राजीव सातव यांचा जीवन परिचय - Rajiv Satav Wikipedia Biography in marathi


राजीव-सातव-यांचा-जीवन-परिचय-Rajiv-Satav-Wikipedia-Biography-in-marathi


राजीव सातव कोण होते? Rajiv satav information in marathi

राजीव सातव हे सध्या कॉंग्रेसचे एक बळकट खासदार, नेते तसेच काँग्रेस पक्षातील एक उमदं युवा नेतृत्व आणि काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. त्यांना राहुल गांधी यांचे निकट मानले जात असे. महाराष्ट्रातील रहिवाशी असलेले राजीव सातव हे आमदार ते लोकसभा व राज्यसभेचे खासदार या पदावर राहिले. त्यांच्याकडे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुजरात प्रभारी पदही होते.

राजीव सातव यांचा जीवन परिचय - Rajiv Satav Wikipedia Biography in marathi

संपूर्ण नाव      ➡️ राजीव शंकरराव सातव
जन्म             ➡️ 19 सप्टेंबर 1974
मृत्यू              ➡️ 16 मे 2021
जन्मस्थान      ➡️ पुणे, महाराष्ट्र, भारत
मृत्यूचे ठिकाण ➡️ पुणे, महाराष्ट्र, भारत
वडिलांचे नाव  ➡️ शंकरराव सातव
आईचे नाव     ➡️ श्रीमती रजनीताई सातव
पत्नी             ➡️ प्रज्ञा सातव
शिक्षण           ➡️ एम.ए.-  बी.एससी - आय.एल.एस.
राष्ट्रीयत्व         ➡️ भारतीय
कार्यकाल        ➡️ विधानसभा 2009 ते 2014 -  लोकसभा 2014 ते 2019

राजीव सातव माहिती

महाराष्ट्रातील राजीव सातव यांना काँग्रेसच्या यंग ब्रिगेडचे महत्त्वाचे वक्ते मानले जात होते. 2008 ते 2010 या काळात ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनतर 2009 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून गेले आणि नंतर 2009 ते 2014 या काळात राजीव सातव हिंगोलीचे आमदार झाले. 2010 ते 2014 या काळात सातव यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविलेले. इतकेच नव्हे तर एप्रिल २०२० मध्ये ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले.

राजीव सातव यांचा जन्म २१ सप्टेंबर 1974 रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री शंकरराव सातव आणि आईचे नाव श्रीमती रजनीताई सातव. राजीव सातव यांनी पुण्यातील फर्गुसन कॉलेजमधून एम.ए. केले आणि बी.एससी केली त्यानंतर आय.एल.एस. लॉ कॉलेजमधून एल.एल.एम. केले. राजीव सातव यांच्या आई राजकीय प्रवास - काँग्रेसच्या आमदार आणि राज्यसभेच्या खासदार होत्या, त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव डॉक्‍टर आहेत. राजीव सातव यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला होता. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान सातव यांच्यावर गुजरात प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे 2019 ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवण्यास नकार दिला होता.

राजकीय घटनाक्रम

28 मार्च 2017: सदस्य, रेल्वेवरील स्थायी समिती.

2 जून 2016: सदस्य, संरक्षण संबंधी स्थायी समितीची उपसमिती.

13 मई 2015: सभासद, भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसन (द्वितीय दुरुस्ती) विधेयक, २015 मधील वाजवी नुकसान भरपाई आणि पारदर्शकतेच्या अधिकारांची संयुक्त समिती

1 सप्टेंबर 2014 ते 28 मार्च 2017: संरक्षण संबंधी स्थायी समितीचे सदस्य

12 सितंबर 2014: इतर मागासवर्गीय कल्याण समिती आणि सल्लागार समिती, सदस्य, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय

2010 – 2014: भारतीय युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष

2009 – 2014: महाराष्ट्र विधानसभा सदस्य

2008 – 2010: महाराष्ट्र प्रदेश युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष

2007 - 2009: अध्यक्ष, कृषी समिती, जिल्हा परिषद, हिंगोली

2002 – 2007: ब्लॉक पंचायत सदस्य, कळमनुरी, जिल्हा-हिंगोली

लोकसभेत खासदार म्हणून राजीव सातव यांची कामगिरी चांगली आहे असे कॉंग्रेसचे वरिष्ठ व ज्येष्ठ नेते मानतात.

कॉंग्रेसचे लोकप्रिय नेते आणि खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचे (16 मे 2021) रोजी पुण्यातील खासगी जहांगीर रूग्णालयात पहाटे निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. 22 एप्रिल रोजी राजीव सातव कोरोना संसर्गामुळे बळी पडले होते, त्यांची प्रकृती खालावली होती, पण ते त्यातून बरेही झाले, त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.

परंतु अचानक तेथे त्यांना एक नवीन व्हायरल इन्फेक्शन सायटोमेगॅलो या नवीन विषाणूचा संसर्ग झाला आणि त्याची प्रकृती गंभीर बनली आणि अखेर त्यांनी प्राण सोडले.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील मसोड या त्यांच्या मुळगावी (17 मे 2021) रोजी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


➡️महात्मा गांधी निबंध मराठी

➡️छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने