रिलायन्स जिओ लवकरच भारतामध्ये 5G नेटवर्क लाँच करणार आहे... 5G launch india information in marathi


Reliance Jio announced made in India 5G network 

मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की, चीन, अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या देशांमध्ये 5 जी तंत्रज्ञान वापरले जात आहे. आणि आता रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्स इंडस्ट्रीजने जाहीर केले आहे की, ते भारतात लवकरच 5G नेटवर्क तंत्रज्ञान लाँच करणार आहेत.


jio 5G


रिलायन्स जिओ भारतामध्ये लवकरच 5G नेटवर्क लाँच करणार


आरआयएलच्या (RIL) च्या 43 व्या वार्षिक सभेमध्ये अंबांनी यांनी या 5G नेटवर्क तंत्रज्ञान बद्दल घोषणा केली. या सभेत अंबानी म्हणाले, जिओने सुरवातीपासून संपूर्ण 5G सोल्यूशन विकसित केले आहे. हे आपल्याला 100% होमग्राउन तंत्रज्ञान आणि सोल्यूशन वापरुन भारतात जागतिक स्तरीय 5G तंत्रज्ञान सेवा सुरू करण्यास सक्षम करेल. 5G नेटवर्क तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी दूरसंचार संचालकांना स्पेक्ट्रमचे वाटप केले आहे. कंपनीने सांगितले आहे की, जेव्हा स्पेक्ट्रम उपलब्ध होतील तेव्हा देशात विकसित तंत्रज्ञानाची सोल्यूशन ट्रायल सुरू होईल. आणि हे पाऊल देशाला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने असेल.

जिओ आणि क्वालकॉमने 5G सोल्यूशन्सची यशस्वी चाचणी केली. जिओ आणि क्वालकॉम यांनी जाहीर केले आहे की ते भारतात 5G सोल्यूशन्स आणि नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. आणि एकदा जिओचा 5G सोल्यूशन भारत-स्तरावर सिद्ध झाल्यावर, संपूर्ण व्यवस्थापित सेवा म्हणून जिओ प्लॅटफॉर्म द्वारे हि सेवा जागतिक स्तरावर उपलब्ध होईल.

हि 5G सेवा सुरू करण्यासाठी जियो प्लॅटफॉर्मने आपले डिजिटल उद्दीष्ट साध्य करण्यासाठी फेसबुक, क्वालकॉम, इंटेल आणि अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी जिओमध्ये गुंतवणूक केली आहे.


वाचा: Motorola G 5G स्मार्टफोन भारतात लाँच


भारतात 5G कधी येईल? 5G launch date in india

आता 5G स्मार्टफोन पण लाँच व्हायला सुरवात झालेली आहे. आणि बरेच यूजर्स हे 5G नेटवर्क लाँच होण्याची वाट पाहात आहेत. भारतात 5G कधी लाँच होईल याबाबत अद्याप अशी कोणतीही माहिती कंपनीने दिली नाही. पण बातम्यांवरून असे समजत आहे की, सरकार लिलावाद्वारे स्पेक्ट्रमची विक्री करताच देशी 5G नेटवर्क लॉन्च होईल. स्पेक्ट्रम हे मार्च 2021 मध्ये उपलब्ध होऊ शकतो आणि 5G नेटवर्क हि सेवा लोकांपर्यंत पोहचण्यासाठी एक ते दीड वर्ष लागू शकतात.. 

5G नेटवर्क तंत्रज्ञान कसे असेल?

ज्याप्रमाणे 4G सेवा सुरू झाल्याने इंटरनेट जगात एक क्रांती घडली, त्याचप्रमाणे भारतात 5G सेवा सुरू झाल्यानंतर इंटरनेटची गती 4G पेक्षा 100 ते 200 पटीने अधिक वाढेल. पूर्वीपेक्षा व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि वेब लोडिंग अधिक चांगल्या प्रकारे होईल. मोबाइल टॉवरच्या अंतरामुळे बर्‍याचदा फोनची इंटरनेट सेवा खंडित होते, परंतु 5G च्या आगमनाने ही समस्या देखील दूर होईल. डाउनलोड आणि अपलोड अधिक वेगाने होईल.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने