ईमेल आणि जीमेल मध्ये काय फरक आहे? Email And Gmail Difference In Marathi


Email And Gmail Difference In Marathi मित्रांनो आजच्या डिजिटल ऑनलाईन काळात ईमेल पाठवणे इतके महत्त्वपूर्ण झाले आहे की, सर्व काम ईमेलद्वारे केले जात आहेत. उदा. एखाद्याला व्यवसायाबद्दल ईमेल करणे, एखाद्याला काही महत्त्वाचे कागदपत्र पाठवायचे असेल किंवा एखाद्याला नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी ईमेल खूप महत्त्वाचे आहे.

ईमेल_आणि_जीमेल_मध्ये_काय_फरक_आहे?_Email_And_Gmail_Difference_In_Marathi

आजकाल प्रत्येक व्यक्तीकडे निश्चितपणे एक ईमेल आयडी असतो जो आजच्या जगात खूप महत्वाचा आहे. आजकाल बहुतेक कामे फक्त ईमेलच्या मदतीने केली जातात. परंतु बर्‍याचदा लोक ईमेल आणि जीमेल या दोघांमध्ये कंफ्यूज होतात. खरं तर, ईमेल आणि जीमेल या दोहोंच्या नावांमधील समानतेमुळे बर्‍याच लोकांना असे वाटते की ते समान आहेत की भिन्न आहेत. म्हणून मित्रांनो आजच्या पोस्टमधे आपण ईमेल म्हणजे काय?, जीमेल म्हणजे काय? ईमेल आणि जीमेल मध्ये काय फरक आहे? Email And Gmail Difference In Marathi याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत... 

ईमेल आणि जीमेल मध्ये काय फरक आहे? Email And Gmail Difference In Marathi

ईमेल आणि जीमेल मधील सर्व फरक समजण्यासाठी, आपल्याला प्रथम ईमेल म्हणजे काय आणि जीमेल काय आहे हे माहित असणे आवश्यक आहे. चला तर मग या दोघांमधील फरक जाणून घेऊया...Difference Between Email And Gmail In Marathi

ईमेल म्हणजे काय? What Is Email In Marathi

Email Meaning In Marathi

ईमेलचे संपूर्ण नाव इलेक्ट्रॉनिक मेल आहे, ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे आपण इंटरनेटच्या मदतीने कोणालाही पत्र पाठवू शकतो. ईमेल हा डिजिटल संदेशाचा एक प्रकार आहे जो वापरकर्ता दुसर्‍या वापरकर्त्याशी संवाद साधण्यासाठी वापरतो.

जीमेल म्हणजे काय? What Is Gmail In Marathi

Gmail Meaning In Marathi

जीमेल हे गूगल मेल (Google mail) चे एक संक्षिप्त रूप आहे.

जीमेल ही Google द्वारा निर्मित केलेली एक विनामूल्य ईमेल सेवा आहे. हि सेवा गुगलने एप्रिल, 2004 रोजी लाँच केली होती. या जीमेल चा उपयोग कोणालाही ईमेल पाठविण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी केला जातो. म्हणजे जर आपल्याला एखाद्याला ईमेल पाठवायचा असेल तर आपल्याला त्या जीमेल सेवेची मदत घ्यावी लागते.

म्हणजे जर आपल्याला कोणाला ईमेल पाठवायचे असेल तर आपल्याकडे असे माध्यम असले पाहिजे ज्याद्वारे आपण ईमेल पाठवू शकू, तर हे जे माध्यम आहे ते म्हणजे जीमेल. आपण पाठवलेला ईमेल दुसर्‍या व्यक्तीस पाठवण्याचे काम जीमेल करते.

आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया...

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, आपण लिहिलेले पत्र एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहचविण्याचे काम कोण करतो? तर पूर्णपणे पोस्टमॅन करतो.

त्याचप्रकारे एका संगणकावरून दुसर्‍या संगणकावर ईमेल पोहोचविण्याचे काम जीमेल करतो.

म्हणजे आपण असे म्हणु शकतो,      

पत्र = ईमेल
पोस्टमन = जीमेल

➡️ई-मेल आयडी म्हणजे काय?, ई-मेल ची संपुर्ण माहिती

मला आशा आहे की, आपल्याला ईमेल म्हणजे काय?, जीमेल म्हणजे काय? ईमेल आणि जीमेल मध्ये काय फरक आहे? Email And Gmail Difference In Marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना हि पोस्ट शेअर करायला विसरू नका. ☺️

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने