गूगल पे म्हणजे काय? गूगल पे कसे वापरावे? Google pay information in marathi

Google pay information in marathi मित्रांनो आपल्याला तर माहितच आहे, आजचे युग बऱ्याच प्रमाणात आधुनिक डिजिटल झाले आहे. आज आपण आपल्या घरातून मोबाईल रिचार्ज करणे, कोणत्याही प्रकारचे बिल भरणे, एखाद्याला पैसे पाठवले किंवा प्राप्त करणे इत्यादी कामे करत असतो. ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी गूगल प्ले स्टोरवर आपल्याला फोन पे, पेटीएम, भीम UPI असे बरेच डिजिटल पेमेंट करण्याचे ॲप्स पाहायला मिळतात. पण असेच एक लोकप्रिय ॲप आहे ते म्हणजे गूगल पे (Google pay). तर आजच्या पोस्टमधे आपण गूगल पे म्हणजे काय? गूगल पे कसे वापरावे? Google pay information in marathi गूगल पे बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया...

गूगल पे म्हणजे काय? गूगल पे कसे वापरावे? Google pay information in marathi


गूगल पे माहिती - Google pay information in marathi

आजच्या काळात पैसे पाठवण्यासाठी बरेच ॲप्स उपलब्ध आहेत. पण या काळात आपण प्रत्येक ॲपवर विश्वास ठेऊ शकत नाही, कारण असे अनेक हॅकर्स आहेत जे बनावट ॲप्स तयार करून आपल्या खात्यातून पैसे काढून घेतात. पण गूगल पे हे ॲप एक विश्वसनीय आणि सुरक्षित ॲप आहे. आताच्या काळात सर्व जण डिजिटल पेमेंट करण्यासाठी या गूगल पे ॲप ला वापरतात.

मित्रांनो काही वर्षांपूर्वी गूगल ने Google Tez ह्या नावाचे पेमेंट ॲप लाँच केले होते. त्यांनंतर गूगल ने या Google Tez ॲप चे नाव बदलून Google pay केले. गूगल पे हे Google Tez ॲप चे अपग्रेड केलेले व्हर्जन आहे ज्याला अधिक चांगल्या प्रकारे तयार केले आहे. गूगल ने खासकरून भारतातील लोकांसाठी डिजिटल पेमेंट करण्यासाठी हे ॲप बनवले आहे. जेव्हा आपल्या भारत देशात नोटबंदी झाली होती तेव्हापासून आपला देश डिजिटल पेमेंटच्या दिशेने वेगाने वाढणारा कैश-लेस देश बनत आहे.

Google Tez ॲप ला भारतात 19 सप्टेंबर 2017 रोजी भारताचे वित्त मंत्री श्री अरुण जेटली आणि Next Billion Users चे व्हॉईस प्रेसिडेंट आणि जनरल मैनेजर सीझर सेनगुप्ता यांच्या उपस्थित लाँच करण्यात आले होते. नंतर काही दिवसांनी म्हणजे 28 ऑगस्ट 2018 रोजी परत या Google Tez ॲपचे नाव बदलून गूगल पे असे करण्यात आले.


➡️फोन पे काय आहे? फोन पे कसे वापरावे? 

➡️व्हॉट्सॲप चे नवीन फिचर आता व्हॉट्सअ‍ॅपवरुन सुरक्षित पैसे पाठवता येणार


गूगल पे हे ॲप कोणत्याही प्रकारच्या डिजिटल पेमेंट व्यवहारासाठी लोकप्रिय आणि सुरक्षित असलेले ॲप आहे. हे ॲप वापरून आपण बऱ्याच डिजिटल पेमेंट ह्या आपल्या मोबाईल वरून करू शकतो.


गूगल पे म्हणजे काय? Google pay app information in marathi

गूगल पे ॲप गूगल नावाच्या एका मोठ्या आणि विश्वसनीय कंपनी द्वारा तयार केलेले ॲप आहे. हे ॲप डिजिटल पेमेंट ॲप असल्यामुळे UPI (Unified payment interface) आधारित ॲप आहे. याच्या मदतीने आपण पैसे सहजपणे पाठवू आणि प्राप्त करू शकता. या ॲप ला NPCI (National payments corporation of India) द्वारा विकसित केले आहे. NPCI हि भारताची बँकिंग प्रणाली व्यवस्थापित करते. त्यामूळे हे ॲप पूर्णपणे सुरक्षित आहे.

हे अ‍ॅप खासकरून भारतातील लोकांना लक्षात ठेवून बनविण्यात आले आहे ज्यामध्ये आपल्याला बर्‍याच वेगवेगळ्या भाषा पाहायला मिळतील त्यामुळे आपण आपल्या पसंतीच्या भाषेत हा अ‍ॅप वापरू शकतो.

गूगल पे ॲप वरून आपण पैसे ट्रान्सफर, मोबाइल रिचार्ज, मोबाइल बिल, गॅस बिल, वीज बिल, डिश रिचार्ज, क्रेडिट कार्ड बिल, केबल टीव्ही बिल, गूगल प्ले स्टोर रिचार्ज, एज्युकेशन fees, विमा, नगरपालिका कर, landline बिल, Food ऑर्डर, रेल्वे तिकीट बुक अश्या बऱ्याच प्रकारचे पेमेंट करु शकतो.

गूगल पे ॲप व्दारे आपण investment करु शकतो.

गूगल पे ॲप वरून आपण फास्टॅग रिचार्ज करू शकतो.

गूगल पे मध्ये आपले जे Regular payments आहेत ते आपन सेट करु शकतो.

पण मित्रांनो या सुविधांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गूगल पे ॲपवर एक अकाउंट तयार करावे लागेल, त्यानंतरच आपण या सुविधांचा लाभ घेऊ शकतो आणि आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने डिजिटल पेमेंट करू शकतो.

नोट: लक्षात असू दया ➡️ गूगल पे ॲप वर अकाउंट तयार करण्यासाठी आपल्याकडे खालील गोष्टी असणे आवश्यक आहे.

▪ आपल्याकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.
▪ आपल्याकडे बँक खाते असावे.
▪ त्या बँक खात्याला आपला मोबाईल नंबर लिंक असावा.
▪ त्या बँक खात्याचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे.
▪ आपल्याकडे ईमेल आयडी असावी.


गूगल पे कसे चालू करायचे? गूगल पे वर अकाउंट कसे तयार करावे?

गूगल पे चालू करण्यासाठी आपल्याला गूगल पे ॲप वर अकाउंट एक तयार करावे लागेल. गूगल पे ॲपवर अकाउंट तयार करणे खूप सोपे आहे. अकाउंट तयार करण्यासाठी खालील स्टेप ला फॉलो करा.

>> सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये Google Play Store वरून गूगल पे हे ॲप इंस्टॉल करा किंवा खालील गूगल पे डाऊनलोड बटणावर क्लिक करून डाऊनलोड करा.

गूगल पे डाऊनलोड

>> गूगल पे ॲप इंस्टॉल झाल्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर English (United States) या ऑप्शन वर क्लिक करून आपली आवडती भाषा निवडा आणि Next बटणावर क्लिक करा.

>> आता आपल्या बँक खात्याला लिंक असलेला आपला मोबाइल नंबर टाका आणि Accept & Continue या ऑप्शनवर क्लिक करा.

>> त्यांनंतर आपल्याला आपली ईमेल आयडी टाकावी लागेल. जर आपली ईमेल आयडी आपल्या मोबाइल मध्ये आधीच उघडलेली असेल तर आपली ईमेल आयडी तेथे दाखविली जाईल ती सिलेक्ट करून Continue बटणावर क्लिक करा.

>> त्यांनतर आपल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो ओटीपी automatically कन्फर्म होईल.

>> आता आपल्या खात्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला एक पासवर्ड (तुम्हाला हवा असलेला कोणताही) प्रविष्ट करा आणि Continue ऑप्शन वर क्लिक करा.

>> नंतर आलेल्या स्क्रीन मध्ये More ऑप्शनवर क्लिक करा आणि Yes, Turn On बटणावर क्लिक करा.

>> आता आपल्याला गूगल पे वापरण्यासाठी परमिशन मागितले जाईल तेव्हा सर्व परमिशन दया.

आता आपले गूगल पे खाते तयार झाले.

आपल्याला डिजिटल पेमेंट करण्यासाठी आपले बँक खाते जोडावे लागेल.

आपण डिजिटल पेमेंट करू इच्छित असाल तर खालील स्टेप ला फॉलो करून आपले बँक खाते जोडू शकता.

बँक खाते जोडण्यासाठी आपल्याकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे.

>> आपले बँक खाते जोडण्यासाठी उजव्या साईडला वरच्या बाजूला असलेल्या आपल्या ईमेल आयडी च्या Logo वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर Send Money Bank Account  ऑप्शनवर क्लिक करा.


गूगल पे कसे चालू करायचे? गूगल पे वर अकाउंट कसे तयार करावे?

>>  आता आपल्यासमोर वेगवेगळ्या बँकेचे नाव येतील त्यामधील आपली जी बँक आहे ती निवडा. बँक निवडल्यानंतर ऑटोमॅटिक प्रक्रिया पुर्ण होईल.

>> त्यांनतर परमिशन Grant करा आणि Continue बटणावर क्लिक करा.

>> आता आलेल्या स्क्रीन मध्ये आपले बँक खाते दिसेल त्याच्या खाली असलेल्या Continue बटणावर क्लिक करा.

>> हे सर्व झाल्यानंतर आपले बँक खाते जोडले गेले. त्यांनतर आपले नाव टाका आणि Accept बटणावर क्लिक करा.

>> आपण पहिल्यांदा गूगल पे उघडले असेल तर आपल्याला ATM चे शेवटचे 6 आकडे आणि आपल्या कार्ड ची expiry date टाकावी लागेल. त्यांनतर आपल्याला UPI पिन तयार करावा लागेल. हा UPI पिन आपल्याला Transaction करते वेळेस टाकावा लागतो.

>> UPI पिन तयार करण्यासाठी गूगल पे च्या होम स्क्रीनवर उजव्या साईडला वरच्या बाजूला असलेल्या आपल्या ईमेल आयडी च्या Logo वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर Send Money Bank Account  ऑप्शनवर क्लिक करा. आपले बँक खाते निवडा आणि ATM चे शेवटचे 6 आकडे आणि आपल्या कार्ड ची expiry date टाका त्यानंतर UPI पिन तयार करा.

आपण एकापेक्षा जास्त बँक खाते येथे जोडू शकता.


गूगल पे कसे वापरावे? How to use Google pay in marathi

गूगल पे वापरणे खूप सोपे आहे.

गूगल पे ओपन केल्यानंतर आपल्याला विविध प्रकारचे पर्याय दिसतील. या पर्यायांबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया...

>> गूगल पे ओपन केल्यानंतर आलेल्या स्क्रीन मध्ये + New payment ह्या ऑप्शन वर क्लिक करा.


गूगल पे कसे वापरावे? How to use Google pe in marathi

1. Recharge & Pay Bill

Mobile Reacharge
▪ या ऑप्शन च्या मदतीने आपण प्रीपेड-पोस्टपेड कोणत्याही प्रकारचे मोबाईल रिचार्ज करू शकतो.

Bill Payments
▪ येथून आपण मोबाइल बिल, गॅस बिल, वीज बिल, डीटीएच रिचार्ज, क्रेडिट कार्ड बिल, केबल टीव्ही बिल, गूगल प्ले स्टोर रिचार्ज, ब्रॉडबँड, एज्युकेशन fees, विमा, नगरपालिका कर, landline बिल अश्या बऱ्याच प्रकारचे पेमेंट करु शकतो.

2. Transfer money

Bank transfer: येथुन आपण कोणाच्याही बँक खात्यात पैसे पाठवू शकतो. पण पैसे पाठवण्यासाठी आपल्याकडे ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीचे नाव, बँक खाते नंबर आणि IFSC कोड असणे आवश्यक आहे.

Phone number: या ऑप्शन व्दारे आपण direct समोरच्या व्यक्तीचा Phone number टाकून  पैसै पाठवू शकतो.

UPI ID or QR: जर एखादी व्यक्ती गुगल पे व्यतिरिक्त यूपीआय अ‍ॅप वापरत असेल तर आपण या पर्यायासह क्यूआर कोड स्कॅन करून पैसे पाठवू शकता.

▪ Self transfer:  या पर्यायाने आपण आपल्या कोणत्याही दुसऱ्या बँक खात्यात पैसे पाठवू शकतो.

3. Businesses

▪ या ऑप्शन च्या मदतीने आपण food ऑर्डर, रेल्वे तिकीट, बस तिकीट, फ्लाईट तिकीट, हॉटेल्स बूक, Investment, फास्टॅग विकत घेऊ शकतो आणि बरेच काही बूक करु शकतो.


गूगल पे मध्ये Balance कसे चेक करायचे?

गूगल पे मध्ये बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी गूगल पे मध्ये सर्वात खाली View account balance हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करुन UPI पिन टाका. पिन टाकल्यानंतर आपल्याला आपल्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम दिसेल.


गूगल पे वरून पैसे कसे कमवायचे?

आपण आपल्या मित्रांना गूगल पे अ‍ॅप शेअर करुन पैसे कमवू शकतो. जेव्हा आपण आपल्या गूगल पे ॲप वरून आपल्या मित्रांना Refferal link शेअर करतो आणि त्या Refferal link व्दारे कोणीही हे ॲप इंस्टॉल करून खाते तयार केले आणि त्यानंतर त्याने प्रथम transaction केल्याबरोबर आपल्याला 51 रुपये मिळतात.


मला आशा आहे की, आपल्याला गूगल पे म्हणजे काय? गूगल पे कसे वापरावे? Google pay information in marathi गूगल पे याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना हि पोस्ट शेअर करायला विसरू नका. ☺️

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻


➡️ डिजिटल इंडिया मराठी निबंध

3 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने