छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास | Shivaji Maharaj Information In Marathi


Shivaji Maharaj Information In Marathi मित्रांनो आपल्या भारताच्या इतिहासात असंख्य देशशक्तींनी आणि शूरविरांनी आपले बलिदान दिले आहेत. त्या शूरविरांपैकी एक म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांचे शौर्य, धाडस आणि पराक्रम अतुलनीय आहे. त्यांनी मुघल साम्राज्याला हादरवून मराठा साम्राज्य उभे केले आहे. तर आजच्या पोस्टमधे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती | Shivaji Maharaj Information In Marathi यांच्या बद्दल जाणून घेऊया... 

छत्रपती-शिवाजी-महाराजांचा-इतिहास-छत्रपती-शिवाजी-महाराज-यांच्या-विषयी-माहिती-Shivaji-Maharaj-Information-In-Marathi

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भारतातील एक शूर, हुशार आणि बुद्धिमान राजे आहेत. बरेच लोक त्यांना हिंदु हृदय सम्राट म्हणून ओळखतात. त्यांची गाथा आणि पराक्रम खूप अगणित आहे. त्यांनी आपल्याला साडेतिनशे वर्षाच्‍या गुलामगीरीच्‍या बंधनातुन मुक्‍त करून शांतीने जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती | Shivaji Maharaj Information In Marathi

श्रीमंत छत्रपती शिवरायांचे अखंड कर्तृत्व या लेखात मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.

अष्टपैलू छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यामुळे त्यांना एक आदर्श मानून संपूर्ण महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी रोजी त्यांची जयंती साजरी केली जाते. 

⛳ !!પ્રૌઢ_પ્રતાપ_પુરંધર_ક્ષત્રિય_કુભાવતંસ_સિંહાસનાધીશ્વર.|| છત્રપતી_શિવાખી_મહારાખ_કી_ખય !! ⛳       

  

संपूर्ण नाव        ➡️ शिवाजीराजे शहाजीराजे भोसले

जन्म               ➡️ 19 फेब्रुवारी 1630

मृत्यू                ➡️ 3 एप्रिल 1680 

जन्मस्थान        ➡️ शिवनेरी किल्ला, पुणे

मृत्यूचे ठिकाण   ➡️ रायगड किल्ला 

वडिलांचे नाव    ➡️ शहाजीराजे मालोजी भोसले

आईचे नाव        ➡️ जिजाबाई भोसले

पत्नी                ➡️ सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई 

मुले/मुली           ➡️ (धर्मवीर संभाजीराजे आई सईबाई) 

                             (रानुबाई आई सईबाई) 

                             (सखुबाई आई सईबाई)

                             (अंबिकाबाई आई सईबाई) 

                             (राजाराम आई सोयराबाई) 

                             (दिपाबाई आई सोयराबाई)  

                             (राजकुंवरबाई आई सगुणाबाई)

                             (कमलाबाई आई सकवारबाई)

राज्याभिषेक      ➡️ 6 जून 1674

तलवारीचे नाव    ➡️ भवानी तलवार

घोड्याचे नाव      ➡️ मोती, इंद्रायणी, विश्वास, रणबीर, गजरा, तुरंगी आणि कृष्णा  

राष्ट्रीयत्व            ➡️ भारतीय

 लेखात समाविष्ट केलेले मुद्दे

शिवरायांचे बालपण 

शिवरायांच्या जन्माच्या वेळी चे दिवस फाय धावपळीचे आणि धामधुमीचे होते. तेव्हा शहाजी राज्यांनी जिजाबाई यांना पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर ठेवले. त्या किल्ल्याच्या चारही बाजूंना उंच कडे, तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. विजयराज हे या किल्ल्याचे किल्लेदार होते. विजयराज यांच्यावर जिजाबाई यांच्या रक्षणाची जबाबदारी होती. 

नंतर काही दिवसांनी सोन्याचा एक दिवस उजाडला  आणि जिजाबाईंच्या पोटी आपले श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जन्मले. तो दिवस होता फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३०. त्या दिवशी संपूर्ण शिवनेरी किल्ल्यावर आनंदी-आनंद झाला. शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाल्या मुळे त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. 

शिवरायांचे बालपण हे त्यांच्या आईच्या मार्गदर्शनाखाली घडले. जेव्हा शिवराय सहा वर्षांचे झाले तेव्हा जिजाबाईंनी त्यांना शिक्षण देण्याचे सुरू केले. जिजाबाई शिवरायांना राम, कृष्णाच्या, कर्तृत्ववान योध्यांच्या, अभिमन्यूच्या आणि पराक्रमी भिम अर्जुनाच्या गोष्टी सांगत असत. तसेच कधी कधी ज्ञानेश्वरांचे, नामदेवांचे, एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत होत्या. या गोष्टी अणि अभंग सांगत सांगत जिजामाता त्यांच्यावर संस्कार करीत होत्या. 

बालपणामध्ये शिवरायांबरोबर गरीब मावळ्यांची मुले खेळायची. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडायचे त्यांचे खेळ मातीचे किल्ले, हत्ती, घोडे बनविणे हे होते. तसेच लपंडाव, चेंडू भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. 

शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते, आज या किल्ल्यावर, तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ - शिवबांची धावपळ चालू असायची. 

शिवरायांचे शिक्षण 

शहाजीराज्यांनी शिवरायांच्या शिक्षणासाठी हुशार शिक्षकांची नेमणूक केली. तेव्हा शिवराय सात वर्षांचे होते. नंतर काही दिवसांत स्वतः शिवराय लिहिण्याच्या आणि वाचनाच्या कलेत पारंगत झाले. नंतर काही दिवसांनी परत शिवरायांना युद्धकला शिकविण्यात आणि त्यानंतर घोड्यावर बसणे, तलवार चालवणे, दांडपट्टा फिरवणे, कुस्ती खेळणे, अश्या काही विविध विद्या वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत शिवरायांना शिकविण्यात आल्या. 

त्यानंतर जिजाऊंच्या देखरेखीखाली शिवरायांनी उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कसे करावी, शत्रूच्या दुर्गम परदेशातून निसटून कसे जावे अश्या अनेक विद्या आत्मसात केल्या. शिवरायांची ही कामगिरी पाहून जिजामाता यांना खूप आनंद झाला. 

जिजाबाईंनी शिवराय जन्मतःच निश्चय केला होता की, आपला शिवबा हा परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वतः आपल्या लोकांचे राज्य स्थापन करेल. या स्वराज्याच्या विचाराने जिजाबाई शिवरायांना शिक्षण देऊन घडवत होत्या. 

शिवरायांचा विवाह 

शिवरायांच्या काळात लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती. त्यामुळे शिवरायांचा विवाह वयाच्या 10 व्या वर्षी म्हणजे 14 मे 1640 रोजी सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. सईबाई ह्या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील मुलगी होत्या. 

स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा 

मुघलांनी राज्य केले तेव्हा हिंदूंना बर्‍याच अडचणी, अन्याय सहन करावा लागत होता आणि विशेष कर द्यावा लागत होता. पण छत्रपती जन्माला आल्यापासून छत्रपतींना कोणत्याही माणसाला कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करण्याची गरज नाही अशी त्यांची इच्छा होती. म्हणून शिवाजी महाराजांनी मुघलांशी युद्ध करण्याचा संकल्प केला आणि ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, कोणावरही अन्याय होय द्यायचा नाही. सर्वांनी आपले प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे, स्वराज्य हेच आपले ध्येय असे म्हणून शिवरायांनी आणि मावळ्यांनी मिळून हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. 

ही प्रतिज्ञा पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या रायरेश्वराच्या मंदिरात घेतली. प्रतिज्ञा घेतेवेळी सारे मंदिर शिवरायांच्या शब्दाने घुमू लागले. 

त्यानंतर स्वराज्यासाठी शिवराय मावळ्यांना शिक्षण देत होते. तलवार कशी चालवायची घोडदौड कशी करावी, डोंगरातील आड मार्ग कसे शोधावे, शत्रूशी युद्ध कसे करावे, शत्रूच्या दुर्गम परदेशातून निसटून कसे जावे अश्या प्रकारचे बरेच शिक्षण देत होते. 

मावळे खूप कमी दिवसात या सर्व गोष्टी शिकले. तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले. शिवरायांसाठी जगायचे आणि शिवरायांसाठी मरायचे असे म्हणू लागले. हे ऐकून शिवरायांना खूप आनंद झाला. आता त्यांना वाटू लागले की, आपण या मावळ्यांच्या सोबतीने नक्कीच स्वराज्य स्थापन करू शकतो. 

त्यानंतर स्वराज्य स्थापनेसाठी शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ती असी... 

प्रतिपच्चंद्रलेखेव  वर्धिष्णुर्विश्ववंदिता  ।।

शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते  ।। 

अर्थात

प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि सार्‍या विश्वाला वंदनीय होणारी अशी शहाजीपुत्र शिवाजीराजे  यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत लिहिली आहे. 

ही राजमुद्रा स्वराज्यसाठी, प्रजेच्या कल्याणासाठी आहे, असा विश्वास शिवाजी महाराजांनी रयतेला दिला.

शिवाजी महाराजांचे साम्राज्यावर आक्रमण

त्या काळात दिल्लीचे मुघल, विजापूरची आदीलशाही, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिर्‍याचे सिद्दी अश्या चार सत्ता महाराष्ट्रावर हुकुमत करत होत्या. 

तोरणा किल्ला 

त्या काळात ज्याचे किल्ले! त्याचे राज्य! किल्ल्यांशिवाय कसले आले स्वराज्य. हे शिवरायांच्या ध्यानात आले. किल्ला ताब्यात असला की, जवळपासचे आणि आजूबाजूचे प्रदेशावर राज्य करता येते. म्हणून त्यांनी तोरणा किल्ला निवडला. 

तोरणा किल्ला समुद्रसपाटीपासून 1400 मीटर उंचीवर आहे. हा किल्ला प्रचंड मोठा आहे आणि या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या आहेत. एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची. माची म्हणजे किल्ल्याच्या चडणीवर नैसर्गिकरीत्या सपात झालेल्या भागाची तटबंदी. झुंझार माची काही प्रमाणात लहान असली तरी ती चढणे फार अवघड आहे. बुढाला माची राजगड ते तोरणा दरम्यान पसरली आहे. या किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे. त्यावरून ह्या किल्ल्याचे नाव तोरणा पडले. 

पण हा किल्ला विजापूरच्या "आदिलशहा" च्या ताब्यात होता. आनंदाची गोष्ट म्हणजे आदिलशाहाचे या किल्ल्याकडे लक्ष नव्हते आणि किल्ल्यावर जास्त पहारेकरी पण नव्हते. शिवरायांना नेमके हेच हवे होते. 

शिवराय मावळ्यांच्या तुकड्या घेऊन कानद खोर्‍यात उतरले. सर्व मावळे किल्ल्यावर चढले. तानाजी मालुसरे यांनी दरवाज्यावर नियंत्रण केले आणि येसाजी कंक यांनी चौकीवर पहारे बसवले आणि संपूर्ण किल्ला ताब्यात घेतला. शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. 

त्यानंतर शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला “प्रचंडगड” असे नाव दिले. 

नंतर तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार चालू झाला. किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि अचानक भवानी मातेच्या आशीर्वादाने मोहरांनी भरलेल्या दोन घागरी सापडल्या. सगळ्यांना आनंद झाला. 

या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली, दारूगोळा जमा केला. 

राजगड किल्ला 

तोरणा किल्ल्यापासून 15 km पूर्वेला मुरुंमदेवाचा डोंगर आहे. शिवरायांनी अगोदरपासूनच तो हेरून ठेवला होता. या डोंगरावर आदिलशाहाने एक अर्धवट किल्ला बांधुन ठेवला होता. पण या किल्ल्यावर आदिलशाहाचे लक्ष नव्हते आणि किल्ल्यावर जास्त पहारेकरी पण नव्हते.

परत शिवराय मावळ्यांच्या तुकड्या घेऊन किल्ल्यावर चढले आणि किल्ला ताब्यात घेतला. सापडलेल्या धनातून काही धन या किल्ल्यासाठी खर्च केले. 

त्यानंतर शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला “राजगड” असे नाव दिले. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी ठरली. 

कोंढाणा किल्ला 

त्यानंतर शिवरायांनी कोंढाणा आणि पुरंदर हे दोन किल्ले युक्तीने काबीज केले. 

कोंढाणा किल्ला हा समुद्रसपाटीपासून सुमारे 4400 फूट उंचीवर आहे. तसेच महाराष्ट्रातील पुण्यापासून सुमारे 30 KM अंतरावर एका टेकडीवर स्थित आहे. शिवाजी महाराजांपूर्वीही अनेक राजांनी या किल्ल्यावर राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा संपूर्ण किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता. आदिलशहाकडे असताना दादोजी कोंडादेव या किल्ल्याचे सुभेदार होते. इथेच आदिलशहाने आपली छावणी बनवली होती.

नंतर शिवाजी महाराजांनी तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला. 1649 मध्ये शिवाजी महाराजांनी वडिलांच्या सुटकेच्या बदल्यात हा किल्ला आदिलशहाला परत केला. जून 1665 मध्ये शिवाजी महाराजांनी मुघलांशी केलेल्या कराराखाली कोंढाणासह 23 किल्ले जयसिंगास परत केले. या करारामुळे शिवाजी महाराज फारच दु: खी झाले आणि त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलांच्या हातात होते. कोंढाणा हा त्यातलाच एक किल्ला. 

मराठा सैन्यासाठी महत्वाचा असलेला हा किल्ला परत घेण्याचा निर्णय शिवरायांनी घेतला. पण त्यांच्या मनात एक विचार चालू होता की या कामगिरीसाठी कुणाला निवडावे. मग त्यांनी तानाजी मालुसरे यांना निवडले. 

तानाजी मालुसरे हा सुरुवातीपासून शिवरायांचा साथीदार होता. तो मोठा हिम्मतवान, अंगाने धिप्पाड आणि बुद्धीने हुशार मावळा होता. शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती. 

तानाजी आपल्या मूळगावी म्हणजे उंमरठे येथे होता. त्याला एकाच मुलगा होता त्यांचे नाव रायबा.  रायबाच्या लग्नाची तयारी चालू होती. त्याचे लग्न जवळ आले होते. म्हणून तानाजी आणि शेलारमामा दोघे मिळून शिवरायांना आणि जिजामाता यांना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी गेले. 

तेथे गेल्यावर तानाजीला समजले की लग्नापेक्षा कोंढाणा जिंकणे महत्त्वाचे आहे. तानाजी म्हणाला "आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे" असे म्हणून तानाजी कोंढाण्याच्या कामगिरीसाठी तयार झाला. 

त्या वेळेस मुघलांतर्फे जयसिंगाने कोंढाण्यासाठी नेमलेला उदेभान हा राजपूत किल्लेदार होता. कोंढाणा किल्ल्याला दिन दरवाजे होते दोन्ही दरवाज्यावर उदेभान ने कडक पहारा ठेवला होता. त्यामुळे दरवाजा मार्ग गडावर जाणे अवघड होते. 

पण तानाजी मालुसरे यांनी गडावर जाण्यासाठी अगोदरच सर्व तयारी केली होती. त्यांनी मावळ्यांच्या दोन तुकड्या केल्या. एक 500 मावळ्यांची तुकडी त्यांनी आपल्या धाकट्या भावाला म्हणजे सूर्याजी यांना दिली आणि सांगितले सूर्याजी तुम्ही कल्याण दरवाजा गाठा. आम्ही 300 मावळ्यांची तुकडी  घेऊन कडा चढून गडावर येतो. आम्ही गडावर आल्यावर कल्याण दरवाजा उघडतो. मग तुम्ही आत घुसा. 

दोन्ही मावळ्यांच्या तुकड्या कामगिरीसाठी सज्ज झाल्या. रात्रीची वेळ होती. तानाजी आपल्या मावळ्यांना घेऊन किल्ल्याचा कडा चढत होते. कडा फार उंच होता. मोठ्या दिल्लेरीने त्यांनी कडा चढला आणि किल्ल्यावर गेले. 

इकडे सूर्याजीने मावळ्यांना घेऊन कल्याण दरवाजा गाठला. 

4 फेब्रुवारी 1672 रोजी किल्ल्यावर युद्धाला सुरुवात झाली. उदेभानला ही बातमी कळली, तो युद्धासाठी तयार झाला. सपासप वार होत होते, तलवारीने रक्त उडवत होते. मशालींचा नाच सुरु झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडाला. मावळे आणि तानाजी सिंहासारखा लढत होते. उदेभानने तानाजीवर वार केला. दोघेही महान योद्धे होते. दोघेही लढता- लढता रक्ताने लाल झाले. तेवढ्यात तानाजीची ढाल तुटली आणि तानाजी पडला. परत लढाई सुरू झाली, तानाजीचा हात तुटला, तानाजीने हाताला शेला गुंडाळला, तो वार झेलत होता, एका हाताने लढत होता. ते दोघंही जबर जखमी झाले आणि दोघांचाही मृत्यू झाला. त्यांनंतर मावळ्यांनी लढा देत हा गड जिंकला, पण या लढाईत तानाजी सारखा शूर योद्धा स्वराज्यासाठी वीरमरण झाला. ही दुःखद बातमी जिजामातेस व शिवाजी महाराजांना कळली. त्यांना खूप दुःख झाले. गड जिंकला खरा पण शूर तानाजी गेला. शिवराय हळहळले आणि म्हणाले "गड आला, पण सिंह गेला"! 

नंतर शिवरायांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवले आणि उमरठे गावी जाऊन तानाजीच्या रायबाचे लग्न केले. 

रायगड किल्ला

रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे. रायगड किल्ल्याचे जुने नाव रायरी होते. हा किल्ला समुद्रसपाटीपासून 2700 फूट उंचीवर आहे. विजापूरच्या आदिलशाहाने जावळीच्या चंद्रराव मोरे यांना जहागीरदार बनवले होते. रायगडापासून ते कोयना खोर्‍यापर्यंत त्यांचा कब्जा होता. जावळीभोवती घनदाट जंगल होते. या जंगलात वाघ, लांडगे, अस्वले हे प्राणी संचार करत होते. पण काहीही करून शिवरायांना हे जावळी जिंकायची होती. 

भरपूर तयारी करून या युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध सुमारे महिनाभर चालू होते. या युद्धामध्ये बरेच सैन्य मारले गेले. त्यानंतर शिवरायांनी हा किल्ला जिंकला. या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य बळकट झाले. या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. आणि या किल्ल्याचे नाव रायगड ठेवले. 

त्यानंतर त्यांनी जवळ असलेल्या भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला आणि त्या किल्ल्याचे नाव प्रतापगड ठेवले. 

प्रतापगड किल्ला 

शिवरायांच्या वाढत्या पराक्रमामुळे आदिलशाही पूर्णपणे हादरली. म्हणून विजापूरच्या दरबारात आदिलशाही कारभार चालणारी बडी साहेबीन हिने शिवरायांचा बंदोबस्त लावण्यासाठी सन 1659 मध्ये आपला धाडसी सेनापती अफजल खान याला शिवाजीला ठार मारण्यासाठी पाठवले. अफजल खान हा धिप्पाड शरीराचा माणूस होता. अफजल खानासमोर शिवाजी महाराज फार छोटे दिसत होते. तरीही शिवाजी आणि अफझल खान यांची भेट 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगड किल्ल्याजवळील झोपडीत झाली. 

या दोघांमध्ये एक अशी स्थिती ठेवण्यात आली होती की दोघांनीही आपल्याबरोबर एकच तलवार आणली पाहिजे.  शिवाजीला अफजलखानावर विश्वास नव्हता म्हणूनच शिवाजी महाराजांनी आपल्या कपड्याखाली चिलखत घातले त्यावर जरीचे कुडते व डोक्यास जिरेटोप घातला. त्यावर मंदील बांधला. हातामधे वाघ नखे आणि बिचवा लपवला. सोबत पट्टा घेतला. 

त्यानंतर ते अफजलखानाला भेटायला गेले. अफजलखानने शिवाजीवर हल्ला केला पण त्यांच्या अंगात चिलखत असल्यामुळे ते वाचले आणि तेव्हा शिवरायांनी त्यांच्या हातामधे असलेले वाघ नखे आणि बिचव्याने अफजलखानावर हल्ला केला. 

हा हल्ला इतका प्राणघातक होता की अफझल खान जाग्यावर गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी हा हा म्हणता धुळीस मिळवला. त्यानंतर शिवाजींनी आणि त्यांच्या मावळ्यांनी विजापूरवर हल्ला केला.

10 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या युद्धात विजापूर सैन्याचा पराभव केला. शिवाजीच्या मावळ्यांनी सतत आक्रमण करण्यास सुरवात केली आणि विजापूरच्या 3000 सैनिकांना ठार मारले आणि अफजलखानाच्या दोन मुलांना अटक केली. 

शिवाजी महाराजांनी आणि मावळ्यांनी मोठ्या संख्येने शस्त्रे, घोडे आणि इतर सैन्य वस्तू ताब्यात घेतल्या. यामुळे शिवाजीचे सैन्य अधिक बळकट झाले. औरंगजेबाच्या मुघल साम्राज्यासाठी हा सर्वात मोठा धोका होता. 

पन्हाळागड किल्ला 

अफजलखानाच्या वधामुळे विजापूरात हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळागड जिंकला. त्यामुळे आदिलशाहा भयंकर चिडला. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहाने सिद्दी जौहार या सरदाराला पाठवले. 

सिद्दी जौहार फार क्रूर होता. त्याने पन्हाळागडाला चौफेर वेढा घातला. यामुळे शिवराय गडामध्ये अडकले. पावसाळ्याचे दिवस होते. गडावरील शिदोरी संपत आली होती. सिद्दी जौहार काय गडाचा वेढा उठवेना. शिवराय खूप हुशार होते त्यांनी उक्ती लढविली आणि किल्ला देतो असे म्हणाले. हा निरोप एकताच सिद्दी जौहार खूश झाला. 

गडातून बाहेर येण्यासाठी शिवरायांनी मावळ्यांच्या दोन तुकड्या केल्या. एका तुकडीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसर्‍या तुकडीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ति बाहेर जाणार. दुसरी तुकडी जाणून बुजून शत्रूला दिसेल असी जाणार कारण यामुळे शत्रू दुसर्‍या तुकडीला पकडणार, शत्रूला वाटेल की आपण शिवाजीला पकडले. यामुळे शत्रू खूश होईल. 

शिवरायांच्या वेश धारण केलेली व्यक्ति फार धाडसी आणि चतुर होती. 

ठरल्याप्रमाणे सर्व होत होत. शत्रूने दुसरी तुकडी पकडली. तेवढ्यात शिवराय गडाच्या बाहेर पडले होते. त्यांच्या सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि काही मावळे होते. नंतर सिद्दी जौहार ला हे सर्व कळाले, तो खूप चवताळून गेला. 

सिद्दी जौहार आपली मोठी फौज घेऊन शिवरायांचा पाठलाग करत होता. तो शिवरायांच्या खूप जवळ आला होता. 

तेवढ्यात शिवराय कसे बसे घोडखिंडी जवळ आले होते. आता शिवरायांना वाटत होते की विशालगडावर आपले पोहोचणे कठीण आहे. त्यामुळे आपण शत्रूला मागे फिरून तोंड दिले पाहिजे. हे सर्व बाजीप्रभू देशपांडे यांनी ओळखले. बाजीप्रभूने शिवरायांना कळकळून सांगितले... महाराज तुम्ही थोडे सैन्य घेऊन विशालगडाकडे चला. उरलेल्या सैनिकांसोबत आम्ही खिंडीत उभे राहतो. मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. मी मेलो तर तुम्हाला दुसरा मिळेल, पण स्वराज्याला तुमची गरज आहे. 

बाजीप्रभूची स्वामीभक्ती पाहून शिवराय गहिवरले. बाजी सारखा शूर योद्धा इरेला घालणे त्यांच्या जिवावर आले होते, पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते. त्यांनी मन आवरले. शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले "आम्ही गडावर जातो" तेथे पोहोचताच तोफांचे आवाज करू, आवाज एकताच तुम्ही ताबडतोब गडावर या. 

शिवराय विशालगडाकडे निघाले. खिंडीतली वाट बिकट व नागमोडी होती. एका वेळेस फक्त तीन ते चार माणसे खिंडीतून जाऊ शकत होती. खिंडीत शत्रूची झुंज सुरू झाली. बाजीप्रभू शत्रूसोबत युद्ध करत होता. दगडधोंड्यांचा मारा चालू होता. रक्ताने लाल झाले होते सर्व तरीही हर हर महादेव म्हणून युद्ध सुरू होते. बाजीने आणि मावळ्यांनी मिळून सिद्दी जौहार च्या तीन तुकड्या नष्ट केल्या. त्यामुळे सिद्दी जौहार फार चिडला त्याने बाजीप्रभूवर हल्ला केला. बाजी त्वेषाने लढू लागला. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले, जखमा झाल्या. तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला, पण तो मागे हटला नाही. 

तेवढ्यात तोफेचा आवाज कडाडला. आता बाजीला वाटले आपले शिवराय सुखरूप गडावर पोहोचले. मी माझी कामगिरी पूर्ण केली. एवढे म्हणून बाजीने आपले प्राण सोडले. स्वराज्यासाठी बाजीप्रभू देशपांडे अमर झाले. शिवरायांना ही बातमी कळाली  त्यांना खूप मोठे दुःख झाले. ते म्हणाले बाजीप्रभू सारखे देशभक्त होते, म्हणून स्वराज्याचे पाउल पुढे पडले. बाजीच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. इतिहासात हि खिंड अमर झाली. "धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू". 

त्यानंतर मुघल औरंगजेब यांचे लक्ष उत्तर भारत पासून दक्षिण भारतात सरकले. औरंगजेबाला शिवाजीबद्दल आधीच माहित होते. औरंगजेबाने त्यांचे मामा शाइस्ता खान यांना दक्षिण भारतातील सुभेदार बनविले होते.  

शाइस्ता खान आपल्या 150,000 सैनिकांसह पुण्यात पोहोचला आणि तेथे लूटमार करण्यास सुरवात केली. शिवाजी महाराजांनी आपल्या 350 मावळ्यांसोबत त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर शाइस्ता खान आपला प्राण वाचवुन पळून गेला आणि या हल्ल्यात शाइस्ते खानने आपली 3 बोटे गमावली.

या हल्ल्यात शिवाजी महाराजांनी शाइस्ते खानचा मुलगा आणि त्याच्या 40 सैनिकांचा वध केला. शाइस्ताखानाने मुघल सैन्यासह पुण्याबाहेर आश्रय घेतला आणि औरंगजेबाने शाईस्ते खानला दक्षिण भारतातून काढून बंगालचा सुभेदार बनविला.

या विजयानंतर शिवाजी महाराजांची शक्ती बळकट झाली. पण काही काळानंतर शाईस्ताखानने आपल्या 15,000 सैनिकांसह शिवाजींच्या बर्‍याच

भागात जाळ लावून त्या जागा नष्ट केल्यात, नंतर शिवाजींनी या विधानाचा बदला घेण्यासाठी मुघलांच्या भागात लूटमार करण्यास सुरवात केली. 

सन 1670 मध्ये, शिवाजी महाराजांनी सूरत शहरातून तब्बल 132 लाखांची मालमत्ता ताब्यात घेतली आणि परत शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा सूरत येथे मुघल सैन्याचा पराभव केला. शिवाजी महाराजांना पराभूत करण्यासाठी औरंगजेबाने बरेच प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाला. 

शेवटी बर्‍याच युद्धानंतर स्वराज्य उभे राहिले. 

पण या स्वराज्यासाठी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर व मुरारबाजी या शूरवीरांनी प्राणाचे मोल दिले. 

शेकडो वर्षांनंतर सर्व धर्मांना समानतेने वागणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा, प्रजेसाठी लढणारा राजा या महाराष्ट्रात निर्माण झाला. 

शिवरायांचा राज्याभिषेक

सन 1674 मध्ये शिवाजी महाराजांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यानंतर 4 ऑक्टोबर 1674 रोजी महाराष्ट्रातील रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या कार्यक्रमात हिंदु स्वराज स्थापनेची घोषणा करण्यात आली.

सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदअश्रू वाहू लागले. शिवरायांनी केलेल्या तीस वर्षांच्या कष्टाचे चीज झाले. शिवरायांच्या माऊलीने पाहिलेले स्वप्न आज साकार झाले. महाराष्ट्राती प्रत्येक भागात शिवरायांचा जयजयकार झाला. शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली. 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांच्या आणि सहकर्‍यांच्या साथीने मराठा साम्राज्य निर्माण केले आणि ते पहिले छत्रपती झाले. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून प्रजेला भयमुक्त केले.

अखेर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरुषाचा मृत्यू 3 एप्रिल 1680 मध्ये रायगड येथे झाला आणि ते अजरामर झाले. नंतर महाराजांचा मुलगा संभाजी राजेंनी राज्य ताब्यात घेतले आणि मोगलांवर प्रभावीपणे राज्य केले.

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा कोणत्याही धर्माशी नव्हता त्यांचा लढा हा अन्यायविरूद्ध होता. छत्रपती प्रजेच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटले म्हणून आपण त्यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत. भारत युगानुयुगे त्यांच्या बलिदानासाठी ऋणी राहील.

⛳"जय जिजाऊ - जय शिवराय"⛳

मला आशा आहे की, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती | Shivaji Maharaj Information In Marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना हि पोस्ट शेअर करायला विसरू नका. ☺️

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻

➡️महात्मा गांधी निबंध मराठी

➡️डॉ. ए पी जे अब्दुल कलाम माहिती मराठी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने