PUBG मोबाईल लवकरच भारतामध्ये परत येणार आहे. Pubg mobile information in marathi

दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर PUBG प्लेयर्स साठी आनंदाची बातमी आहे. PUBG हा गेम लवकरच कमबैक करणार आहे. PUBG कॉर्पोरेशन ने भारतामध्ये हा गेम परत आणण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतात PUBG परत पुन्हा सुरू केला जाणार आहे आणि या वेळेस या गेम चे नाव पब्जी मोबाइल इंडिया (PUBG MOBILE INDIA) असणार आहे. चला तर मग PUBG Mobile India शी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊया.

PUBG Mobile India


PUBG Mobile लवकरच भारतामध्ये परत येणार आहे.

केंद्र सरकारने मंगळवारी भारतात मोबाइल गेमच्या अधिकृत नोंदणीला मान्यता दिली आहे. कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने (Ministry of Corporate Affairs) PUBG इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला मान्यता दिली म्हणून PUBG मोबाईल इंडिया आता भारताची कायदेशीर नोंदणीकृत कंपनी झाली आहे. PUBG मोबाईल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बेंगलुरूमध्ये रजिस्टर झाली आहे. कुमार कृष्णन अय्यर आणि ह्युनिल सोहन हे या भारतीय कंपनीचे संचालक आहेत.


PUBG ने PUBG प्लेयर्स वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट या कंपनीसोबत हात मिळवला आहे. आपल्याला तर माहीतच आहे की मायक्रोसॉफ्ट हि कंपनी जगाची सर्वात मोठी टेक कंपनी आहे. PUBG भारतीय वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित करण्यासाठी मायक्रोसॉफ्टची क्लाऊड सर्व्हिस अ‍ॅझूर (Azure) वापरणार आहे. नवीन प्रोजेक्ट साठी PUBG ची मूळ कंपनी क्राफ्टनने मायक्रोसॉफ्टशी पार्टनरशिप केली आहे. डेटा प्राइवेसी आणि सुरक्षेबाबत भारत सरकारच्या नियमांनुसार, PUBG वापरकर्त्यांचा डेटा इंडिया च्या बाहेर न जाण्यासाठी सेटअप तयार केला जात आहे. यामुळे PUBG वापरकर्त्यांचा डेटा अधिक सुरक्षित राहणार आहे.

 PUBG कंपनीने एक नवीन वेबसाईट तयार केली आहे. ज्यावर 'कमिंग सून' ची टॅगलाइन देखील देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कंपनीने आपले पहिले ट्रेलर जारी केले आहे. ट्रेलर आपल्याला PUBG मोबाईल इंडियाच्या सोशल मीडिया वाहिन्यांवर पाहायला मिळेल. या ट्रेलर मध्ये आपल्याला PUBG मोबाईल संबंधित पर्सनालिटी डायनामा, क्रॉटेन आणि जोनाथन पाहायला मिळतील.

PUBG


PUBG गेम मध्ये काय नवीन असणार आहे?

PUBG भारतात पुन्हा येणार असल्याची बातमी समजताच PUBG प्लेयर्स च्या मनात हा प्रश्न पडला की पब्जीमध्ये काही बदल झाला आहे का? तर गेम डेव्हलपरकडून आलेल्या अधिकृत विधानानुसार, सर्वप्रथम या गेमचे नाव PUBG मोबाइल इंडिया असेल आणि दुसरे म्हणजे, गेममध्ये काही किरकोळ बदल देखील करण्यात आले आहेत. अगोदर जसा हा गेम होता अगदी तसाच हा गेम असणार आहे. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथून आपण हा गेम सोडला तिथूनच हा गेम सुरू होईल.

 

PUBG Mobile कधी लॉन्च होणार आहे?

Pubg launch date in india


PUBG मोबाईल इंडीया हा गेम भारतात कधी सुरू होईल, याबाबत अद्याप अशी कोणतीही माहिती कंपनीने दिली नाही. PUBG कंपनीच्या वेबसाइट वर कमिंग सून' ची टॅगलाइन दिलेली आहे. PUBG प्लेयर्स हे PUBG मोबाईल इंडीया लॉन्च होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारने मान्यता दिल्यामुळे लवकरच भारतात 'पबजी मोबाइल इंडिया गेम' डिसेंबर च्या पाहिल्या आठवड्यात लॉन्च होऊ शकतो. या गेम चि नवीन शैली पूर्वीपेक्षा वापरकर्त्यांसाठी अधिक चांगली असल्याचे बोलले जात आहे.


FAU-G Game काय आहे? कधी लाँच होणार आहे? संपूर्ण माहिती...


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने