GPS म्हणजे काय हे कशासाठी वापरले जाते? GPS Information In Marathi

GPS meaning in marathi मित्रांनो आपल्याला तर माहितच आहे की, दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी ही वाढत चालली आहे. आजचे जग हे ईतके समोर गेले आहे की मनुष्याने चंद्रावर जाण्याचा देखील मार्ग काढला आहे आणि मनुष्य चंद्रावर पण जाऊन आलेला आहे. जर मनुष्य चंद्रावर पोहोचू शकतो तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी सहजपणे जाऊ शकतो. माणसाच्या याच कार्याला अधिक सुलभ करण्यासाठी टेक्नॉलॉजीने एक फीचर्स तयार केले आहे ज्याला आपण (GPS) जी पी एस या नावाने ओळखतो. आपल्यापैकी बर्‍याच लोकांना GPS म्हणजे काय हे कशासाठी वापरले जाते? GPS Information In Marathi हे माहिती नसेल, तर आजच्या पोस्टमधे आपल्याला GPS बद्दल संपूर्ण माहिती वाचायला मिळेल. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.


GPS म्हणजे काय हे कशासाठी वापरले जाते? GPS Information In Marathi

GPS म्हणजे काय हे कशासाठी वापरले जाते? GPS Information In Marathi


What is GPS in marathi

GPS चा पूर्ण फॉर्म ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम(Global Positioning System).

जी पी एस म्हणजे काय? तर हे एक अंतरिक्ष जागतिक नेव्हिगेशन सिस्टम उपग्रह प्रणाली आहे. जी आपल्याला आपल्या पोजीशन लोकेशन बद्दल सांगते. तसेच GPS आपल्याला वेग आणि वेळ संकालनाबद्दल माहिती देते. एका प्रकारे हे आपली दिशा ठरवते आणि आपल्याला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी Satellite च्या मदतीने रस्ता दाखवते.

GPS कशाप्रकारे काम करतो?

GPS मॅप हा Satellite द्वारा काम करतो. या Satellite वरुण पृथ्वीवर सिग्नल पाठविले जातात. GPS या सिग्नल ला जोडण्याचे काम करतो. Satellite वरुण जे सिग्नल येतात GPS या सिग्नल ला मॅप मध्ये दाखवतो. आपल्या पृथ्वीच्या चार ही बाजूंनी हे satellite परिक्रमा घालत असतात. अमेरिकेने 70 हून अधिक GPS Satellite तयार केलेले आहेत. प्रत्येक Satellite हा 24 तास सिग्नल पाठवीत असतो. त्यामुळे प्राप्तकर्त्यास त्या सिग्नलची वेळ आणि अंतर देखील प्राप्त होते. आणि आपल्या फोनला सिग्नल मिळाल्यास आपल्याला आपले लोकेशन कळते.

➡️ई-मेल आयडी म्हणजे काय? 

जी पी एस चा इतिहास GPS history in marathi

GPS ही टेक्नॉलॉजी सर्वात पहिले अमेरिकेच्या संरक्षण विभागाने 1960 या साली तयार केली होती. त्यावेळी ही टेक्नॉलॉजी फक्त Us Army ला वापरण्यासाठी बनविली होती वर्ष 2000 च्या नंतर सामान्य लोकांनी आणि कंपन्यांनी GPS चा वापर चांगल्याप्रकारे केला त्यामुळे GPS ला नवीन उंची गाठण्याचा मार्ग मिळाला. आणि आपल्याला आता ही टेक्नॉलॉजी सर्वच स्मार्टफोन मध्ये पाहायला मिळते.

GPS चा वापर

GPS हा वैज्ञानिक, नाविक, आणि सर्वेक्षण करणारा यांच्या कार्याचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे.

GPS चा वापर current लोकेशन शोधण्यासाठी, सर्वेक्षण करण्यासाठी, नॅव्हिगेट करण्यासाठी, आणि एखाद्या व्यक्तीचे स्थान शोधण्यासाठी वापर केला जातो. आता GPS ही टेक्नॉलॉजी ईतकी वापरली गेली आहे की, आपल्याला ती स्मार्टफोन, विमान, रेल्वे, बस यांमध्ये पाहायला मिळते.


GPS चा उपयोग सर्वसाधारणपणे पाच प्रकारे केला जातो.
1. Location (स्थान) – स्थान ओळखणे.
2. Navigation (नेविगेशन) – एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणे.
3. Tracking (ट्रैकिंग) – वैयक्तिक किंवा अवैयक्तिक हालचालींचे निरीक्षण करणे.
4. Mapping (मॅपिंग) – जगभराचे नकाशे तयार करणे.
5. Timing (वेळ) – अचूक वेळ मोजणे.

GPS कसे चालू करावे?

GPS चालू करण्याचे दोन प्रकार आहेत.
1. आपल्या मोबाईल चि वरची साइड खालच्या बाजूला Swipe करा. GPS आयकॉन वर क्लिक करा. आता आपल्या मोबाईल चे GPS चालू झालेले आहे.

जर आपल्यालाकडे Vivo सारखा मोबाईल असेल तर आपल्या मोबाईल चि खालची साइड वरच्या बाजूला Swipe करा. GPS आयकॉन वर क्लिक करा. आपल्या मोबाईल चे GPS चालू झालेले आहे.

2. GPS चालू करण्यासाठी सर्वप्रथम setting उघडा. नंतर >> Additional settings >> privacy >> location >> High accuracy.



GPS On


➡️गूगल मॅप काय आहे? गूगल मॅप कसे वापरावे?


मला आशा आहे की, आपल्याला GPS म्हणजे काय हे कशासाठी वापरले जाते? GPS Information In Marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला GPS कशाप्रकारे काम करतो? हे समजलेच असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना किंवा फेसबुक आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻


1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने