मोटोरोला G 5G स्मार्टफोन भारतात लाँच - संपूर्ण माहिती Motorola Moto G 5G Full Details in Marathi


Motorola Moto G 5G information in marathi


moto g 5g


मोटोरोला G 5G हा स्मार्टफोन आज सोमवारी भारतात लाँच झाला आहे. मोटोरोला मोटो जी 5जी हा फोन भारताचा सर्वात स्वत अफॉर्डेबल 5 जी स्मार्टफोन' असणार आहे असे कंपनी चे म्हणने आहे. हा फोन फक्त flipkart वर उपलब्ध असेल. या फोन चि पहिली सेल हि 7 डिसेंबर ला दुपारी 12PM वाजता सुरू होईल. हा फोन व्हॉल्वॅनिक ग्रे आणि फ्रॉस्टेड सिल्व्हर कलर ऑप्शन्समध्ये देण्यात आला आहे.


Motorola Moto G 5G चे स्पेसिफिकेशन


मोटोरोला मोटो जी 5जी मध्ये 6.7 इंचाचा फूल एचडी+ एलसीडी आयपीएस एचडीआर 10 मॅक्स व्हिजन डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याची पिक्सल डेंसिटी 394पीपीआई आहे.

फोन मध्ये 20.9 डिस्प्ले Aspect Ratio मिळतो. आणि 90% अ‍ॅक्टिव्ह एरिया टच पॅनल (AA-TP) मिळतो.

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये GPU एड्रेनो 619 दिले आहे.

6 जीबी रॅम आणि 128 जीबीचं इनबिल्ड स्टोरेज देण्यात आलं आहे. ज्याचे स्टोरेज आपण मायक्रोएसडी कार्ड वापरुन 1 TB पर्यंत वाढवू शकतो.

फोनमध्ये मागील बाजूस माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

मोटो जी 5जी हा फोन अँड्रॉयड 10 वर कार्य करतो.

स्मार्टफोनला 5000mAhची बॅटरी देण्यात आली आहे. आणि हा फोन 20 वॅटची टर्बोपावर चार्जिंग सपोर्ट करतो

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5 जी, एनएफसी, ब्लूटूथ 5.1, वाय-फाय 802.11 एसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस इ.

Moto G 5G फोन डस्ट रेझिस्टंटसाठी IP52 सर्टिफाइड आहे.

फोन चे डायमेंशन 166x76x10mm आणि वजन 212 ग्रॅम आहे.

फोटोग्राफी करण्यासाठी या न्यू 5G जनरेशन स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 48 मेगापिक्सल प्राइमरी, 8 मेगापिक्सला वाइड अँगल लेंन्स आणि 2 मेगापिक्सलचा मैक्रो सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या पुढच्या बाजूला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.


Motorola Moto G 5G चि किंमत(Moto G 5G price in India)


Motorola Moto G 5G ची भारतामध्ये किंमत (6+128) ₹20,999 रुपये आहे.

हा फोन पूर्णपणे फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे आणि लॉन्च ऑफरमध्ये एसबीआय आणि अॅक्सिस कार्ड धारकांना 5 टक्के कॅशबॅक देण्यात येणार आहे.  एचडीएफसी बँकेच्या कार्डांवर Rs 1000 रुपयांची सूट दिली आहे.

मोटोरोला कंपनी लवकरच देशात Moto G9 पॉवर हा स्मार्टफोन लाँच करणार आहे.
टिपस्टर मुकुल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटो जी 9 पॉवर डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात लॉन्च होईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने