प्रधानमंत्री आवास योजना मराठी माहिती | प्रधानमंत्री घरकुल योजना 2021 यादी महाराष्ट्र

प्रधानमंत्री घरकुल योजना 2021 यादी महाराष्ट्र

पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेंतर्गत देशातील गरीब कुटुंबांना पक्की घरे दिली जात आहेत. या योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांना एक-एक करून मिळत आहे. ज्याची सर्व माहिती ऑनलाईनवर उपलब्ध आहे.


प्रधानमंत्री आवास योजना मराठी माहिती

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यादीमध्ये आपले नाव ऑनलाइन चेक करायचं असेल तर खाली नमूद केलेली माहिती पूर्णपणे वाचा. जेणेकरून आपल्याला घरकुलाची यादी पाहण्यासाठी अडचण येणार नाही. चला तर मग जाणून घेऊया...


2022 पर्यंत देशातल्या प्रत्येकांना स्वतःच घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आपल्या भारत सरकारने प्रधानमंत्री आवस योजना ग्रामीण सुरू केली आहे.2022 पर्यंत हा योजने अंतर्गत 2 कोटी 95 हजार घरं बनवण्याचं उद्दिष्ट आहे.

या प्रधानमंत्री आवस योजना ग्रामीण अंतर्गत घर बांधण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यात 1 लाख 20 हजार रुपयांची मदत दिली जात आहे आणि  डोंगराळ पर्वतीय भागांमध्ये 1 लाख 30 हजार रुपये मदत दिली जाते.


तसेच स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.


ज्या लोकांनी प्रधानमंत्री आवस योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला आहे त्या लोकांची यादी सरकारने साल 2021 मध्ये जाहीर करायला सुरुवात केली आहे. येथे ज्या लोकांच्या अर्जाचे व्हेरीफिकेशन झालेले आहे त्या लोकांचे नाव यादीमध्ये जाहीर केले जात आहे. आपल्यापैकी ज्या लोकांचे नाव यादीमध्ये नाही तर त्यांचे नाव जस जसे मंजूर होतील तेव्हा त्यांचे नाव यादीमध्ये समाविष्ट केले जातील.


प्रधानमंत्री घरकुल योजना 2021 यादी महाराष्ट्र


घरकुल लाभार्थ्यांची यादी हि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. येथे आपण ऑनलाइन मोबाईल किंवा कॉम्प्युटर वरून प्रधानमंत्री आवस योजना ग्रामीण घरकुलाची यादी चेक करु शकतो.


घरकुलाची यादी कशी पाहायची?

घरकुलाची यादी चेक करण्यासाठी या स्टेपला फॉलो करा⬇️

सर्वप्रथम गूगल क्रोम हे ब्राउजर उघडा >> उघडल्यानंतर pmay.nic.in असं सर्च करा >> त्यानंतर प्रधानमंत्री आवस योजना - ग्रामीण ची वेबसाईट ओपन होईल. >> ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला वरे असलेल्या तीन बिंदू वर क्लिक करा आणि Desktop site निवडा.

प्रधानमंत्री घरकुल योजना महाराष्ट्र 2021 यादी
नंतर Aawassoft या ऑप्शन वर क्लिक करा >> क्लिक केल्यानंतर Report हे ऑप्शन निवडा.


प्रधानमंत्री घरकुल योजना महाराष्ट्र 2021 यादी

Report हे ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला वेगवेगळे रिपोर्ट दिसतील. त्यातील सगळ्यात शेवटच्या Social Audit Reports मधील Benificiery details for verification यावर क्लिक करा.

प्रधानमंत्री घरकुल योजना महाराष्ट्र 2021 यादी

क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर MIS Report नावाचे पेज ओपन होईल >> यापेजवर selection filters च्या खाली जे पर्यात आहेत ते सर्व पर्याय आपल्याला एक एक करुन निवडायचे आहेत.

या पर्यायामध्ये सुरुवातीला राज्य, त्यानंतर जिल्हा, मग तालुका आणि सगळ्यात शेवटी गाव निवडायचं आहे. हे निवडून झाल्यानंतर आपल्याला कोणत्या वर्षीची यादी पाहायची आहे ते वर्ष निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला Pradhan Mantri awaas Yojana Gramin हे निवडायचे आहे.

इथे आपण Pradhan Mantri awaas Yojana Gramin, All central schemes, All states schemes, राजीव गांधी आवास योजना, मुख्यमंत्री आवास योजना...अशा बऱ्याच योजना येथे आपण चेक करु शकतो.

त्यानंतर समोर दिलेल्या बेरीज किंवा वजाबाकीच्या प्रश्नाचं उत्तर कॅप्चाच्या रकान्यात टाकायचं आहे.

आणि मग सगळ्यात शेवटी सर्व पर्याय भरल्यानंतर Submit या ऑप्शन क्लिक करायचं आहे.

प्रधानमंत्री घरकुल योजना महाराष्ट्र 2021 यादी

त्यानंतर आपल्यासमोर घरकूल लाभार्थ्यांची यादी ओपन होईल. या यादीमध्ये लाभार्थ्याचे नाव ऊपलब्ध असेल. येथे आपण आपले नाव चेक करु शकता. हि यादी आपण PDF स्वरूपात डाऊनलोड करु शकतो.


अशाप्रकारे आपण घरी बसून ऑनलाइन प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यादी महाराष्ट्र याची माहिती चेक करु शकतो.

मला आशा आहे की, आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मराठी माहिती - प्रधानमंत्री घरकुल योजना 2021 यादी महाराष्ट्र याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना हि पोस्ट शेअर करायला विसरू नका. ☺️

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने