6000mah बॅटरी सोबत Tecno Pova स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर


Tecno Pova Launched in India

टेक्नो ने आपला नवीन स्मार्टफोन Tecno Pova भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट वर उपलब्ध असणार आहे आणि या फोन चि पहिली सेल हि 11 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरू होईल. हा एक बजेट स्मार्टफोन असून टेक्नो कंपनीने या फोन मध्ये अनेक फीचर दिले आहेत. तर चला जाणून घेऊया Tecno Pova या स्मार्टफोन विषयी सर्व माहिती...

Tecno Pova

Tecno Pova स्मार्टफोन चि किंमत
(Tecno Pova price in India)

भारतात या फोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. तसेच Tecno Pova स्मार्टफोन डझल ब्लॅक, मॅजिक ब्लू आणि स्पीड पर्पल अशा तीन कलर मध्ये आहे.

Tecno Pova स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

Tecno Pova मध्ये 6.8 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे resolution 720x1640 पिक्सेल्स आहे. फोन मध्ये 20.5.9 डिस्प्ले Aspect Ratio मिळतो. आणि 90.4% स्क्रीन-टू-बॉडी रेशियो मिळतो.

ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी80 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये GPU ARM G52 MC2 दिले आहे.

4 जीबी रॅम + 64 जीबी आणि 6 जीबी रॅम +128 जीबीचं इनबिल्ड स्टोरेज देण्यात आलं आहे. ज्याचे स्टोरेज आपण मायक्रोएसडी कार्ड वापरुन 256 जीबी पर्यंत वाढवू शकतो.

फोनमध्ये मागील बाजूस फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

Tecno Pova हा फोन अँड्रॉयड 10 वर कार्य करतो.

स्मार्टफोनला 6000mAhची बॅटरी देण्यात आली आहे. आणि हा फोन 18 वॅटची डुअल आयसी फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो. बॉक्स मध्ये पण आपल्याला 18W वाला पॉवर adapter मिळतो.

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4 जी, ब्लूटूथ 5.0, वाय-फाय 802.11 एसी, मायक्रो-यूएसबी पोर्ट, जीपीएस, 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

फोन चे डायमेंशन 77.57x171.23x9.4mm आणि वजन 215.5 ग्रॅम आहे.

फोटोग्राफी करण्यासाठी या न्यू जनरेशन स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 16 मेगापिक्सल प्राइमरी, 2 मेगापिक्सल मैक्रो कैमरा, 2 मेगापिक्सलचा पोट्रेट कैमरा आणि AI लेंस देण्यात आला आहे.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

तसेच Tecno Pova स्मार्टफोन मध्ये Dirac technology वाला high sound देण्यात आला आहे.


वाचा: Motorola G 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने