बेस्ट 30+ स्वच्छ भारत अभियान स्वच्छता घोषवाक्य मराठी - Slogans On Cleanliness In Marathi

Slogans On Cleanliness In Marathi मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे जेथे स्वच्छता असते तेथे निरोगी मनाचा विकास होतो. म्हणजेच स्वच्छता केवळ व्यक्तीच्या विकासातच मदत करत नाही तर देशाला प्रगतीकडे नेण्यासही प्रवृत्त करते. यामुळे देशाच्या विकासाला पाठिंबा मिळण्यास मदत होते. म्हणूनच आपल्या सर्वांनी स्वच्छतेचे महत्त्व समजून घेतले पाहिजे.

स्वच्छ-भारत-अभियान-स्वच्छता-घोषवाक्य-मराठी-Slogans-On-Cleanliness-In-Marathi

स्वच्छ भारत अभियान ही भारत सरकारने सुरू केलेली राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छता मोहीम आहे. स्वच्छ आणि निरोगी देश निर्माण करण्याच्या उद्देशाने, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 'स्वच्छ भारत अभियान' सुरू केले. या मोहिमेचे उद्देश आपल्या भारताला स्वच्छ आणि निरोगी देश निर्माण करण्याचे आहे.

स्वच्छता खूप महत्वाची आहे, जर आपण स्वच्छ राहिलो नाही तर आपण स्वस्थ राहू शकणार नाही.

या मोहिमेअंतर्गतअंतर्गत देशभरात योग्य स्वच्छता वापरुन लोकांची मानसिकता बदलणे, शौचालयाच्या वापरास प्रोत्साहन देणे आणि जनजागृती करणे, घन व द्रव असलेल्या कचर्‍याचे आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन वैज्ञानिक पद्धतीने सुनिश्चित करणे, ग्रामीण व शहरी भागातील परिसर, रस्ते, नद्या इ. स्वच्छ करणे.

म्हणून स्वच्छतेवर लिहिलेल्या घोषवाक्यांच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान या मोहिमेस प्रोत्साहन देण्यात आले आहे. या स्वच्छता घोषवाक्यांच्या मदतीने आपण आपल्या देशातील सर्व लोकांना स्वच्छतेबद्दल सांगू शकतो, लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जनजागृती करू शकतो. या घोषणामुळे या उपक्रमामध्ये अधिकाधिक लोक सहभागी झाले आहेत.

➡️स्वच्छ भारत अभियान मराठी निबंध

खाली काही सर्वत्कृष्ट स्वच्छ भारत अभियानाची व स्वच्छतेची घोषवाक्य मराठीमध्ये दिली आहेत.

स्वच्छ भारत अभियान घोषवाक्य मराठी - Slogans On Cleanliness In Marathi


▪ सगळीकडे चालवू स्वच्छता अभियान, तरच होईल देश महान. 

▪ स्वच्छ निर्मल जीवन, सुंदरतेचे वळण.

▪ स्वच्छता हीच आपल्या देशाची सेवा.

▪ स्वच्छ भारत, आरोग्य संपन्न भारत.

▪ स्वच्छ घर, स्वच्छ परिसर.

▪ स्वच्छ गाव, सुंदर गाव.

▪ स्वच्छते विषयाची प्रत्येक कृती, देईल सामाजिक आरोग्याला गती.

▪ स्वच्छतेला जवळ करू, बिमारीला दूर करू.

▪ स्वच्छ ठेवू आपला देश, बनवू महान भारत देश.

▪ स्वच्छतेला जवळ करू, भारताला स्वच्छ बनवू.

▪ स्वच्छतेचा मंत्र ध्यानी धरू, आरोग्य आपले निरोगी करू.

▪ स्वच्छतेची ज्योत लावू, बिमारीला पळवून लावू.

▪ स्वच्छतेची जेथे प्रचिती, आरोग्याला तेथे वस्ती.

▪ स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू.

▪ विकास धरीता स्वच्छतेची, मिळते हमी आरोग्याची.

▪ स्वच्छ ठेवू आपले परिसर, आरोग्य लाभेल निरंतर.

▪ करूया स्वच्छतेशी दोस्ती, मिळवूया रोगापासून मुक्ती.

▪ शौचालयाचा वापर करा, आरोग्याचा मंत्र खरा.

▪ स्वच्छ घर, स्वच्छ अंगण, स्वच्छ परिसर, शौचालयाचा करूया वापर.

▪ आपण सर्व मिळून एक काम करू, शौचालयाचा वापर करू.

▪ शौचालय असे जेथे, खरी प्रतिष्ठा येईल तेथे.

▪ कचरा कुंडीत टाका, परिसर स्वच्छ करा.

▪ कचरा कुंडीचा वापर करू, सुंदर परिसर निर्माण करू.

▪ करून परिसर स्वच्छता, करा रोगराईची सांगता.

▪ जो करणार स्वच्छतेचे नियंत्रण, त्याला मिळेल आजाराचे आमंत्रण.

▪ स्वच्छता ठेवा, आजार पळवा.

▪ गटार - नाला असतील दारात, डास वाढतील जोरात.

▪ स्वच्छता जवळ करा, स्वच्छता जवळ करा, आपल्या परिसराला स्वच्छ करा.

▪ घरोघरी स्वच्छता, आजारातून मुक्तता.

▪ जेव्हा नांदेल स्वच्छता, तेव्हाच मिळेल मुक्तता.

मला आशा आहे की, मित्रांनो तुम्हाला स्वच्छ भारत अभियान घोषवाक्य मराठी - Slogans On Cleanliness In Marathi हे घोषवाक्य आवडले असतील. तुम्हाला हे घोषवाक्य कसे वाटले याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हे घोषवाक्य तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच तुमच्या जवळ असलेले स्वच्छतेचे घोषवाक्य कमेन्ट बॉक्स मध्ये जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात अपडेट करू.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.  🙏🏻

वाचा 

➡️ डिजिटल इंडिया मराठी निबंध

➡️ विज्ञानाचे महत्त्व निबंध

➡️विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने