्लॉक) करू शकतो.

call barring

 यामधे आपल्याला जे कॉल ब्लॉक करायचे आहे ते सिलेक्ट करा. >> सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला एक कोड टाकायचा आहे. हा कोड आपल्या मोबाईलचा डिफॉल्ट कोड असू शकतो. जसे की, 1111, 0000, 1234 आणि आपल्याला हा कोड माहिती नसेल तर आपण नेटवर्क ऑपरेटर शी संपर्क साधू शकतो. अश्या प्रकारे आपण कॉल बॅरिंग चालू किंवा बंद करू शकतो. 



मला आशा आहे की, आपल्याला कॉल बॅरिंग म्हणजे काय? कॉल बॅरिंग कसे वापरावे? Call barring information in marathi कॉल बॅरिंगचे फायदे काय आहेत? हे समजले असेल. तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी फेसबुक आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करा.🙏🏻


1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने