सोशल मीडिया वर निबंध | Social Media Essay In Marathi


Social Media Essay In Marathi मित्रांनो आजचे युग हे पूर्णपणे सोशल मीडियाचे झाले आहे. सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढत चालला आहे कारण सोशल मीडिया हे संप्रेषणाचे, एकमेकांना जोडण्याचे सर्वात मोठे आणि लोकप्रिय माध्यम बनले आहे. यामुळे कोट्यावधी वापरकर्ते एकत्र आले आहेत. आपल्या मानवाच्या दैनंदिन जिवनाची सोशल मीडिया ही एक गरज बनला आहे. म्हणून आजच्या पोस्टमधे आपण सोशल मीडिया वर निबंध | Social Media Essay In Marathi या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत...

सोशल-मीडिया-वर-निबंध-Social-Media-Essay-In-Marathi


सोशल मीडिया मुळे आपल्याला जगभरातील कोणत्याही कल्पना, बातम्या, माहिती फार लवकर सक्षम करण्यास मदत होते. बर्‍याच वेबसाईट आणि अॅप्स यांच्यामुळे सोशल मीडियाचा उगम झाला आहे. यामध्ये इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, यूट्यूब, व्हॉट्सअ‍ॅप अश्या अनेक प्लॅटफॉर्म आहेत.

सध्याच्या काळात सोशल मीडिया हे संवादाचे सर्वात मोठे माध्यम म्हणून उदयास आले आहे आणि त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज कित्येक अब्ज लोक फेसबुकवर लॉग इन करतात. ट्विटरवर दर सेकंदाला ट्वीट केले जातात आणि बरीच छायाचित्रे इंस्टाग्रामवर पोस्ट केली जातात.

सोशल मीडिया वर निबंध | Social Media Essay In Marathi

सोशल मीडिया आता जगातील सर्वात वेगवान संप्रेषणाचे माध्यम बनले आहे. या माध्यमातून देशभर आणि परदेशात कोणतीही बातमी एका क्षणात पसरवता येते. या काळात आपण सोशल मीडिया शिवाय एक दिवसही घालवू शकत नाही. परंतू आपण हे देखील पाहतो की सोशल मीडियाच्या अनियंत्रित वापरामुळे मानवी अस्तित्वाला प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हि पोस्ट आपल्याला सोशल मीडिया चे फायदे व तोटे Social Media Advantages And Disadvantages In Marathi या विषयासाठी देखील उपयुक्त ठरेल.

वाचा ➡️सोशल मीडिया म्हणजे काय?

आज आपल्या जीवनात सोशल मीडिया मोठी भूमिका बजावत आहे. पण नाण्याच्या दोन बाजू प्रमाणे सोशल मीडियाच्या देखील दोन बाजू आहेत. एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक. या दोन प्रकारच्या माहितीचा परिणाम आपल्या समजावर होतो. सोशल मीडियाचा उपयोग चांगल्या कामांसाठी केला जातो आणि चुकीच्या गोष्टी करण्यासाठी पण केला जात आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

सोशल मीडिया चे फायदे - उपयोग - वरदान

आपल्याला जगभरातील कोणतीही माहिती हवी असल्यास आपण ती माहिती काही सेकंदात सोशल मीडियाद्वारे घेऊ शकतो तसेच आपले ज्ञान इतरांनाही सांगू शकतो. याद्वारे कोणतीही महत्वाची बातमी एका क्षणात कोट्यवधी लोकांना पाठविली जाऊ शकते.

समाजामधे जागरूकता निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात संपर्क, संवाद साधू शकतो, आपण आपल्या मित्रांशी नेहमी संपर्कात राहू शकतो, देशात आणि परदेशात सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन मित्र बनवू शकतो.

सोशल मीडियामुळे व्यवसाय क्षेत्राला चालना मिळाली आहे. आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी सोशल मीडिया आपल्यासाठी वरदान ठरले आहे. आज सोशल मीडिया लाखों लोकांच्या व्यवसायाचे व्यासपीठ बनले आहे. एका क्लिकमध्ये आपण कोट्यावधी ग्राहकांपर्यंत या सोशल मीडियाद्वारे पोहचू शकतो.

सोशल मीडिया द्वारे रोजगाराच्या अनेक ऑनलाईन संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपण सोशल मीडियाद्वारे घरी बसून पैसे कमवू शकतो.

आपल्याकडे अशी काही कौशल्ये आहेत जी आपण आपल्या नावाने जगाला दाखवू इच्छित आहात. तर आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून हे सहजपणे करु शकतो. आजकाल बरेच लोक आपली कौशल्ये दाखवून प्रसिद्ध झाले आहेत.

सोशल मीडिया हे शिक्षणासाठी एक अनमोल वरदान बनले आहे. सोशल मीडियाद्वारे सर्व शिक्षण संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे. शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडिया लोकप्रिय आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. शिक्षणासंबंधीत प्रश्न, उत्तरे, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडिया उत्तम असे व्यासपीठ बनले आहे. या आधुनिक युगात शिक्षण व्यवस्था खूप चांगली विकसित झाली आहे.

या युगात सोशल मीडिया मनोरंजनाचे साधन बनले आहे. करमणुकीसाठी आपण सोशल मीडिया साइटवर आपल्या आवडीचे कार्यक्रम, गाणी, चित्रपट, बातम्या यासारख्या बर्‍याच गोष्टी पाहू शकतो.

सोशल मीडिया चे नुकसान - तोटे - शाप

सोशल मीडियाचा जास्त वापर केल्याने आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. सोशल मीडियाचा जास्त वेळ उपयोग केल्याने आपल्याला सुस्तपणा, डोळ्यांना जळजळ आणि खाज सुटणे, दृष्टी कमी होणे यांसारखे आजार उद्भवू शकतात.

सोशल मीडियाच्या अत्यधिक वापरामुळे आपण आपल्या कुटुंब आणि समाजापासून दूर होत चाललो आहे.

काही गुन्हेगारी स्वभावाचे लोक अश्लील संदेश, फोटो पाठवून, गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देऊन आणि नको असलेली माहिती पाठवून सोशल मीडियाचा गैरवापर करतात. ज्यामुळे समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे.

जर आपण काळजीपूर्वक सोशल मीडियाचा वापर न केल्यास आपला वैयक्तिक डेटा चोरी (हॅक) होण्याचा धोका असतो, ज्यामुळे आपले आर्थिक नुकसान होऊ शकते. सायबर हल्ल्याचा धोका सोशल मीडियावर नेहमीच असतो.

आजच्या काळात सोशल मीडिया खरोखर एक शक्तिशाली माध्यम आहे आणि यामुळे आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. आपण सोशल मीडियाचा योग्य प्रकारे आणि आवश्यक उपयोग केल्यास ते आपल्यासाठी नक्कीच वरदान ठरू शकते.

पण चुकीच्या वापरामुळे सोशल मीडियाला दोषी ठरवले जाऊ शकत नाही. कारण सोशल मीडियाच्या दुरुपयोगासाठी मनुष्य स्वतः जबाबदार आहे. आपण सोशल मीडियाचा योग्य वापर करतो की गैरवापर करतो हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे

आपण एक जबाबदार नागरिक असाल तर आपण सोशल मीडियाचा वापर योग्य व गरजेनुसार केला पाहिजे.

मला आशा आहे की, मित्रांनो तुम्हाला सोशल मीडिया वर निबंध | Social Media Essay In Marathi  हा मराठी निबंध आवडला असेल. तुम्हाला हा निबंध कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा निबंध तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.  🙏🏻

वाचा

➡️माहिती तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे

➡️डिजिटल इंडिया मराठी निबंध

➡️विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध 

➡️मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध

➡️इंटरनेट शाप की वरदान मराठी निबंध


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने