फास्टॅग म्हणजे काय? FASTag Information In Marathi - फास्टॅग बद्दल संपूर्ण माहिती

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांनी 1 जानेवारी पासून राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या सर्व वाहनांना फास्टॅग-FASTag लावणे बंधनकारक केले आहे. हे तंत्रज्ञान देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल प्लाझावर वापरण्यात येत आहे. आता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, आपण फक्त फास्टॅग-FASTag च्या मदतीने टोल प्लाझावर पेमेंट च्या वेळी ई-पेमेंट करू शकतो आणि हाच एकमेव पर्याय असणार आहे. तर या पोस्टमध्ये आपण फास्टॅग म्हणजे काय? फास्टॅगची नोंदणी कोठे करावी? फास्टॅग संबंधित सर्व महिती जाणून घेणार आहोत. FASTag Information In Marathi चला तर मग जाणून घेऊया...


फास्टैग म्हणजे काय? FASTag Information In Marathi

फास्टॅग म्हणजे काय? What is FASTag in marathi?

फास्टॅग हे इलेक्ट्रॉनिक टोल संकलन तंत्र आहे. यामधे रेडियो फ्रीक्वेंसी आइडेंटिफिकेशन (RFID) चा वापर होतो. हा टॅग वाहनाच्या विंडस्क्रीनवर लावला जातो. जसे आपली गाडी टोल प्लाझाजवळ जाते तेंव्हा टोल प्लाझावरील सेन्सर आपल्या गाडीच्या विंडस्क्रीनवरील फास्टॅग ला ट्रैक करतो.

यानंतर, त्या टोल प्लाझावरील शुल्क आपल्या फास्टॅग खात्यातून आपोआप कट केले जातील. अशा प्रकारे, आपण टोल प्लाझावर न थांबता फी भरण्यास सक्षम होतो. गाडीवर लावलेला हा टॅग आपले प्रीपेड खाते सक्रिय होताच त्याचे कार्य सुरू होईल. जेव्हा आपल्या फास्टॅग खात्यामधील रक्कम(पैसे) संपेल, तेव्हा आपल्याला ते पुन्हा रिचार्ज करावे लागेल. फास्टॅगची वैधता 5 वर्षांची असेल म्हणजे पाच वर्षानंतर आपल्याला आपल्या गाडीवर एक नवीन फास्टॅग लावावा लागेल.


FASTag बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Documents Required For FASTag Registration)

फास्टॅग बनवताना आपल्याला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल.

वाहन नोंदणीची (रजिस्ट्रेशन) कागदपत्रे ➡️ आपल्याकडे वाहन रजिस्ट्रेशन च्या सर्व कागदपत्रांच्या मूळ आणि डुप्लिकेट प्रती असणे आवश्यक आहे. हे तपासल्यानंतरच आपल्याला आपल्या वाहनासाठी फास्टॅग देण्यात येईल.

बँक खाते ➡️फास्टॅग आपल्या बँक खात्याला जोडला जाईल, जेणेकरून टोल पॉईंटवर पोहचल्यावर आपल्या गाडीच्या फास्टॅगला ट्रॅक केले जाईल आणि आपल्या खात्यातून पैसे वजा केले जातील. म्हणून, आपल्या बँक खात्याच्या माहितीसाठी आपल्याला पासबुक सारख्या कागदपत्रांची प्रत आवश्यक आहे.

आयडी➡️वाहनाच्या ओळखीबरोबरच ड्रायव्हरचीही ओळख असणे आवश्यक आहे, म्हणून अर्जदारांना आधार कार्ड किंवा व्होटरआयडी कार्ड त्यांचा आयडी म्हणून ठेवावा लागेल.

पत्त्याचा पुरावा➡️आपल्याकडे आपल्या पत्त्याचा पुरावा देखील असावा, यासाठी आपण आपल्या स्थानिक पत्त्याचा पुरावा म्हणून वीज बिल किंवा टेलिफोन बिलाची प्रत वापरू शकतो.


>> रिलायन्स जिओ भारतामध्ये लवकरच 5G नेटवर्क लाँच करणार

>> फेसबुक टूल, जे आपला मेंदू वाचू शकते, जाणून घ्या संपूर्ण माहिती


फास्टॅग नोंदणी कोठे करावी?

यासाठी आपल्याला बरेच पर्याय आहेत. आपण कोणत्याही कार डीलरकडे जाऊ शकतो, कोणत्याही बँकेतून बनवू शकते, टोल प्लाझावर जाऊन बनवू शकतो आणि ऑनलाईन पण बनवू शकतो. तसेच फास्टॅग हे पेटीएम, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहे.
यासाठी आपल्याला वरील⬆️ कागदपत्र आवश्यक आहेत.

फास्टॅग हे आपण आपल्या बँक खात्याबरोबर किंवा पेटीएम वॉलेट सोबत जोडू शकतो.

जर आपले बँक खाते फास्टॅगशी जोडलेले असेल तर थेट खात्यातून पैसे वजा केले जातात आणि पेटीएम वॉलेट फास्टॅगशी जोडलेले असेल तर थेट वॉलेटमधून पैसे वजा केले जातात.


फास्टॅगची किंमत काय आहे?

फास्टॅगची किंमत कार, जीप, बस, ट्रक या वाहनानुसार निश्चित केली जाते.

आपण ज्या बँकेत किंवा ज्या ठिकाणी फास्टॅग बनवता तेथे सिक्योरिटी डिपॉज़िट आणि फी इत्यादींचे स्वतःचे धोरण असते.


फास्टॅग कसे रीचार्ज करावे?

जर आपले फास्टॅग खाते बँकेशी लिंक केलेले नसेल आणि आपल्या फास्टॅग खात्यातील पैसे संपले असतील तर आपल्याला ते रिचार्ज करावे लागेल कारण आपल्या फास्टॅग खात्यात कमीत कमी 100 रुपये आणि जास्तीत जास्त 1 लाख रुपये असले पाहिजेत. आपण आपल्या सोयीनुसार क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, NEFT, यूपीआय ID आणि नेट बँकिंगचा उपयोग फास्टैग रिचार्ज करण्यासाठी करू शकतो.


फास्टॅग मधील बैलेंस कसे चेक करावे? FASTag Balance Check In Marathi

नॅशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या इंडियन हाईवे मैनेजमेंट कंपनीने फास्टॅगचे बैलेंस चेक करण्यासाठी मिस्ड कॉल अलर्ट हि सुविधा चालू केली आहे. ज्यांनी आपला मोबाइल नंबर NHAI प्रीपेड वॉलेटवर रजिस्टर केला आहे ते या नंबरवर +91 - 8884333331 मिस्ड कॉल देऊन फास्टॅग मधील बैलेंस चेक करू शकतील. हा नंबर टोल फ्री आहे आणि ही सुविधा कधीही वापरु शकतो. जर NHAI च्या प्रीपेड वॉलेटमध्ये एकापेक्षा जास्त वाहन लिंक असतील तर प्रत्येक वाहनांच्या फास्टॅग बैलेंस बद्दल माहिती होईल.

ज्या वापरकर्त्यांनी आपला फास्टॅग इतर प्रीपेड वॉलेट्सशी जोडला आहे तो या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही.

तसेच आपण My FASTag App इंस्टॉल करुन या ॲपद्वारे बैलेंस चेक करु शकतो.

नविन वाहन मालकांना फास्टॅगची चिंता करण्याची गरज नाही. कारण रजिस्ट्रेशन च्या वेळी फास्टॅग त्यांना उपलब्ध करुन दिले जाईल. वाहन मालकाला फक्त फास्टॅग खात्याला सक्रिय आणि रिचार्ज करावा लागेल.

तुमच्याकडे फास्टॅग नसेल तर तुम्हाला कोणीच मार्शल लाईनमध्ये घुसू देणार नाही. जर तुम्ही चुकून फास्टॅगच्या मार्गिकेत घुसल्यास तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.


मला आशा आहे की, आपल्याला फास्टॅग म्हणजे काय? FASTag Information In Marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना हि पोस्ट शेअर करायला विसरू नका. ☺️

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने