Google map information in marathi आजच्या काळातील इंटरनेट ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि तसेच गूगल हि आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आजच्या काळात इंटरनेट हे असे माध्यम आहे की आपल्याला जगात कुठेही जायचे असेल किंवा मार्ग (रस्ता) शोधायचा असला तरी आपण आपल्या मोबाइल किंवा लॅपटॉप इंटरनेटच्या मदतीने सहजपणे मार्ग शोधू शकतो, म्हणजेच गूगल मॅप (Google Map) नकाशाच्या सहाय्याने जगातील कोणत्याही कोपर्यात जाण्याचा मार्ग शोधू शकतो. तर आजच्या पोस्टमधे आपण गूगल मॅप काय आहे? गूगल मॅप कसे वापरावे? गूगल मॅप चे फायदे काय आहेत? Google map information in marathi याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
गूगल मॅप म्हणजे काय? What is google map in Marathi
गुगल मॅप हा गुगल कंपनीद्वारा निर्मित केलेले एक अॅप्लिकेशन आहे, ते आपण आपल्या मोबाइल किंवा संगणकात वापरू शकतो, ज्याच्या मदतीने आपण कुठेही फिरू शकतो, आपल्याला मार्ग विचारण्याची देखील आवश्यकता नाही, फक्त आपल्याला त्या जागेचे नाव टाइप करावे लागेल आणि आपण कुठे आहात याचे देखील आपल्याला नाव टाइप करावे लागेल, त्यानंतर ते आपल्याला संपूर्ण मार्ग दाखवेल आणि आपल्याला तेथे जायला किती वेळ लागेल हे देखील सांगेल. गुगल मॅप वापरून आपण जगात कोठेही मार्ग शोधू शकतो. जर आपल्याला आपल्या जवळ कोणते हॉटेल आहे की नाही हे आपल्याला माहिती करून घ्यायचे असेल तर ते आपण गुगल मॅपच्या सहाय्याने सहजपणे करू शकतो. जर आपल्याला हॉटेल शोधायचे असतील तर आपल्याला फक्त हॉटेल चे नाव टाइप करण्याची गरज आहे.
आपल्या सारख्या फिरणार्या लोकांच्या वाढत्या या युगात मॅप नकाशाचा वापर खूप वाढला आहे. गुगल मॅप खासकरुन अनोळखी भागात खूप उपयुक्त आहे. जेथे आपल्याला काहीही माहिती नसते.
महत्वाचे म्हणजे आपल्याला गुगल मॅप डाउनलोड करण्याची गरज नाही आहे कारण प्रत्येक device मध्ये गूगल मॅप अगोदर पासूनच install केलेले आहे.
गुगल मॅप वापरण्याचे फायदे:
* आपण गुगल मॅप वर कोठेही जाण्यासाठी मार्ग शोधू शकतो.
* गुगल मॅप च्या मदतीने आपण आपल्या जवळील रेस्टॉरंट्स, पेट्रोल पंप, हॉटेल्स, शॉपिंग सेंटर इ सहजपणे शोधू शकतो.
* आपण बस चे किंवा रेल्वे चे टाइम चेक करु शकतो.
* आपण आपले रीयल टाइम लोकेशन आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकतो. रीयल टाइम लोकेशन पाठवण्याचे बरेच फायदे आहेत जर आपल्याला एखाद्या मित्राला भेटायचे असेल आणि त्या ठिकाणी खूप गर्दी असेल किंवा आपल्या मित्राला त्या जागेबद्दल माहिती नसेल तर आपण आपले रीयल टाइम लोकेशन आपल्या मित्राला शेअर करू शकतो. ज्यामुळे तो आपल्याला easily track करू शकतो.
गूगल मॅप कसे वापरावे? How to use Google map in Marathi
* सर्वप्रथम आपले GPS लोकेशन चालू करा. आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये गुगल मॅप उघडा.
* आता आपल्याला जेथे जायचे आहे त्या जागेचे नाव शोधायचे असेल तर आपल्याला त्या जागेचे नाव ईथे टाइप करावे लागेल (आपण माइक मध्ये देखील बोलू शकतो). मला मुंबई ला जायचे आहे त्या मुळे मी मुंबई टाइप केले.
* जागेचे नाव टाइप केल्यानंतर (Directions) डायरेक्शन्स वर क्लिक करा.
* नंतर ईथे (your location) च्या जागी ज्या जागेवरून आपल्याला जायचे आहे त्या जागेचे नाव टाइप करावे लागेल. तर मला पुण्यावरून जायचे आहे त्यामुळे मी पुणे टाइप केले आहे. टाइप केल्यानंतर आपल्या समोर रूट ओपन होईल.
आता आपल्याला कशाप्रकारे जायचे आहे ते आपण ईथे सिलेक्ट करू शकतो. उदा. कार, बाइक, रेल्वे आणि जर आपल्याला पैदल म्हणजे चालत जायचे असेल तर ते देखील आपण निवडू शकतो.
म्हणजेच आपल्याला पोहोचायला किती वेळ लागेल हे दाखवेल. तसेच किती किलोमीटर अंतर आहे हे देखील दाखवेल.
तर अश्याप्रकारे आपण गुगल मॅप (Google Maps) वापरू शकतो.
मला आशा आहे की, आपल्याला गूगल मॅप काय आहे? गूगल मॅप चे फायदे काय आहेत? Google map information in marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला Google maps कसे वापरावे हे समजले असेल. तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी फेसबुक आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करा.🙏🏻