संगणक निबंध मराठी | Computer Essay In Marathi


Computer Essay In Marathi मित्रांनो आजच्या काळात संगणक हा शब्द कोणाला माहित नाही? संगणक हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक मोठा शोध आहे. आजच्या डिजिटल काळात संगणक तंत्रज्ञानामुळे आपले मानवी जीवन खूप सोपे झाले आहे. संगणक हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे त्यामुळे आजच्या आधुनिक युगला संगणकाचे युग देखील म्हटले जात आहे. संगणकामुळे आपल्या सर्वांचे जीवन बदलले आहे. आजच्या काळात ऑनलाईन कार्यासाठी संगणक फार महत्त्वाचे आहे. आपल्या मनुष्यासाठी हे संगणक सर्वात मोठे सहाय्यक बनले आहे. म्हणून आजच्या पोस्टमधे आपण संगणक निबंध मराठी | Computer Essay In Marathi या विषयाबद्दल माहिती जाणून घेऊया...

संगणक-निबंध-मराठी-Computer-Essay-In-Marathi

संगणक निबंध मराठी | Computer Essay In Marathi

संगणक हे जगातील सर्वात मोठे आणि क्रांती घडवणारे शक्तिशाली उपकरण आहे. तसेच एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे आणि संपूर्ण मानवी जीवनासाठी विज्ञानाची एक अनोखी आणि मार्गदर्शक भेट आहे. प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा वापर होतो. आजच्या काळात असे कोणतेच क्षेत्र नाही की, जेथे संगणक उपलब्ध नाही. कमी वेळेत जास्तीत जास्त कार्य करणे हे संगणकामुळे शक्य झाले आहे. संगणकाद्वारे आपण काहीही सहजपणे शिकू शकतो आणि आपली कौशल्ये सुधारू शकतो.

निबंधामध्ये समाविष्ट केलेले मुद्दे

संगणक म्हणजे काय?

संगणक एक इलेक्‍ट्रॉनिक साधन आहे. संगणकाला इंग्लिश मध्ये कॉम्प्युटर (Computer) असे म्हणतात.

कॉम्प्युटरचा फूल फॉर्म आहे - Common Operating Machine Purposely Used for Technological and Educational Research.

संगणक म्हणजे आकडे मोड किंवा गणना करणे. जेव्हा सुरुवातीला संगणक विकसित झाले तेव्हा प्रामुख्याने याचा वापर आकडे मोड किंवा गणना करण्यासाठी केला जात होता. पण मित्रांनो तेव्हापासुन ते आत्तापर्यंत या संगणकामध्ये बरेच बदल केले गेले आहेत. आजचे संगणक प्रत्येक क्षेत्रात कार्य करत आहे आणि मोठ्या प्रमाणात याचा वापर होत आहे.

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर संगणक एका प्रकारचे मशीन आहे, ज्याद्वारे माहिती तयार करणे, माहितीची साठवण करणे आणि माहिती पाठवणे हे आहे.

संगणक आपण दिलेल्या सूचना पूर्ण करते. सूचना पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने तीन प्रकार आहेत ज्याद्वारे संगणक कार्य करते.
1. डेटा घेणे.
2. दुसर्‍या डेटावर प्रक्रिया करणे.
3. सूचना नुसार आपल्याला आवश्यक प्रक्रिया केलेला डेटा दाखविणे.

संगणकाचा शोध कोणी लावला?

चार्ल्स बैबेज (Charles Babbege) ने पहिला यांत्रिक संगणक तयार केला जो आजच्या संगणकांपेक्षा खूप वेगळा होता.

संगणकाचे उपयोग - महत्त्व - वापर

संगणकाने आपल्या बऱ्याच अडचणी सुलभ केल्या आहेत ज्यामुळे आपल्याला प्रत्येक ऑनलाईन कार्य अतिशय सोपे वाटते.

या युगात संगणकाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात योगदान दिले आहे. संगणक हा आतापर्यंतचा सर्वोत्तम शोध आहे ज्याने मानवी जीवनाचे स्वरूप बदलले आहे.

देशांच्या विकासात संगणकांची मोठी भूमिका आहे. आजच्या काळात संगणक सर्वच क्षेत्रात वापरला जातो. जसे की, शैक्षणिक क्षेत्रात, सरकारी व खासगी कार्यालये, रुग्णालये, आरोग्य, बँकांमध्ये, हॉटेल्स, लहान-मोठ्या दुकानांमध्ये, उद्योग, व्यवसाय, मॉल्स, वैयक्तिक वापरासाठी इत्यादी अनेक ठिकाणी संगणकांना खूप महत्त्व आहे.

आपल्याला जगभरातील कोणतीही माहिती हवी असल्यास आपण ती माहिती काही सेकंदात संगणकावर इंटरनेट द्वारा घेऊ शकतो. विचार करा इंटरनेट नसेल तर काय होईल.

शिक्षण क्षेत्र : आज आधुनिक शिक्षणात संगणकाचे मोठे योगदान आहे. आजच्या काळात प्रत्येक शैक्षणिक संस्थेत संगणक वापरला जातो. आजकाल विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून संगणकाद्वारे शिक्षण दिले जाते. अगदी लहान मुलांनादेखील संगणकावरूनच शिकवले जाते. हल्ली विद्यार्थी संगणकावरून बरीच माहिती घेतात.

आजच्या काळात संगणक आणि इंटरनेटचा वापर करून विद्यार्थी संगणकावरुन शिक्षण घेतो. बरेच असे यूट्यूब वर चॅनल्स आहेत जेथे अभ्यासाबद्दल शिकवले जाते. ज्यात संगणकाचे मोठे योगदान आहे. आपण परीक्षा देण्यासाठी जातानाही आपल्याला संगणकावरच परीक्षा द्यावी लागते.

तसे पाहिले तर हे सर्व केवळ संगणकांच्या उपस्थितीमुळे शक्य झाले आहे. आज विद्यार्थी ऑनलाईन विविध प्रकारचे कोर्स करतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संशोधन करण्यासाठी संगणक उपयुक्त आहे. 

व्यवसाय क्षेत्र : संगणकाने व्यवसाय क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि संगणकामुळेच व्यवसाय क्षेत्राला चालना मिळाली आहे.

संगणकाच्या माध्यमातून लोकांना खूप चांगली संधी मिळाली आहे. संगणक आज कोट्यावधी लोकांच्या व्यवसायाचे व्यासपीठ बनले आहे. संगणकाच्या विस्तारामुळे होणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण संगणकाचा वापर करून घरी बसून ऑनलाईन अनेक प्रकारची कामे करुन पैसे कमवू शकतो. जसे की आपण आपले स्वत: चे उत्पादन ऑनलाइन वेबसाइटवर विकू शकतो किंवा आपण त्याचा प्रचार करू शकतो, YouTube वर व्हिडिओ बनवू शकतो, आपली स्वतःची वेबसाइट तयार करून कमवू शकतो.

संगणकाद्वारे आपल्याला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्यास त्या व्यवसायाची जगभरात जाहिरात करुन आपण आपल्या व्यवसायाला चालना देऊ शकतो. आपली स्वतःची स्वतंत्र व्यवसाय वेबसाइट देखील तयार करू शकतो.

बँकिंग क्षेत्र : आज बँकिंग क्षेत्रात संगणकाचा वापर सुरू झाल्यापासून बँकिंग क्षेत्रात चांगला परिणाम झाला आहे. आजचे युग डिजिटल जगाचे आणि सोशल मीडियाचे आहे. त्यामुळे आज आपण संगणकाच्या च्या मदतीने सर्व ऑनलाईन सेवा वापरू शकतो. जसे की, पैसे पाठवणे किंवा घेणे, मोबाइल रिचार्ज, मोबाइल बिल, गॅस बिल, वीज बिल, डिश रिचार्ज, क्रेडिट कार्ड बिल, केबल टीव्ही बिल, रेल्वे तिकीट बुक, विमानाचे टिकिट बूक, ऑनलाईन शॉपिंग, अश्या बऱ्याच प्रकारचे पेमेंट करु शकतो.

संगणकावर ऑनलाईन बँकिंग सुविधा असल्यामुळे  बँकेचे व्यवहार करण्यासाठी बॅंकेच्या बाहेर दूरवर रांगेत उभे राहावे लागत नाही.

वैद्यकीय क्षेत्र : प्रत्येक रुग्णालयात संगणक बसवले जात आहेत. संगणकाच्या आगमनाने हॉस्पिटलचे काम करण्याची सुलभता आणि वेग वाढला आहे. आज संगणक कोणत्याही प्रकारच्या ऑपरेशनसाठी एक वरदान असल्याचे सिद्ध झाले आहे. बाहेरील संगणकाद्वारे आपण शरीराच्या आत कोणत्याही प्रकारच्या हालचाली पाहू शकतो.

करमणूक क्षेत्र : या युगात संगणक मनोरंजनाचे साधन बनले आहे. करमणुकीसाठी आपण संगणकावर आपल्या आवडीचे कार्यक्रम, गाणी, चित्रपट, गेम्स, बातम्या यासारख्या बर्‍याच गोष्टी पाहू शकतो.

संगणकामुळे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात संवाद साधण्यासाठी संगणकाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. संगणक आणि इंटरनेटद्वारे मीटिंग घेणे, ई-मेल पाठवणे, मेसेज पाठवणे, स्काईपद्वारे व्हिडीओ कॉलिंग, फेसबुक - व्हॉट्सअॅप वर चॅटिंगद्वारे गप्पा मारणे या गोष्टी शक्य झाल्या आहेत.

आजकाल मोठ्या कार्यालयांमध्येही संगणक बसविण्यात आले आहेत. जिथे आधी सर्व रेकॉर्ड जुन्या फाईल्समध्ये ठेवल्या गेल्या. आज त्या फाईल्सची आता आवश्यकता नाही.

आजकालचे युग संगणकाविना काहीच करू शकत नाही, हे आपण निर्धोकपणे म्हणू शकतो.  संगणकाच्या कायम विकसित होत असलेल्या क्षमता पाहता असे दिसते की भविष्यात हे मानवी जीवनाशी अधिक प्रकारे जोडले जाईल.

आजच्या काळात, संगणक खरोखर एक शक्तिशाली उपकरण आहे आणि यामुळे आपल्याला बरेच काही शिकायला मिळते.

मला आशा आहे की, मित्रांनो तुम्हाला संगणक निबंध मराठी | Computer Essay In Marathi   हा मराठी निबंध आवडला असेल. तुम्हाला हा निबंध कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा निबंध तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.  🙏🏻

वाचा
➡️विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध
➡️मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी
➡️इंटरनेट शाप की वरदान निबंध मराठी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने