धमाकेदार फीचर्स घेऊन Infinix zero 8i स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स


Infinix zero 8i Launched in India

इनफिनिक्स ने आपला नवीन स्मार्टफोन Infinix zero 8i भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट वर उपलब्ध असणार आहे. इनफिनिक्स कंपनीने या स्मार्टफोन मध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा सोबत अनेक धमाकेदार फीचर दिले आहेत. हा स्मार्टफोन सिल्व्हर डायमंड आणि ब्लॅक डायमंड कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. तर चला जाणून घेऊया infinix zero 8i या स्मार्टफोन विषयी सर्व माहिती... 

Infinix zero 8i


Infinix zero 8i स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स | Infinix zero 8i specifications - features


infinix zero 8i मध्ये 6.85 इंचाचा फूल एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे resolution 2460x1080 पिक्सेल्स आहे. फोन मध्ये 20.5.9 डिस्प्ले Aspect Ratio मिळतो. आणि 90.1% स्क्रीन-टू-बॉडी रेशियो मिळतो.

ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी90T प्रोसेसर देण्यात आला आहे.

8 जीबी रॅम + 128 जीबीचं इनबिल्ड स्टोरेज देण्यात आलं आहे. ज्याचे स्टोरेज आपण मायक्रोएसडी कार्ड वापरुन 256 जीबी पर्यंत वाढवू शकतो.

फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

infinix zero 8i हा फोन अँड्रॉयड 10 वर कार्य करतो.

स्मार्टफोनला 4500mAhची बॅटरी देण्यात आली आहे. आणि हा फोन 33 वॅटची फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो.

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4 जी, ब्लूटूथ v5.0, वाय-फाय 802.11 a/b/g/n, मायक्रो-यूएसबी पोर्ट, जीपीएस, 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

फोन चे डायमेंशन 76.08 x 168.74 x 9.07mm आणि वजन 210.5 ग्रॅम आहे.

फोटोग्राफी करण्यासाठी या न्यू जनरेशन स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 48 मेगापिक्सल प्राइमरी, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंन्स कैमरा, 2 मेगापिक्सलचा depth कैमरा आणि AI लेंस देण्यात आला आहे.

Infinix zero 8i camera

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. ज्यात 16 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे.

तसेच infinix zero 8i स्मार्टफोन मध्ये मल्टि - dimensional liquid cooling टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.

फोन चि डिझाईन 3D Gem cot texture मध्ये तयार केली आहे.


Infinix zero 8i स्मार्टफोन चि किंमत | Infinix zero 8i price in India 


infinix zero 8i हा फोन फक्त एकाच व्हेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. भारतात या फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे.

हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहे आणि लॉन्च ऑफरमध्ये एचडीएफसी बँकेच्या कार्डांवर Rs.1750 रुपयांची सूट देण्यात येणार आहे आणि
अॅक्सिस कार्ड धारकांना 5 टक्के कॅश बॅक देण्यात येणार आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने