इंटरनेट शाप की वरदान निबंध मराठी - internet shap ki vardan essay in marathi

इंटरनेट शाप की वरदान internet shap ki vardan essay in marathi आजचे युग हे ऑनलाईन डिजिटल तंत्रज्ञानाचे युग बनले आहे. या माहिती संप्रेषण क्षेत्रात विज्ञानाने तयार केलेले इंटरनेट ठाम भुमिका बजावत आहे. इंटरनेट हे वर्ल्ड वाइड वेब आहे. या युगात 'इंटरनेट' हा शब्द कोणाला माहित नाही. खऱ्या अर्थाने पाहिले तर आज इंटरनेट आपल्या सर्वांच्या जगण्याचे एक महत्त्वाचे उपयुक्त कारण बनले आहे. इंटरनेट शिवाय आपण आजच्या जगाची कल्पनाही करू शकत नाही. आज इंटरनेट हे आपल्या मानवी जीवनाची मुख्य गरज बनला आहे. आपल्याला कोणतीही माहिती मिळवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी इंटरनेटची गरज लागते.

इंटरनेट-शाप-की-वरदान-निबंध-मराठी-internet-shap-ki-vardan-essay-in-marathi

आजच्या काळात इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय नेटवर्क बनले आहे. या युगात इंटरनेटने आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात योगदान दिले आहे. इंटरनेट हा आतापर्यंतचा सर्वोत्तम शोध आहे ज्याने मानवी जीवनाचे स्वरूप बदलले आहे. आजच्या काळात असे कोणतेच क्षेत्र नाही जेथे इंटरनेटची आवश्यकता नाही. आपल्या आधुनिक जीवनशैलीत इंटरनेटची भूमिका वाढत चालली आहे. आपले आयुष्य हे इंटरनेटच्या जाळ्यात अडकले आहे. त्यामुळे आजच्या पोस्टमध्ये आपण इंटरनेट शाप की वरदान निबंध मराठी - internet shap ki vardan essay in marathi याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

इंटरनेट शाप की वरदान निबंध मराठी - internet shap ki vardan essay in marathi

इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे आणि क्रांती घडवणारे शक्तिशाली नेटवर्क आहे. जर आपण एखाद्याला इंटरनेटच्या फायद्यांविषयी विचारले तर तो आपल्याला बरेच फायदे सांगू शकेल, परंतु इंटरनेटच्या नुकसानाबद्दल मोजकेच लोक सांगू शकतील. त्यामुळे हि पोस्ट आपल्याला इंटरनेटचे फायदे व तोटे मराठी निबंध या विषयासाठी देखील उपयुक्त ठरेल.

इंटरनेट चे फायदे - उपयोग - वरदान

इंटरनेटने आपल्या बऱ्याच अडचणी सुलभ केल्या आहेत ज्यामुळे आपल्याला प्रत्येक ऑनलाईन कार्य अतिशय सोपे वाटते.

इंटरनेटच्या मदतीने आपण काही क्षणांत कोणत्याही प्रकारची माहिती किंवा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळवू शकतो. आपल्याला हवी ती माहिती काही सेकंदात इंटरनेटच्या माध्यमातून सहज उपलब्ध होते.

या काळात आजचे विद्यार्थी इंटरनेटमुळे कोठूनही शिक्षण घेऊ शकतात. आपल्याला गूगलवर किंवा यूट्यूबवर वेगवेगळ्या गोष्टी शिकता येतात. असे खूप विद्यार्थी आहेत जे इंटरनेट वरून शिक्षण घेतात. आजच्या काळात, ऑनलाइन वर्गांद्वारे, कोणीही घरी अभ्यास करुन परीक्षा देऊ शकते. 

बँकिंग क्षेत्राची कामे इंटरनेटद्वारे सुलभ झाली आहेत. आपल्याला बँकेचे व्यवहार करण्यासाठी बँकेच्या बाहेर लाइनमध्ये उभे राहण्याची-थांबण्याची गरज नाही. गूगल पे, फोन पे, पेटीयम, भीम UPI या ऑनलाईन इंटरनेट बँकिंग ॲप्लिकेशन व्दारे आपण सहज बँकेचे व्यवहार करू शकतो. या ॲप वरून एका क्लिक मध्ये आपण पैसे पाठवणे, पैसे जमा करणे, मोबाइल रिचार्ज, मोबाइल बिल, गॅस बिल, वीज बिल, डिश रिचार्ज, क्रेडिट कार्ड बिल, केबल टीव्ही बिल, गूगल प्ले स्टोर रिचार्ज, एज्युकेशन fees, विमा, नगरपालिका कर, landline बिल, Food ऑर्डर, रेल्वे तिकीट बुक अश्या बऱ्याच प्रकारचे पेमेंट करु शकतो. लोकं या नेट बँकिंग सुविधेचा पुरेपूर फायदा घेत आहेत.

जर आपण असे म्हणालो की, आपली बँक आपल्या खिशात आहे तर ते चुकीचे ठरणार नाही कारण आपण आपली सर्व कामे नेट बँकिंगद्वारे आपल्या बँकेच्या मोबाइल अॅप किंवा वेबसाइटद्वारे करू शकतो. 

व्यवसायामध्ये देखील इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. आज अश्या बऱ्याच मोठ्या कंपन्या कंपन्या आहेत ज्या इंटरनेट व्दारे चालतात. जर आपण काही मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांबद्दल चर्चा केली तर आज फ्लिपकार्ट, अमेझॉन या कंपन्यांना इंटरनेटमुळेच चालना मिळाली आहे.

व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी इंटरनेट हा एक अतिशय उपयुक्त मार्ग ठरत आहे. आपल्याला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्यास त्या व्यवसायाची जगभरात जाहिरात करुन आपण आपल्या व्यवसायाला चालना देऊ शकतो. आपली स्वतःची स्वतंत्र व्यवसाय वेबसाइट देखील तयार करू शकतो. 

एकमेकांशी संवाद साधण्यासाठी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. इंटरनेटद्वारे मीटिंग घेणे,  ई-मेल पाठवणे मेसेज पाठवणे, स्काईपद्वारे व्हिडीओ कॉलिंग, फेसबुक - व्हॉट्सअॅप वर चॅटिंगद्वारे गप्पा मारणे. 

इंटरनेट हे मनोरंज करण्याचे एक माध्यम बनले आहे. मनोरंजनासाठी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.  चित्रपट, मालिका, विनोद, गेम्स याद्वारे आपण आपले मनोरंजन करत असतो. 

आज पाहिले तर आपण इंटरनेटद्वारे आपल्या मित्र, नातेवाईकांशी सोशल नेटवर्किंग साइटवर बोलत असतो, फोटो - व्हिडिओ शेयर करत असतो, आपण आपले विचार लोकांपर्यंत सोशल मीडिया व्दारे पोहचवू शकतो. अशा प्रकारे संपूर्ण जग इंटरनेटद्वारे एकमेकांशी जोडलेले आहे.

इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना खूप चांगली संधी मिळाली आहे. इंटरनेट आज कोट्यावधी लोकांच्या व्यवसायाचे व्यासपीठ बनले आहे. इंटरनेटच्या विस्तारामुळे होणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण इंटरनेटचा वापर करून घरी बसून ऑनलाईन अनेक प्रकारची कामे करुन पैसे कमवू शकतो. जसे की आपण आपले स्वत: चे उत्पादन ऑनलाइन वेबसाइटवर विकू शकतो किंवा आपण त्याचा प्रचार करू शकतो, YouTube वर व्हिडिओ बनवू शकतो, आपली स्वतःची वेबसाइट तयार करून कमवू शकतो. 

इंटरनेटद्वारे, आपण आवश्यक डेटा कागदपत्रे किंवा कोणतीही फाइल कोणत्याही व्यक्तीस किंवा किंवा कोणत्याही कंपनीला पाठवू आणि प्राप्त करू शकतो. वर्क फ्रॉम होम यांसारखे कार्य या पद्धतीने केले जाते.

इंटरनेट चे तोटे - नुकसान - शाप 

आजकाल ऑनलाइन चॅटिंगच्या युगात लोक मित्र बनवतात आणि एकमेकांना नकळत बोलत राहतात आणि अशा काही गोष्टी एकमेकांना सांगतात, जे नंतर त्यांच्यासाठी वाईट घडतात. 

आजकाल काही लोक आवश्यकतेपेक्षा जास्त इंटरनेटचा वापर करतात. लोकांना खाणे, पिणे, झोपणे आणि बोलत असतानाही इंटरनेट चालवण्याचे व्यसन लागले आहे. ते आपल्याशी बोलतात, परंतु त्यांचे लक्ष फोनवर असते. त्यामुळे याचा परिणाम केवळ आपल्या उर्वरित कामावरच होत नाही तर आपल्या आरोग्यावरही होतो.

काही लोक इंटरनेटवर ब्लॅकमेल करतात. आजकाल, अनेक फसवणूकीच्या गोष्टी देखील ऑनलाइन होऊ लागल्या आहेत जसे की अनेक वेळा ऑनलाईन फी सरकारी नोकरीचा फॉर्म ऑनलाईन भरून आपल्याकडून घेतल्या जातात आणि काहीही घडत नाही. अशा बर्‍याच ऑनलाईन फसवणूकीही पाहायला मिळतात. 

इंटरनेटवर आपण बर्‍याचदा असे व्हिडिओ, ऑडिओ किंवा चित्रे पाहतो ज्यांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. 

सध्या सर्व सरकारी, वैयक्तिक कंपन्यांचे कागदपत्रे इ. इंटरनेटवर आहेत.  म्हणून त्यांच्या लीक होण्याचा धोका कायमच राहतो. बर्‍याच कंपन्याचा दरवर्षी डेटा चोरी होते ज्यामुळे कोट्यवधींचा तोटा होतो.  इंटरनेटच्या जगात डेटा चोरी ही एक मोठी समस्या आहे, ती टाळण्यासाठी बरेच उपाय केले जातात, परंतु तरीही काही त्रुटी आहेत, स्पॅमिंगचा वापर गोपनीय कागदपत्रे चोरण्यासाठी केला जातो. त्यामुळे इंटरनेट नेहमी काळजीपूर्वक वापरले पाहिजे. 

बेकायदेशीर वस्तूंच्या पुरवठ्यासाठी माहिती घेणे यांसारख्या अनेक बेकायदेशीर पद्धती इंटरनेटद्वारे केल्या जातात. 

इंटरनेटमुळे आपली वैयक्तिक माहिती चोरी, हॅकिंग होण्याचे प्रमाण वाढले आहे, जसे क्रेडिट नंबर, बँक कार्ड नंबर इ. यांमुळे आपले आर्थिक नुकसान होऊ शकते. 

इंटरनेटवर पोर्नोग्राफी साइटमध्ये अत्याधिक अश्लील सामग्री आहे. त्याचा वाईट परिणाम मुलांवर आणि तरुण पिढीवर होतो. अश्लील साइट पाहिल्यामुळे लोक चुकीच्या मार्गाकडे वाटचाल करत आहेत आणि गुन्हेगारीकडे वळत आहेत.  अशा प्रकारचे अश्लील सामग्री इंटरनेटवर टाकणारे लोक खूप चांगले उत्पन्न मिळवतात. हे आपल्या समाजातील विषासारखे आहे, ज्याचे धोकादायक परिणाम आपण दररोज पाहत आहोत. म्हणून, इंटरनेटवर अशा प्रकारच्या सामग्रीस प्रतिबंधित करण्यासाठी कठोर नियम ठेवले पाहिजे.

इंटरनेटचा अधिक वापर केल्यास चिडचिडपणा, मानसिक ताण वाढू शकतो. बर्‍याच वेळा मुले इंटरनेटवर ऑनलाइन गेम खेळत राहतात आणि बाहेर गेल्यावर त्यांचा स्वभाव चिडचिडा होतो.  इंटरनेटवर बर्‍याच हिंसक गेम, व्हिडिओ इत्यादी सामग्री उपलब्ध आहे जी चिडचिडेपणाला प्रोत्साहन देते.

सध्या लोकांना एकमेकांना भेटायला फारच कमी आवडते. आता लोकं इंटरनेटवर ऑनलाईन मित्र बनवतात. सोशल साइट्सवर तर एक वेगळंच जग बनलं आहे यामुळे लोकांना घरच्या कुटुंबाला बोलण्यास वेळ मिळत नाही ज्यामुळे कुटुंबं विखुरलेली आहेत.

आजचे जग यावर आधारित आहे इंटरनेटने जगाला इतके सोपे केले आहे की आज इंटरनेटशिवाय या जगाची कल्पना करणे कठीण आहे.

परंतु त्याचा गैरवापर केल्यास त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, म्हणून इंटरनेट नेहमी सावधगिरीने वापरायला हवे.


इंटरनेट हे विज्ञानाने आपल्या मनुष्याला दिलेली एक उत्तम देणगी आहे. आजच्या काळात इंटरनेट खरोखर एक शक्तिशाली डिव्हाइस आहे आणि यामुळे आपल्याला बरेच काही शिकायला मिळते.

आपण इंटरनेट चा योग्य प्रकारे आणि आवश्यक उपयोग केल्यास तो आपल्यासाठी नक्कीच वरदान ठरू शकते. पण चुकीच्या वापरामुळे जगातील प्रत्येक तंत्रज्ञानाप्रमाणे इंटरनेटचे देखील नुकसान आहेत. 

इंटरनेटच्या दुरुपयोगासाठी मनुष्य स्वतः जबाबदार आहे. आपण इंटरनेटचा योग्य वापर करतो की गैरवापर करतो हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे.

आपण एक जबाबदार नागरिक असाल तर आपण इंटरनेटचा वापर योग्य व गरजेनुसार केला पाहिजे.

मला आशा आहे की, मित्रांनो तुम्हाला इंटरनेट शाप की वरदान निबंध मराठी - internet shap ki vardan essay in marathi  हा मराठी निबंध आवडला असेल. तुम्हाला हा निबंध कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा निबंध तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.  🙏🏻


➡️ डिजिटल इंडिया मराठी निबंध

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने