ई-मेल आयडी म्हणजे काय?, ई-मेल ची संपुर्ण माहिती Email information in marathi

 

Email information in marathi आजचे युग हे पूर्णपणे ऑनलाईन तंत्रज्ञानाचे बनले आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात असा एकही व्यक्ति नसेल जो इंटरनेट, संगणक आणि मोबाईल यांच्याशी जोडलेला नसेल. या इंटरनेटच्या युगात आपल्यापैकी जवळपास सर्वांनीच "ई-मेल" (Email) हा शब्द नक्कीच ऐकला असेल. आपल्यापैकी बर्‍याच लोकांना या ई-मेल बद्दल माहिती असेल बरेच लोकं या ई-मेल चा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करतात. बरेच लोकं संदेश पाठविण्यासाठी ई-मेल चा वापर करतात.

ई-मेल_आयडी_म्हणजे_काय?_ई-मेल_ची_संपुर्ण_माहिती_Email_information_in_marathi

आजच्या इंटरनेटच्या काळात ईमेल आयडी नसणे ही मोठी कमतरता आहे. आजच्या काळात संवादाची अनेक साधने आहेत. परंतु ईमेल हे त्यांमधील सर्वात महत्त्वाचे साधन आहे. आपल्याला कोणत्याही व्यवसाय कार्यासाठी किंवा कोणत्याही नोकरीसाठी अर्जासाठी ईमेल वापरला जातो. बर्‍याच साईटवर साईन अप करण्यासाठी ई-मेल वापरला जातो.

ई-मेल हा संवादाचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रकार आहे. बर्‍याच ठिकाणी ई-मेल चा वापर व्यावसायिकपणे केला जातो. पण ज्यांना या ई-मेल बद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी हि पोस्ट महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण या पोस्टमधे आपण ई-मेल आयडी म्हणजे काय?, ई-मेल चा इतिहास, ई-मेल चे फायदे आणि तोटे, ई-मेल आयडी तयार करणे, Email information in marathi ई-मेल बद्दल सविस्तरपणे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत...

ई-मेल आयडी म्हणजे काय?, ई-मेल ची संपुर्ण माहिती Email information in marathi

What is email ID in marathi

Email चा Full Form आहे electronic mail.

ईमेल ही गूगल द्वारे निर्मित एक गूगलची विनामूल्य सेवा आहे. ईमेल हे इंटरनेट नेटवर्क आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसद्वारे संदेश पाठविणे आणि प्राप्त करण्याचे एक डिजिटल साधन आहे.

ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल. हा डिजिटल संदेशाचा एक प्रकार आहे जो वापरकर्ता दुसर्‍या वापरकर्त्याशी संवाद साधण्यासाठी वापरतो. ईमेल हा कुटुंब आणि मित्रांच्या संपर्कात राहण्याचा एक मार्ग आहे. या ईमेलमध्ये मजकूर, फोटो, बातम्या, फाइल्स किंवा कोणतेही संलग्नक देखील असू शकतात, जे नेटवर्कद्वारे एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा कोणत्याही व्यक्तींकडे पाठविले जाऊ शकतात.

संलग्नक ही एक फाईल असते, उदाहरणार्थ एखादा फोटो किंवा दस्तऐवज, जो ईमेलला इलेक्ट्रॉनिकदृष्ट्या "संलग्न" केला जातो.

 

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ईमेल म्हणजे एका संगणकावरून दुसर्‍या संगणकावर पत्र पाठविण्याची प्रक्रिया. आपण पोस्टद्वारे पत्र पाठवतो त्याच मार्गाने ईमेल पाठविणे हा आधुनिक प्रकार आहे.

ई-मेल हे घर, ऑफिस, शाळा, कॉलेज, कोर्ट, उद्योग, बँक किंवा कोणतेही सरकारी किंवा खाजगी कार्यालय मध्ये वापरले जाते.

जेव्हा आपण एका कॉम्प्यूटरवरून दुसर्‍या कॉम्प्यूटर मध्ये पत्रव्यवहार पाठवितो आणि प्राप्त करतो तेव्हा ईमेल हा शब्द वापरला जातो.

आजच्या डिजिटल युगात, ईमेल संवादाचे सर्वात लोकप्रिय प्रकार बनले आहे. या डिजिटल युगात, लोक पूर्वीपेक्षा लेखी दळणवळण वापरतात.

खरं तर, ईमेल संप्रेषण केवळ पत्र लेखनाच्या बदल्यातच नव्हे तर बर्‍याच सामाजिक परिस्थितींमध्ये आणि व्यावसायिक वातावरणात टेलिफोन कॉल्सच्या ठिकाणी देखील वापरला जातो.

कार्यालये, न्यायालये, शाळा, महाविद्यालये इत्यादीमध्ये ईमेल पाठविण्याचा आणि प्राप्त करण्याचा अधिकृत मार्ग ईमेल केला गेला आहे.

ईमेल हे कागदावर लिहिलेल्या पत्रासारखे आहे.  पेपर लेटर आणि ईमेल मधील फरक एवढाच आहे की, कागदावर पत्र लिहिण्यासाठी पेन. वापरला जातो आणि संगणकावरील प्रोग्राममध्ये ईमेल लिहिण्यासाठी (टाइप करण्यासाठी) कीबोर्ड वापरला जातो.

आपल्याला ईमेल पाठविण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी आपल्याला फक्त इंटरनेट डेटा पॅकची आवश्यकता आहे.  आपल्या डिव्हाइसमध्ये (संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन इ.) सक्रिय डेटा पॅक असल्यास.  मग आपण ईमेल विनामूल्य पाठवू आणि प्राप्त करू शकता.

ई-मेल चा इतिहास

ई-मेलचा शोध कोणी लावला?

रे टॉमलिन्सन (Ray Tomlinson) यांनी ईमेलचा शोध लावला.

ई-मेल सेवेचा इतिहास आपल्याला "अर्पानेट” पर्यंत मागे घेऊन जातो. 1971 मध्ये रे टॉमलिन्सन यांनी इलेक्ट्रॉनिक मेल या प्रणालीला विकसित केले.

1972 मध्ये ARPANET द्वारे जगातील प्रथम ईमेल संगणकावरून संगणकावर पाठविला गेला होता. रे टॉमलिन्सन यांनी तो ई-मेल स्वत: ला चाचणी ई-मेल संदेश म्हणून फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल (FTP) च्या प्रणालीनुसार पाठविला होता, ज्यात त्यांनी “QWERTYUIOP“ हा मजकूर लिहिलेला होता. टॉमलिन्सन यांनी सर्वप्रथम @ चिन्ह निवडले होते. म्हणूनच त्यांना ई-मेल चे शोधक म्हटले जाते.

1978 मध्ये अय्यदुरई यांनी एक कॉम्प्युटर प्रोग्राम विकसित केला त्यास ई-मेल म्हटले गेले. त्यात इनबॉक्स, आउटबॉक्स, फोल्डर्स, मेमो, संलग्नक पर्याय होते.

30 ऑगस्ट 1982 रोजी अमेरिकन सरकारने भारतीय अमेरिकी विए शिवा अय्यदुरई यांना ईमेलचा शोधकर्ता म्हणून अधिकृतपणे मान्यता दिली.

१९७० मध्ये पाठवले गेलेले ई-मेल आणि आजचे फक्त शब्दबद्ध मजकूर असलेले ई-मेल यांमध्ये कमालीचे साम्य आहे.

➡️गूगल ड्राईव्ह म्हणजे काय? कसे वापरावे?

➡️गूगल मॅप काय आहे? कसे वापरावे?

जगभरातील लोक एकमेकांना मेल पाठवतात आणि प्राप्त करतात.  आपण आपल्या मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना, सहकार्यांना ईमेल पाठवू शकतो. पण यासाठी आपल्याला कडे ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. ईमेल आयडी असेल तरच आपण एकमेकांना मेल पाठवू आणि प्राप्त करू शकतो.

आता तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की ईमेल आयडी कसा तयार करावा? चला तर मग जाणून घेऊया...

ईमेल आयडी तयार करणे

ईमेल I'd तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत.

1. स्मार्टफोन
2. संगणक किंवा लॅपटॉप

तर आपण स्मार्टफोन मध्ये ईमेल I'd कसा तयार करावा याबद्दल जाणून घेऊया. कारण स्मार्टफोन सगळ्यांकडे असतो आणि संगणक किंवा लॅपटॉप सगळ्यांकडे नसतात.

ईमेल ची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ईमेल हे अॅप डाउनलोड करण्याची देखील आवश्यकता नाही कारण ते प्रत्येक स्मार्टफोन मध्ये आधीपासूनच install केलेले आहे. आणि install नसेल तर ते आपण प्ले स्टोर मधून सहजपणे install करू शकतो...

स्मार्टफोन मध्ये ईमेल आयडी कसा तयार करावा?

वर सांगितल्याप्रमाणे ईमेल आयडी तयार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आणि सुलभ आहे. 

ईमेल आयडी तयार करण्यापुर्वी आपल्याकडे मोबाईल, संगणक, लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन असले आवश्यक आहे.

स्मार्टफोन मध्ये ईमेल आयडी तयार करण्यासाठी सर्वप्रथम Gmail अॅप वर या. Gmail अॅप वर आल्यानंतर Gmail अॅप ला उघडा.

टीप : आता मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आपल्याला तर ईमेल आयडी तयार करायची होती आणि आम्ही gamil I'd तयार करण्यासाठी सांगतोय. तर मित्रांनो आपण एकदा ईमेल आणि जीमेल यांमधील फरक समजून घ्या...

ईमेल आणि जीमेल यांमधील फरक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. Click here

Gmail अॅप उघडा. >> नंतर डाव्या साईडला असलेल्या वरच्या ऑप्शन (menu) वर क्लिक करून settings बटनावर क्लिक करा. >> नंतर Add account वर क्लिक करून Google ला सिलेक्ट करा.

>> नंतर Create account वर क्लिक करून For myself ऑप्शन वर क्लिक करा. आता आलेल्या स्क्रीन मध्ये आपले नाव आणि आडनाव टाका आणि Next बटनावर क्लिक करा.

>> आता आपली जन्मतारीख आणि Gender निवडा आणि Next बटनावर क्लिक करा. नंतर आपल्यासमोर काही Gmail ID दिसतील आपल्याला त्यामधील Gmail ID पाहिजे असेल तर ती Gmail ID निवडा नाहीतर आपल्याला आपल्या मनासासारखी Gmail ID पाहिजे असेल तर Create your own Gmail address या ऑप्शन वर क्लिक करून टाइप करा आणि Next बटनावर क्लिक करा.

>> नंतर पासवर्ड सेट करा आणि Next बटनावर क्लिक करा आता आलेल्या स्क्रीन मध्ये स्क्रोल डाऊन करा आणि Yes I'm in ऑप्शन क्लिक करा आणि Next बटनावर क्लिक करा. परत स्क्रोल डाऊन करा आणि I agree बटनावर क्लिक करा.

आता आपली Gmail ID पूर्णपणे तयार झाली. आपल्याला ईमेल प्रोग्रामद्वारे एक Gmail ID  देण्यात आली. उदाहरणार्थ माझी ई-मेल आयडी indiantech555@gmail.com अशी आहे.

ई-मेल बद्दल मूलभूत माहिती Email Address means in marathi

आपण तयार केल्याला ईमेल आयडीमध्ये प्रामुख्याने तीन भाग असतात.

1. युजरनेम
ज्याला आपण वापरकर्तानाव देखील म्हणतो.
ईमेल आयडीच्या @ च्या आधी युजरनेम हा एक भाग असतो. हे ईमेल खात्यात लॉग इन करण्यासाठी वापरले जाते आणि ही त्या व्यक्तीची ओळख असते जे ईमेल पाठवते आणि प्राप्त करते.

2. डोमेन नेम
ईमेल पत्त्यातील @ नंतरचा एक भाग म्हणजे डोमेन नेम. हे सर्व्हर चे नाव असते जेथून आपली माहिती इंटरनेटद्वारे एक्सचेंज केली जाते.

वर दर्शविलेल्या ईमेल पत्त्यामध्ये, gmail.com हे एक डोमेन नाव आहे. ज्यामध्ये एक उच्च स्तरीय डोमेन देखील संलग्न आहे. येथे .com एक उच्च स्तरीय डोमेन आहे.

3. @ चिन्ह
@ या चिन्हाला “ॲट द रेट” म्हणतात. प्रत्येक ई-मेल मध्ये @  हे चिन्ह वापरलेले असते. या चिन्हाद्वारे ई-मेल वापरणाऱ्याचे नाव आणि ई-मेल सेवा देणाऱ्या वेबसाइट (डोमेन) चे नाव वेगळेवेगळे केले जाते. हा ईमेल आयडीचा उपयुक्त भाग आहे.

➡️GPS म्हणजे काय हे कशासाठी वापरले जाते?

➡️हॅलो! गुगल असिस्टंट काय आहे? कसे वापरावे?

ईमेल लेखनाचे स्वरूप

From: प्रेषकचा ईमेल पत्ता
येथे आपल्या Gmail ID चा address असतो. म्हणजे आपल्या ईमेल आयडीद्वारे समोरच्या व्यक्तीला मेल पाठवला जातो.

To: प्राप्तकर्त्याचा ईमेल पत्ता
येथे आपल्याला ज्याला ईमेल पाठवायचा आहे त्याचा ईमेल पत्ता प्रविष्ट करावा लागतो. आपण एखाद्या कंपनीला ईमेल करू इच्छित असल्यास आपल्याला कंपनीचा ईमेल पत्ता टाकावा लागतो.

Cc: कार्बन कॉपी
जेव्हा आपल्याला एकच ईमेल 2 किंवा अधिक ईमेल पत्त्यांवर पाठवायचा असेल तेव्हा Cc वापरला जातो.  म्हणजे आपण एकापेक्षा अधिक प्राप्तकर्त्यांना समान संदेश पाठविण्यासाठी Cc वापरू शकतो.

Bcc: ब्लाइंड कार्बन कॉपी
बीसीसी म्हणजे अंध कार्बन कॉपी. सीसी प्रमाणेच हे एकापेक्षा जास्त लोकांना मेल पाठविण्यासाठी देखील वापरले जाते. परंतु ईमेलद्वारे Bcc, To आणि Cc मध्ये लिहिलेला ईमेल पत्ता Bcc ईमेल पत्ता पाहू शकत नाही.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर Bcc हा ई-मेल च्या प्रती इतर लोकांना पाठविण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा Cc वापरला जातो तेव्हा आपण प्राप्तकर्त्यांची यादी पाहू शकतो, परंतु Bcc मध्ये प्राप्तकर्त्यांची यादी पाहू शकत नाही, हा या दोघांमधील फरक आहे.

Subject: आपला विषय येथे लिहायचा
आपण ईमेल का लिहित आहात, आपल्याला त्याचा विषय लिहावा लागेल. जेणेकरुन आपण ईमेल का पाठविला हे प्राप्तकर्त्यास प्रथम समजते.

Attach 📎: या ऑप्शन द्वारे आपण पीडीएफ, इमेज यांसारख्या फाईल जोडू शकतो.

Compose: कंपोज म्हणजे लिहिणे. आपल्याला एखाद्याला ईमेल पाठवण्यासाठी Compose चा वापर होतो.

जर आपल्याला एखाद्याला ईमेल पाठवायचा असेल तर आम्ही त्याबद्दल पूर्ण माहिती खाली दिली आहे. आपण ते पाहू शकता.

ई-मेल कसा लिहायचा? How to write email in marathi

आजच्या डिजिटल काळात ई-मेल लेखन खूप महत्त्वाचे झाले आहे. पत्राप्रमाणे आपण दोन प्रकारचे ईमेल लेखन करू शकतो.

1. अनौपचारिक
औपचारिक पत्रांमध्ये मित्र, नातेवाईक, इ. समाविष्ट असतात.

उदाहरण 1: अनौपचारिक ई-मेल लिहिला आहे.

From: xyz@gms.com
To: cdf@abc.com

Cc / Bcc (आपल्याला आवश्यक असल्यास Cc आणि Bcc ओळ भरा)

विषय: घरी येण्याचे आमंत्रण

प्रिय मित्र मनोज

गेली दोन वर्षे आपली भेट झाली नाही. येत्या 19 तारखेला माझ्या घरामध्ये कार्यक्रम आहे. म्हणून तुला हे कळविण्यात मला आनंद होतो की 19 मार्च या दिवशी तुला येथे यायचे आहे. तू आल्याने आपण दोघे मिळून माहूरगड ला जाऊ. माझ्या घरचे देखील तुला भेटायला उत्सुकतेत आहेत.

म्हणून मी तुला आता खास आमंत्रण देत आहे की,
तुला माझ्या घरी कार्यक्रमाला येणे आवश्यक आहे.

तुझा मित्र गणेश


2. औपचारिक
औपचारिक पत्रांमध्ये कंपनीचे ई-मेल, शासकीय ई-मेल, बिझनेस साठीचे ई-मेल इ. समाविष्ट असतात.

उदाहरण 2: औपचारिक ई-मेल लिहिला आहे. 

From: xyz@gms.com
To: cdf@abc.com

Cc / Bcc (आपल्याला आवश्यक असल्यास Cc आणि Bcc ओळ भरा)

विषय: गटार दुरुस्तीसाठी विनंती

मा. महोदय,

गोकुळधाम सोसायटीचा मुख्य गटार तुटल्याने नाल्याचे अस्वच्छ पाणी रस्त्यावर आले आहे.  घाण पसरत आहे.  म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की कृपया या नाल्याची दुरुस्ती करावी.

मला आशा आहे की आपण ही दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण कराल.

आपला विश्वासू,
गणेश

ईमेल पाठविण्यासाठी, ईमेल पत्ता आवश्यक आहे. संगणकावरून जसा ईमेल पाठविला जातो तसाच स्मार्टफोनवरून देखील ईमेल पाठविला जाऊ शकतो.

ई-मेल वापरण्यासाठी महत्त्वाची माहिती

ई-मेल ID तयार केल्यानंतर आता ई-मेलच्या मूलभूत गोष्टींबद्दल बोलूया...

ई-मेल वापरण्यापूर्वी आपणास ई-मेलच्या मूलभूत गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला ईमेल बद्दल माहिती होईल आणि आपण ई-मेल चांगल्याप्रकारे वापरू शकू.

ई-मेल वापरण्यासाठी आपल्याला या गोष्टींबद्दल माहित असणे आवश्यक आहे.

All inboxes: जेव्हा कोणी आपल्याला ई-मेल पाठवते तेव्हा ते आपल्या इनबॉक्समध्ये येथे, जिथून आपण ते वाचू किंवा हटवू शकतो.

Starred: आपल्याला बर्‍याच प्रकारचे ईमेल प्राप्त होत असतात. पण काही ई-मेल उपयोगाचे असतात तर काही ईमेल उपयोगाचे नसतात. तर या ऑप्शन द्वारे ईमेल तारांकित (Starred) ठेवून हे स्वतंत्रपणे जतन करू शकतो.

Snozzed: आपल्याला एखादा मेल वेळेच्या नंतर माहीत होण्यासाठी या ऑप्शन चा उपयोग होतो.

Important: जर आपल्यासाठी एखादे ईमेल खूप महत्वाचे असेल तर ते आपण या ऑप्शन मध्ये स्वतंत्रपणे जतन करू शकतो.

Sent: या ऑप्शन मध्ये आपण पाठवलेले सर्व मेल असतात.

Schedule: येथे आपण ईमेल पाठविण्यासाठी वेळ सेट करू शकतो.

Outbox: आपण एखादा ईमेल पाठवला आणि तो समोरच्या व्यक्तीला अजून पोहोचला नाही तर तो मेल पोहोचायच्या अगोदर या फोल्डर मध्ये दिसतो. पोहचल्यानंतर तो मेल automatically या फोल्डर मधून निघून जातो.

Drafts: जेंव्हा आपण एखादा ईमेल पाठविण्यासाठी टाइप करतो पण अचानक आपण तो टाइप केलेला ईमेल पाठवायचं विसरलो. म्हणजेच टाइप करून ईमेल सोडल्यास आपल्याला ते फक्त या ड्राफ्टच्या (Drafts) फोल्डरमध्ये मिळतो. आणि नंतर ते ईमेल पुन्हा संपादित करून कोणालाही पाठवू शकतो.

All mail: या ऑप्शन मध्ये आपले सर्व मेल असतात.

Spam: आपल्याला बर्‍याच प्रकारचे ईमेल प्राप्त होत असतात. पण काही ई-मेल Spam असतात. तर ते Spam असलेले ई-मेल या फोल्डर मध्ये जमा होतात.

Bin: या ऑप्शन मध्ये आपण डिलीट केलेले सर्व ईमेल 30 दिवसांपर्यंत असतात. म्हणजेच 30 दिवसानंतर ते स्वयंचलितपणे हटविले जातात.

Settings: या ऑप्शन मध्ये ईमेलची सर्व सेटिंग असते.

Help and feedback: ईमेल वापरताना आपल्याला काही प्रॉब्लेम आल्यास या ऑप्शन द्वारे आपण ईमेल च्या टीम शि मदत मांगू शकतो.

ई-मेल चे फायदे आणि तोटे

ई-मेल चे फायदे

आपण ज्या ठिकाणी राहतो तो आपला प्रत्यक्ष पत्ता असतो, त्याच प्रकारे ईमेल हा आपला व्हर्च्युअल पत्ता आहे. जर एखाद्यास आपल्याशी ऑनलाइन संपर्क साधायचा असेल तर तो आपल्याला ईमेलद्वारे संदेश पाठवू शकेल, जो त्वरित आपल्यापर्यंत पोहोचेल. म्हणूनच आजकाल प्रत्येकजण ईमेल सेवा वापरतो.

ईमेल एक सुरक्षित आणि विश्वासार्ह साधन आहे. हे खासगी आणि सुरक्षिततेसाठी बनविलेले साधन आहे.  ईमेल उघडण्यासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड आवश्यक आहे. जे केवळ योग्य ईमेल आणि पासवर्ड ने उघडले जाऊ शकते.

ईमेल जगातील एक लोकप्रिय विनामूल्य गुगलची सेवा आहे. म्हणूनच ईमेल पाठविण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही.

ईमेलचे प्रथम कार्य म्हणजे संप्रेषण. आणि हे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी विकसित केले गेले आहे.

ई-मेल चा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे हे जगातल्या कोणत्याही काना कोपऱ्यात वापरले जाणारे प्रभावी साधन आहे.

ईमेल द्वारे आपण इंटरनेटच्या मदतीने आपल्यापासून खूप दूर राहणाऱ्या लोकांशीही संपर्क साधू शकतो.

द्रुत संप्रेषणासाठी ईमेल ही अतिशय सोयीची पद्धत आहे. या ईमेलची वितरण गती खूप वेगवान आहे.  याद्वारे लोकांना त्वरित माहिती मिळते. जेथे लोक एकमेकांशी सहज संवाद साधू शकतात.

ईमेल आपल्या ईमेल प्रोग्राममध्ये सहजपणे संग्रहित केला जाऊ शकतो.  त्यामुळे आपण आपल्या ईमेलवर कधीही आणि कोठेही प्रवेश करू शकतो.

आपण केवळ शब्दांद्वारेच ईमेल पाठवू शकत नाही तर आपण आपले फोटो, महत्त्वाचे कागदपत्रे, व्हिडिओ इ. पाठवू शकतो.

ईमेल मध्ये असलेल्या संलग्नकाच्या वैशिष्ट्यामुळे आपण स्प्रेडशीट, अहवाल, प्रतिमा किंवा कोणतीही फाइल ईमेलसह संलग्न करू शकतो. यासह आपल्याला ती गोष्ट स्वतंत्रपणे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ईमेल आपल्या सर्व संप्रेषणाची नोंद प्रदान करतो. आपण कोणाशी काय संवाद साधला आणि त्याने काय उत्तर दिले याची सर्व माहिती आपल्याकडे असते. आपण कधीही ती माहिती पाहू शकतो. आपण त्यांचे प्रिंट आउट देखील काढू शकतो.  जोपर्यंत आपण हेतूपूर्वक त्यांना हटवत नाही तोपर्यंत ते आपल्या ईमेल मध्ये सेव्ह असतात.

मजकूर पाठविण्याशिवाय, आपल्याला ईमेलमध्ये लिहिण्यासाठी पाहिजे तितकी अमर्यादित जागा मिळते. यासह आपण हा ईमेल आपल्याला पाहिजे तितका वेळ देऊन लिहू शकता, पाठविण्यापूर्वी आपण त्यामध्ये सुधारणा करू शकता.

ईमेल मुळे मोठ मोठ्या व्यवसायांना चालना मिळाली आहे. आपल्याकडे ईमेल आयडी असेल तर आपण आपल्या व्यवसायाशी संबंधित ईमेल पाठवून आपला व्यवसाय वाढवू शकतो.

दूरसंचार कॉलिंग आणि फिजिकल मेल संदेशांसारख्या इतर प्रकारच्या संवादाच्या विपरीत, बहुतेक ईमेल प्रदाता वापरकर्त्यांना ईमेल खात्यावर विनामूल्य प्रवेश प्रदान करतात. आपण आपला ईमेल पत्ता निवडू शकता आणि त्या ईमेल आयडीवरून आपण आपल्याला पाठविलेला सर्व इलेक्ट्रॉनिक मेल पाठवू आणि प्राप्त करू शकता.  तसेच, यासाठी तुम्हाला एक पैसाही खर्च करावा लागणार नाही.

ई-मेल चे तोटे

ईमेल पाठविण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.

आपण ईमेलमध्ये मोठ्या आकाराच्या फायली पाठवू शकत नाही. त्याला एक मर्यादा आहे.

आपण ईमेलमध्ये काही प्रकारच्या फायली पाठवू शकत नाही.  जसे .exe

ईमेल स्पॅमचा एक प्रकार आहे, आपल्याला दररोज अधिक स्पॅम मेल येत असतात ज्यामधे आपल्याला योग्य ईमेल शोधणे अवघड जाते.

प्रत्येकासाठी ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. त्यामुळे जगभरामध्ये मोफत ऑनलाईन ई-मेल सेवा देणाऱ्या जी-मेल, हॉटमेल, याहू, रिडीफ या प्रमाणे शेकडो वेबसाइट आहेत. परंतू भारतामध्ये या चार वेबसाइट प्रसिद्ध आहेत.

मला आशा आहे की, आपल्याला ई-मेल आयडी म्हणजे काय?, ई-मेल चा इतिहास, ई-मेल चे फायदे आणि तोटे, ई-मेल आयडी तयार करणे, Email information in marathi ई-मेल बद्दल सविस्तरपणे संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना हि पोस्ट शेअर करायला विसरू नका. ☺️

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻

➡️Twitter म्हणजे काय? ट्विटर अकाउंट कसे चालवावे? 



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने