नरेंद्र मोदी निबंध मराठी Essay on Narendra Modi in Marathi


Essay on Narendra Modi in Marathi पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वोत्तम पंतप्रधान आहेत. तसेच बऱ्याच लोकांसाठी प्रेरणास्थान पण आहेत. बरेच लोक त्यांच्या विचारसरणीच्या आणि विश्वासाचा आदर करतात आणि त्यांना आपला आदर्श मानतात. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ आपल्या देशातच नव्हे तर अमेरिका रशिया यांसारख्या देशांमध्येही दिलदार वृत्तीमुळे लोकप्रिय आहेत. तर या पोस्टमध्ये नरेंद्र मोदी निबंध मराठी Essay on Narendra Modi in Marathi नरेंद्र मोदी यांच्या जीवन परिचयाबद्दल जाणून घेऊया...

नरेंद्र मोदी यांचा जीवन परिचय - Narendra modi information in marathi


Narendra modi information in marathi


नरेंद्र मोदी बायोग्रफी - Narendra modi Biography in marathi

नरेंद्र मोदी यांचे पूर्ण नाव नरेंद्र दामोदरदास मोदी आहे. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी वड़नगर, महेसाना, गुजरात या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मूलचंद मोदी आणि आईचे नाव हीराबेन मोदी आहे. नरेंद्र मोदी हे जन्मलेल्या सहा मुलांपैकी तिसरे आहेत. वडनगरमधील गुजराती कुटुंबात जन्मलेल्या मोदींनी त्यांच्या वडिलांना बालपणात चहा विकण्यास मदत केली आणि नंतर त्यांनी स्वत: ची स्टॉल चालविली.

वयाच्या 17 व्या वर्षी नरेंद मोदी यांचे लग्न जसोदा बेन चमनलाल यांच्याशी झाले.

नरेंद्र मोदी निबंध मराठी Essay on Narendra Modi in Marathi

वयाच्या आठव्या वर्षी ते आरएसएस मध्ये सामील झाले. ज्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे म्हणतात. नंतर मोदींनी दोन वर्षे भारतभर प्रवास केला आणि अनेक धार्मिक केंद्रांना भेटी दिल्या. 1969 किंवा 1970 मध्ये ते गुजरातमध्ये परतले आणि अहमदाबादला गेले. 1971 मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण कार्यकर्ता बनले. त्यांनी 1980 मध्ये गुजरात विश्वविद्यालयातून राजनीति विज्ञान हि डिग्री घेतली.

1985 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2001 पर्यंत त्यांनी पक्षाच्या पदानुक्रमात अनेक पदे भूषवली, तेथून हळूहळू ते भाजपमध्ये सचिव पदावर गेले.

1995 मध्ये राष्ट्रीय मंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांना पाच प्रमुख राज्यांमधे पक्ष संघटनेचे काम देण्यात आले आणि त्यांनी ते काम उत्तम पद्धतीने पुर्ण केले. 1998 मध्ये त्यांना पदोन्नती करून राष्ट्रीय महामंत्री (संघटना) ची जबाबदारी देण्यात आली.

ऑक्टोबर 2001 पर्यंत त्यांनी या पदावर काम केले. ऑक्टोबर 2001 मध्ये भारतीय जनता पार्टी ने केशुभाई पटेल यांना हरवले आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची कमान नरेंद्र मोदींकडे सोपविली.

मोदींच्या नेतृत्वात 2012 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले यावेळी भाजपला 115 सिट मिळाल्या.

नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून गुजरातच्या विकासासाठी अनेक महत्वाच्या योजना सुरू केल्या.

जसे की, पंचामृत योजना, सुजलाम् सुफलाम्, कृषि महोत्सव, चिरंजीवी योजना, मातृ-वंदना, कर्मयोगी अभियान, ज्योतिग्राम योजना, बेटी बचाओ, कन्या कलावाणी योजना, बालभोग योजना, वनबन्धु विकास कार्यक्रम इत्यादी...

➡️डिजिटल इंडिया मराठी निबंध

मोदी यांनी 2014 मध्ये वाराणसी आणि वडोदरा मधील दोन लोकसभेच्या जागा लढवल्या आणि दोन्ही मतदार संघात बहुमताने विजय मिळवला. त्यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. आणि येथूनच पंतप्रधान म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. ते भारताचे 15 वे पंतप्रधान आहेत ज्यामध्ये नरेंद्र मोदी प्रथमच बहुमताने मते मिळवून पंतप्रधान झाले. नंतर त्यांनी पंतप्रधान म्हणून कार्याला सुरुवात केली.

2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधींच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले, जी संपूर्ण देशात स्वच्छतेसाठी एक लोक चळवळ ठरली आहे.

2015 मध्ये त्यांनी आखाती देशांचा दौरा केला. आखाती देशात 34 वर्षांत दौरा करणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले.

➡️नरेंद्र मोदी यांचा मोबाईल नंबर

नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारतीय घटनेत अनेक बदल केले आहेत. आपला देश डिजिटल देशात बदलण्याचे मोदींचे स्वप्न होते. तर आपला डिजिटल इंडिया प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याने यास प्रोत्साहन देण्यासाठी बर्‍याच मोहिमा सुरू केल्या. त्यानंतर त्यांनी देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी नोटाबंदीसारखे मोठे पाऊल उचलले. ज्यामुळे त्यावेळी चालू असलेली 500 आणि 1000 ची चलने अवैध झाली. त्याऐवजी नवीन चलन मिळविण्यासाठी लोकांना जुन्या चलनातून ते बदलून द्यावे लागले.

देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिक सहभागी व्हावा यासाठी प्रधानमंत्री जन धन योजना घडवून आणली. व्यापार सुलभ बनवण्यावर भर देण्याबरोबरच त्यांच्या ‘मेक इन इंडिया’ या आवाहनामुळे गुंतवणूकदार आणि उद्योजकांमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला.

नरेंद्र मोदी हे असे व्यक्ती आहेत जे 2001 ते 2014 पर्यंत सुमारे 13 वर्षे गुजरातचे 14 वे मुख्यमंत्री होते आणि ते भारताचे 15 वे पंतप्रधान झाले.

2019 मध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांच्या नेतृत्वात पुन्हा निवडणूक लढविली आणि यावेळी पूर्वीपेक्षा आणखी मोठा विजय मिळविला. 30 मे 2019 रोजी शपथ घेऊन नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले.

न्यूज एजेंसीज आणि पत्रिका द्वारा केलेल्या तीन मोठ्या सर्वेक्षणांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी जनतेची पहिली पसंती जाहीर केली होती.

नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाचे देशभरात चांगलेच कौतुक झाले. सोशल मीडियावर त्यांची सक्रियता खूप लोकप्रिय आहे. त्यांच्या जीवनशैलीवर बर्‍याचदा चर्चा होत असते.

नरेंद्र मोदी हे विकास पुरुष म्हणून ओळखले जातात आणि सध्या देशातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत.

मला आशा आहे की, आपल्याला नरेंद्र मोदी निबंध मराठी Essay on Narendra Modi in Marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना हि पोस्ट शेअर करायला विसरू नका. ☺️

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻


वाचा

➡️ डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची माहिती

➡️राजीव सातव यांचा जीवन परिचय 

➡️छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी 

➡️महात्मा गांधी निबंध मराठी 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने