डॉ. ए पी जे अब्दुल कलाम माहिती मराठी - Dr APJ Abdul Kalam Information In Marathi

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम माहिती मराठी - Dr Apj Abdul Kalam Yanchi Mahiti डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी भारतातील प्रत्येक जनतेच्या मनात त्यांच्याप्रती आजसुद्धा भरपूर आदर आहे.

अब्दुल कलाम माहिती - Abdul-Kalam-Information-in-marathi

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम माहिती - Dr Apj Abdul Kalam Yanchi Mahiti

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन आणि भारतीय जनतेचे सर्वात लोकप्रिय असलेले राष्ट्रपती या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. त्यांनी शिकवले, जीवनात परिस्थिती काय असु शकते याची पर्वा नाही, परंतु जेव्हा आपण आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा दृढ निश्चय करतो तेव्हा आपण ती पूर्ण करूनच जगतो. अब्दुल कलाम यांचे हे विचार अजूनही आपल्या पिढीला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात.

चला तर मग जाणून घेऊया भारताच्या या महान दिलदार व्यक्तिमत्व असणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनाशी जोडलेल्या काही विशेष गोष्टी…


भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय 


"स्वप्ने ते नाही जे आपण झोपेत पाहतो, स्वप्ने ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाहीत."


संपूर्ण नाव      ➡️ अवुल पाकिर जेनुलब्दिन अब्दुल कलाम

जन्म             ➡️ 15 ऑक्टोबर 1931

मृत्यू.             ➡️ 27 जुलै 2015

जन्मस्थान      ➡️ रामेश्वरम, तामिळनाडू, भारत

मृत्यूचे ठिकाण ➡️ शिलाँग, मेघालय, भारत

वडिलांचे नाव  ➡️ जेनुलब्दिन

आईचे नाव     ➡️ अशिअम्मा

पत्नी             ➡️ N/A

भाऊ             ➡️ चार

बहीण           ➡️ एक

शिक्षण          ➡️ एरोनॉटिकल इंजीनिअर

धर्म              ➡️ इस्लाम

राष्ट्रीयत्व       ➡️ भारतीय

भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अवुल पाकिर जेनुलब्दिन अब्दुल कलाम आहे. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपले महत्त्वपूर्ण योगदान देऊन भारताला एक नविन दिशा दाखवली होती. ते एक बिगर-राजकीय व्यक्ती होते, तरीही विज्ञानविश्वात चमत्कारिक कामगिरीमुळे ते इतके लोकप्रिय झाले की देशाने त्यांना डोक्यावर उचलले आणि सर्वोच्च स्थानावर उभे केले. असे म्हणतात की एखाद्या विशिष्ट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीसाठी, इतर क्षेत्रातही सर्व काही सोपे आणि सहज होते. 

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे खूप महान व्यक्ती होते. ते पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी ”अग्नी” मिसाईल चे उडाण करून आपल्या देशाची शक्ती संपूर्ण जगाला दाखवून दिली होती.

डॉ. कलाम एक अविवाहित नागरिक आहेत आणि त्यांची जीवनकथा ही एका रोचक कादंबरीच्या नायकाच्या कथेपेक्षा कमी नाही. चमत्कारी प्रतिभा असलेले डॉ. कलाम यांचे व्यक्तिमत्त्व इतके प्रगत आहे की ते सर्व धर्म, जाती, पंथांचे व्यक्ती असल्याचे दिसून येते.

भारत अंतराळात पोहोचवण्याचे आणि क्षेपणास्त्रांची क्षमता देण्याचे श्रेय डॉ. कलाम यांना जाते.  त्यांच्या अग्नि आणि पृथ्वी सारख्या यशस्वीरित्या विकसित केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी देशाची सुरक्षा मजबूत केली आहे.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे बालपण

डॉ.ए.पी.जे. अब्दुल यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूमधील रामेश्वरम शहरात एका मध्यमवर्गीय तमिळ कुटुंबात झाला. डॉ. कलाम यांचे वडील जेनुलब्दिन यांचे फार चांगले शिक्षण झाले नव्हते आणि ते श्रीमंत व्यक्तीही नव्हते. डॉ. कलाम यांची आई अशिअम्मा हि त्यांच्या जीवनाची आदर्श होती. कलाम यांना एक छोटी बहीण आणि चार भाऊ होते, त्यांच्यापैकी ते कुटुंबातील सर्वात लहान सदस्य होते. कलाम यांचे कुटुंब खूप गरीब होते, त्यामुळे कलाम यांनी अगदी लहान वयातच आपले घर चालवण्यासाठी वर्तमानपत्रे विकली.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर आणि रामेश्वरम येथील प्रसिद्ध शिव मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मस्जिदवाली गल्लीत ते आपल्या वडिलोपार्जित घरात राहत होते.  रामेश्वरमहून धनुष्कोटी येथे हिंदू यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या लाकडी नौका तयार करण्यासाठी त्याच्या वडिलांनी स्थानिक ठेकेदारासह काम केले. डॉ. कलाम यांना आपल्या वडिलांचा प्रामाणिकपणा आणि आत्म-शिस्तीचा वारसा मिळाला आणि आईकडून विश्वास आणि करुणा मिळाली.

डॉ. कलाम यांचे शिक्षण

डॉ. कलाम यांचे शिक्षण रामेश्वरम प्राथमिक शाळेतून झाले. यानंतर त्याचे पुढील शिक्षण रामानाथपुरममधील श्वार्ट्ज हायस्कूलमधून झाले.

डॉ. कलाम यांचे शिक्षक अयादुरई शलमोन म्हणायचे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आणि परिणाम साध्य करण्यासाठी आपल्याला "इच्छा, विश्वास आणि आशा" या तीन महत्त्वाच्या गोष्टी समजल्या पाहिजेत. म्हणूनच डॉ. कलाम यांनी श्वार्ट्ज हायस्कूल मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ते यशस्वी होण्याच्या भावनेने प्रयत्न करत होते.

त्यानंतर त्यांनी परत पुढे अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळेस त्यांना व्यावसायिक शिक्षणाच्या संभाव्यातेची माहिती नव्हती, म्हणून त्यांनी 1950 मध्ये इंटरमीडिएट चे शिक्षण घेण्यासाठी तिरुचिरापल्लीच्या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये बी-एस-सी साठी प्रवेश घेतला. 

बी-एस-सी पूर्ण केल्यावर त्यांना समजले की भौतिकशास्त्र हा त्यांचा आवडता विषय नाही. म्हणून त्यांना वाटत होते की, आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला इंजीनियरिंग मध्ये जायला हवे होते. त्यानंतर त्यांनी दक्षिण भारतातील तांत्रिक शिक्षणासाठी खास संस्था असलेल्या मद्रास इंस्टीट्यूट आफ टेक्नोलॉजी (एम.आई.टी.) मध्ये प्रवेश घेतला. एम.आई.टी मध्ये उड्डाण संबंधित मशीन चे विभिन्न कार्य समजण्यासाठी नमुने म्हणून ठेवलेल्या दोन विमानांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले.  

पहिले वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एरोनॉटिकल इंजीनियरिंग ला आपला विशेष विषय म्हणून निवडले. पदवी नंतर ते हिन्दुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बंगलौर येथे गेले. तेथे त्यांनी टीमचे सदस्य म्हणून विमानाच्या इंजिनच्या देखभालीचे काम केले, तसेच तेथे त्यांनी दोन्ही प्रकारच्या इंजिनच्या पिस्टन आणि टर्बाइन इंजिनवर काम केले. यांसह त्यांनी रेडियल इंजिन आणि ड्रम ऑपरेशन्सचे देखील प्रशिक्षण घेतले.

काही कालावधी नंतर,  अब्दुल कलाम यांनी भारताचे सर्वात महान वैज्ञानिक च्या रुपात आपली ओळख संपूर्ण जगाला करून दिली.

अब्दुल कलाम यांना भारतातील सर्वात सर्वोच्च पद असणारा देशाचा पहिला नागरिक म्हणून राष्ट्रपती पद भूषविले होते. ते पहिले असे राष्ट्रपती होते ज्यांचा राजकारणाशी काहीही सबंध नव्हता.

डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे कार्य

अब्दुल कलाम यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम “संरक्षण संशोधन आणि विकास संस्था” (DRDO) मध्ये वैज्ञानिक म्हणून काम सुरु केले.

त्यांनी आपल्या वैज्ञानिक्तेच्या कारगीर्दीत सुरवातीलाचा एका छोट्याशा हेलिकॉप्टर ची डिजाईन तयार केली.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था” (DRDO) येथे काही काळ नौकरी केल्यानंतर ते “इंडियन कमेटी फॉर स्पेस रिसर्च” चे सदस्य सुद्धा राहिले होते.

१९६२ मध्ये ते भारताचे महत्वपूर्ण संगठन असलेल्या “भारतीय अंतरीक्ष अनुसंधान संगठन” (ISRO) सोबत जुळले होते.

तंत्रज्ञानाचा वापरत करून त्यांनी अग्नी आणि पुर्थ्वी सारख्या मिसाईल तयार करून त्यांनी विज्ञान क्षेत्रांतच आपले महत्वपूर्ण योगदान दिले.

१९९२ पासून १९९९ च्या कालावधी दरम्यान जेव्हा केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांची सत्ता होती. त्यावेळेला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारताचे रक्षा मंत्री यांचे रक्षा सल्लागार म्हणून देखील काम केले होते.

भारताचे 11 वे राष्ट्रपति

18 जुलै 2002 रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये डॉ. कलाम यांना भारताचे अकरावे राष्ट्रपति म्हणून निवडले गेले. त्यांनी 25 जुलै 2002 रोजी संसद भवन येथील अशोका हॉलमध्ये राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. त्याचा कार्यकाळ 25 जुलै 2007 रोजी संपला.

डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपतीपद सोडल्यानंतर

राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी  अध्यापन, संशोधन, लेखन, सार्वजनिक सेवा यासारख्या कामांमध्ये त्यांनी मोठ्या जोमाने आणि प्रामाणिकपणाने कार्य केले.

कलाम यांनी राष्ट्रपतीपद सोडल्यानंतर भारतीय व्यवस्थापन संस्था शिलॉन्ग, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरूचे मानद फेलो आणि भेट देणारे प्राध्यापक बनले.

भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थान तिरुअनंतपुरमचे कुलगुरू, अन्ना विश्वविद्यालय मध्ये
एयरोस्पेस इंजीनियरिंगचे प्राध्यापक आणि भारतभरातील इतर अनेक शैक्षणिक आणि संशोधन संस्थांचे सहायक झाले. त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालय आणि अन्ना विश्वविद्यालय मध्ये माहिती तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थान, हैदराबाद येथे माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले.

कलाम यांना 2003 आणि 2006 मध्ये "एमटीव्ही युथ आयकॉन ऑफ द इयर" साठी नामांकन मिळालेले होते.

डॉ कलाम यांनी लिहिलेली पुस्तके

डॉ कलाम यांची लेखी पुस्तके खूप लोकप्रिय झाली आहेत. ते त्यांच्या पुस्तकातील बहुतेक भाग रॉयल्टी स्वयंसेवी संस्थांना देतात. मदर टेरेसा यांनी स्थापन केलेली 'सिस्टर्स ऑफ चॅरिटी' त्यापैकी एक आहे.

• अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)

• इग्नाइटेड माइंड्स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)

• ‘इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); ‘भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)

• इंडिया – माय-ड्रीम

• उन्नयन (ट्रान्सेन्डन्सचा मराठी अनुवाद, सकाळ प्रकाशन)

• एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन :

• फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन

• विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक : माधुरी शानभाग.

• सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)

• टर्निंग पॉइंट्स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)

• टार्गेट ३ मिलियन (सहलेखक – सृजनपालसिंग)

• ट्रान्सेन्डन्स : माय स्पिरिचुअल एक्सपिरिअन्सेस विथ प्रमुखस्वामीजी (सहलेखक – अरुण तिवारी)

• दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)

• परिवर्तनाचा जाहीरनामा (मूळ इंग्रजी-अ मॅनिफेस्टो फॉर चेंज) सहलेखक – व्ही. पोतराज, मराठी

अनुवाद – अशोक पाध्ये)

• ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी)

➡️छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास

डॉ अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार

डॉ अब्दुल कलाम यांच्या  79 व्या जन्म दिवसी संयुक्त राष्ट्र संघाद्वारा जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला.

भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच देश आणि समाजासाठी केलेल्या त्यांच्या कार्याबद्दल डॉ. कलाम यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. वर्ष - पुरस्कार - संस्थां आणि विद्यापीठांनी दिलेल्या पुरस्कारां बद्दल पाहूया...

1981 मध्ये - पद्म भूषण - भारत सरकार

1990 मध्ये - पद्म विभूषण - भारत सरकार

1994 मध्ये - विशिष्ट फेलो - इंस्टिट्यूट ऑफ़ डायरेक्टर्स (भारत)

1997 मध्ये - भारत रत्न - भारत सरकार

1997 मध्ये - इंदिरा गांधी पुरस्कार - भारतीय राष्ट्रीय कांग्रेस

1998 मध्ये - वीर सावरकर पुरस्कार - भारत सरकार

2000 मध्ये - रामानुजन पुरस्कार - अल्वर्स रिसर्च सैंटर, चेन्नई

2007 मध्ये - साइंस की मानद डाक्टरेट - वॉल्वर हैम्प्टन विश्वविद्यालय,ब्रिटेन

2007 मध्ये - चार्ल्स द्वितीय पदक - रॉयल सोसाइटी , ब्रिटेन

2008 मध्ये - डॉक्टर ऑफ़ इंजीनियरिंग - नानयांग प्रौद्योगिकी विश्वविद्यालय , सिंगापुर

2009 मध्ये - अंतर्राष्ट्रीय करमन वॉन विंग्स पुरस्कार - कैलिफोर्निया प्रौद्योगिकी संस्थान , संयुक्त राज्य अमेरिका

2009 मध्ये - हूवर मेडल - ASME फाउंडेशन, संयुक्त राज्य अमेरिका

2009 मध्ये - मानद डॉक्टरेट - ऑकलैंड विश्वविद्यालय

2010 मध्ये - डॉक्टर ऑफ़ इंजीनियरिंग - वाटरलू विश्वविद्यालय

2011 मध्ये - आईईईई मानद - आईईईई

2012 मध्ये - डॉक्टर ऑफ़ लॉ ( मानद ) - साइमन फ्रेजर विश्वविद्यालय

2014 मध्ये - डॉक्टर ऑफ साइंस - एडिनबर्ग विश्वविद्यालय, ब्रिटेन

डॉ अब्दुल कलाम यांचे महान विचार

•"जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे चटके सहन करावे लागतीन."

•"जोपर्यंत तुम्ही जगासमोर उभे राहत नाही, कोणीही तुमचा आदर करणार नाही. या जगात भीतीला स्थान नाही. केवळ सामर्थ्य सामर्थ्याचा आदर करते."

•"स्वप्ने ते नाही जे आपण झोपेत पाहतो, स्वप्ने ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाहीत."

• "कृत्रिम सुखऐवजी ठोस कामगिरीसाठी समर्पित व्हा."

•"आपण आपले भविष्य बदलू शकत नाही, परंतु आपण आपल्या सवयी बदलू शकता आणि निश्चितच आपल्या सवयी आपले भविष्य बदलतील."

डॉ अब्दुल कलाम यांचे निधन

27 जुलै 2015 रोजी संध्याकाळी अब्दुल कलाम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलॉंग येथे 'राहण्यायोग्य ग्रह' विषयावर व्याख्यान देत होते तेव्हा त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते खाली बेशुद्ध पडले. सुमारे 6:30 वाजता गंभीर अवस्थेत त्यांना बेथानी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये नेण्यात आले आणि दोन तासानंतर त्यांचे निधन झाले.

हॉस्पिटलच्या सीईओ जॉन साइलो ने सांगितले की, जेव्हा कलाम यांना हॉस्पिटल मध्ये आणले होते तेव्हा त्यांचा नाडी आणि ब्लड प्रेशर नी साथ सोडली होती. त्यांच्या मृत्यूच्या सुमारे 9 तास आधी त्यांनी ट्विट केले की ते शिलांग आयआयएममध्ये व्याख्यान देण्यासाठी जाणार आहेत.

काही तासांनी त्यांनी आपल्या जीवनातील अंतिम श्वास घेतला.

अब्दुल कलाम यांचा अंत्यसंस्कार त्यांच्या रामेश्वर मधील पैतृक गावात करण्यात आला होता.

अश्याप्रकारे महान व्यक्तिमत्व असणाऱ्या या महान वैज्ञानिक राजनेत्याने जगाचा कायमचा निरोप घेतला. आज सुद्धा अश्या या महान राजनेत्याच्या आठवणी भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत.

भारताच्या प्रगतीसाठी त्यांनी दिले असलेले महत्वपूर्ण योगदान आणि त्यांनी केल्या असलेल्या उत्कृष्ट कामगिरींमुळे भारत देश आज सुद्धा त्याचं स्मरण करीत असतो.

मला आशा आहे की, आपल्याला डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहिती मराठी Dr APJ Abdul Kalam Information In Marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना हि पोस्ट शेअर करायला विसरू नका. ☺️

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻


वाचा ➡️ नरेंद्र मोदी यांचा जीवन परिचय

➡️टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य - टायगर ग्रुप चे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव (Tanaji Bhau Jadhav)

4 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने