History Of Computer In Marathi आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाची भूमिका फार मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. प्रत्येक क्षेत्रात संगणकाचे अनमोल परिणाम होत आहेत. संगणक आपल्या जिवानाचा महत्त्वचा भाग बनला आहे. संगणकाशिवाय आपण आजच्या जगाची कल्पनाही करू शकत नाही. म्हणून आजच्या पोस्टमधे आपण संगणकाचा इतिहास History Of Computer In Marathi याबद्दल जाणून घेणार आहोत...
सर्वप्रथम संगणकाचा शोध हा गणिताची गणना करण्यासाठी लावला होता.
आज आपण जे संगणक वापरत आहोत, त्यामधे ईमेल पासून ते इंटरनेटच्या कार्यांपर्यंत सर्वच कामे सहज करता येतात.
सुरुवातीचे संगणक हे आकाराने खूप मोठे होते. त्या संगणकाला ऑपरेट करणे फार अवघड होते आणि ते संगणक फक्त काही मूलभूत गणना करू शकत होते. पण आजचे संगणक हे आकाराने छोटे आहेत आणि बरेच शक्तिशाली आहेत. या संगणकांना ऑपरेट करणे पण सोपे झाले आहे.
संगणकाचा इतिहास | History Of Computer In Marathi
संगणकाचा इतिहास हा सुमारे 300 वर्ष जुना आहे. पूर्वीच्या काळात जे मानव होते ते मानव मोजणीसाठी लाकूड, हाताचे बोटे आणि दगड वापरत होते.
संगणक हा शब्द संगणक तयार होण्याच्या फार पूर्वीपासून वापरला जात होता कारण त्या काळात ज्या व्यक्तीला गणिताची गणना करता येत होती त्या व्यक्तीसाठी संगणक हा शब्द वापरला जात होता.
नंतर याच महान गणित व्यक्तींनी गणिताची गणना करण्यासाठी अनेक प्रकारच्या संख्या प्रणाली निर्माण केल्या. या प्रणालींमधे बॅबोलेनियन क्रमांक प्रणाली, रोमन अंक प्रणाली, भारतीय क्रमांक प्रणालींचा समावेश होता. या सर्व प्रणालींपैकी भारतीय क्रमांक प्रणाली जगभरात स्विकारली गेली. नंतर ही प्रणाली आधुनिक दशांश क्रमांक प्रणालीचा आधार बनली. या प्रणालीला Base - 10 नंबर सिस्टम असे म्हटले गेले. यामध्ये 0,1,2,3,4,5,6,7,8,9 असे 10 अंक होते.
यानंतर बायनरी नंबर सिस्टम प्रणालीचा शोध लागला ज्याला Base - 2 नंबर सिस्टम असे म्हटले गेले. यामध्ये 0 आणि 1 या दोन भिन्न संख्या होत्या.
पूर्वीच्या संगणकापासून ते आताच्या आधुनिक संगणकापर्यंत संगणक तंत्रज्ञानाने बरीच प्रगती केली. चला तर मग पूर्वीच्या संगणकीय मशीन बद्दल जाणून घेऊया ज्यांनी संगणकाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
अबॅकस - Abacus
संगणकाच्या विकासाचा हा पहिला टप्पा आहे. संगणकाच्या इतिहासाची सुरुवात अबॅकसच्या शोधापासून झाली. अबॅकस हे जगातील पहिले गणना करण्याचे यंत्र होते. अबॅकस हा शब्द ग्रीक शब्दापासून बनवलेला होता, ज्याचा अर्थ कॅल्क्युलेशन बोर्ड असा होतो. या संगणकाचा सर्वाधिक वापर चीन, जापान आणि रशियामध्ये केला जात होता.
अबॅकस हे एक यांत्रिक संगणक होते आणि या संगणकाचा वापर गणिताच्या गणनेमध्ये केला जात असे. या अबॅकसच्या मदतीने सहज मोठ्या संख्येची गणनी करता येणे शक्य झाले होते. या यंत्राच्या शोधामुळे संगणकाचा विकास सुरू झाला.
नेपियर्स हाडे - Napier’s Bones
नेपियर्स हाडे हे उपकरण स्कॉटिश गणित तज्ञ जॉन नेपियर यांनी सन 1616 मध्ये विकसित केले होते. जॉन नेपियर हे त्यांच्या लॉगरिदमच्या शोधासाठी प्रसिद्ध होते.
जॉन नेपियर यांच्या नावावरून या यंत्राचे नाव नेपियर्स हाडे ठेवण्यात आले. हे असे यांत्रिक उपकरण होते, ज्याचा मदतीने सहज वेगाने गुणाकार, भागाकार केला जाऊ शकत होता.
हे यंत्र आयताकृती चंचाने बनलेले होते, ज्यामधे अकरा रोड्सचा सेट होता आणि त्या रोड्स हस्तिदंतापासून बनविलेल्या होत्या.
संगणकाच्या विकासात जॉन नेपियर यांची प्रभावी भूमिका होती.
स्लाइड नियम - Slide Rule
William oughtred ने सन 1622 मध्ये स्लाइड नियम हे मशीन बनविले होते. हे स्लाइड नियम मशीन नेपियरच्या लॉगरिदमवर आधारित होते. हे मशीन अनेक ऑपरेशन्स अगदी सहजपणे करू शकत होती. जसे की, गुणाकार, भागाकार, त्रिकोणमिती आणि मूळ. पण या स्लाइड नियममध्ये जोडणी आणि वजाबाकी केली जाऊ शकत नव्हती. हे संगणक 16 व्या शतकात मोठ्या प्रमाणात संपूर्ण युरोपमध्ये वापरले गेले.
पास्कलाईन - Pascaline
त्या काळातील प्रसिद्ध फ्रेंच गणितज्ञ ब्लाइस पास्कलने सन 1642 मध्ये पास्कलाईन हे संगणक तयार केले होते. या पास्कलाईन संगणकामुळे कर अकाऊंटची गणना करता येत होती.
ब्लाइस पास्कल यांनी अवघ्या वयाच्या 19 व्या वर्षी हे मशीन तयार केले. हे मशीन लाकडी बॉक्स ने बनलेले होते ज्यावर गियर आणि चाकांची श्रेणी होती. जेव्हा एक चाक फिरवले जायचे तेव्हा त्या चाकास जोडलेले दुसरे चाक पण फिरत असे.
या मशीन च्या मदतीने केवळ जोडणी आणि वजाबाकी करता येऊ शकत होती. याच कारणास्तव या मशिनचे नाव Adding Machine ठेवले गेले.
स्टेप्पेड रेकनर - Stepped Reckoner
गॉटफ्राइड विल्हेल्म लिबनिझ यांनी सन 1672 मध्ये ब्लाइस पास्कल यांनी तयार केलेल्या मशिनमध्ये आणखी काही सुधारणा करून स्टेप्पेड रेकनर हे मशिन तयार केले.
गॉटफ्राइड विल्हेल्म लिबनिझ यांनी तयार केलेल्या स्टेप्पेड रेकनर मशिन द्वारा गुणाकार, भागाकार करता येऊ शकत होता.
जैकर्ड लूम - Jacquard loom
जोसेफ मेरी जॅकवर्ड यांनी सन 1801 मध्ये जैकर्ड लूम हे तांत्रिक मशिन विकसित केले.
या मशीनमध्ये इनपुट डिव्हाइस च्या रूपामध्ये पंच कार्डचा उपयोग केला जात होता.
अरिथोमीटर - Arithmometer
थॉमस डी कोलमार यांनी सन 1820 मध्ये अरिथोमीटर हे तांत्रिक मशिन तयार केले. पहिले उपयुक्त, विश्वसनीय आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी गणना करणारे यंत्र होते. अरिथोमीटर हे पहिले मशीन होते ज्याला मोठ्या प्रमाणात तयार केले जात होते. या यंत्राच्या पाहिल्या मशिन ह्या टेस्ट व डेमोसाठी बनविल्या जात होत्या.
डिफरेन्स इंजन - Difference Engine
ब्रिटिश गणितज्ञ चार्ल्स बॅबेज ("फादर ऑफ मॉडर्न कॉम्प्यूटर") यांनी सन 1642 मध्ये प्रथम डिफरेन्स इंजन तयार केले होते. हे एक मॅकेनिकल इंजन होते जे भांप (स्टीम) ने चालत होते.
चार्ल्स बॅबेजला दररोज सांख्यिकीय गणिते करावी लागत होती, हि गणिते एखाद्या व्यक्ति द्वारा केल्याने चूक होण्याची संभाव्यता होती. म्हणून चार्ल्स बॅबेजने हे स्वयंचलित डिफरेन्स इंजन तयार केले जेणेकरून गणनामध्ये कोणतीही चूक होणार नाही. परंतु पैशाअभावी चार्ल्स बॅबेजचे हे डिफरेन्स इंजिन पूर्ण होऊ शकले नाही.
टॅब्युलेटिंग मशीन - Tabulating machine
अमेरिकन वैज्ञानिक हरमन हॉलरिथ यांनी सन 1890 मध्ये टॅब्युलेटिंग हे मशिन तयार केले होते, हे मशिन विजेवर चालत होते.
टॅब्युलेटिंग हे एक इलेक्ट्रो-मैकेनिकल मशीन होते. या मशिनचा उपयोग अमेरिकेच्या जनगणनेसाठी केला होता.
नंतर हरमन हॉलरिथ यांनी हॉलरिथची टेबलिंग मशीन कंपनी सुरू केली जी जी 1924 मध्ये आंतरराष्ट्रीय बिझनेस मशीन (IBM) बनली.
Howard mark 1
Dr.Howard Aiken आणि IIBM चे चार इंजियर यांनी सन 1937-1944 मध्ये mark 1 हे मशिन तयार केले होते, या मशिनला ऑटोमॅटिक सीक्वेन्स कंट्रोल्ड कॅल्क्युलेटर या नावाने ओळखले जाते.
mark 1 हे जगातील पहिले इलेक्ट्रो-मेकॅनिकल कॅल्क्युलेटर मशिन होते जे पंच कार्डवर आधारित होते. या मशिनचा आकार 50 फूट लांब आणि 8 फूट उंच होता.
Z1
कोनराड ज़ूस यांनी जर्मनीमध्ये सन 1936-1938 मध्ये Z1 हे तांत्रिक मशिन तयार केले. हे पहिले मशीन होते जे प्रोग्राम करण्यायोग्य होते, म्हणजे त्यात प्रोग्राम समाविष्ट केले जाऊ शकत होते. या Z1 मशिनमध्ये सर्व इनपुट आणि आउटपुट पंच टेपद्वारे दिले जात होते.
अटनासॉफ बेरी - Atanasoff Berry
प्रोफेसर जॉन अटनासॉफ आणि त्यांचा विद्यार्थी क्लिफर्ड बेरी या दोघांनी सन 1939-1942 मध्ये अटनासॉफ बेरी हे तांत्रिक मशिन तयार केले. हे पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॉम्प्यूटिंग संगणक डिव्हाइस होते.
ENIAC
जॉन मौचली आणि जे. प्रेस्पर एकर्ट या दोघांनी Moore school of engineering U.S.A. या ठिकाणी सन 1946 मध्ये हे ENIAC संगणक तयार केले.
ENIAC चा फूल फॉर्म आहे - Electronic Numerical Integrator and Computer. ENIAC हा पहिला इलेक्ट्रॉनिक जनरल पर्पज संगणक होता. या संगणकात 18000 व्हॅक्यूम ट्यूब वापरल्या गेल्या होत्या आणि या संगणकाचा आकार 20*40 चौरस फूट होता.
या संगणकाचा प्रथम वापर अमेरिकन सैन्याने जटिल गणना करण्यासाठी केला होता. या संगणकात हजारो इलेक्ट्रॉनिक घटकांचा उपयोग केला होता.
EDVAC
EDVAC या संगणकाला वॉन न्यूमेन या वैज्ञानिकाने सन 1949 मध्ये डिझाइन केले होते. हे इलेक्ट्रॉनिक डिस्क्रिप्ट व्हेरिएबल स्वयंचलित संगणक होते.
हा पहिला संगणक होता ज्यात त्याचा डेटा प्रोग्रामसहित संग्रहित केला जाऊ शकत होता. या संगणकात बायनरी भाषेची संकल्पना प्रथमच वापरण्यात आली होती.
वॉन न्यूमन यांनी आधुनिक संगणकांच्या विकासात सर्वाधिक योगदान दिले.
EDSAC
EDSAC संगणक ब्रिटीश वैज्ञानिक सर मौरिस विल्किस आणि जे. प्रेस्पर एकर्ट या दोघांनी मिळून सन 1949 मध्ये तयार केले होते. हे जगातील पहिले व्यावहारिक सामान्य उद्देश संग्रहित प्रोग्राम इलेक्ट्रॉनिक संगणक होते.
UNIVAC
जॉन मौचली आणि जे. प्रेस्पर एकर्ट या दोघांनी मिळून सन 1951 मध्ये हे UNIVAC (Universal Automatic Computer) संगणक तयार केले. हा पहिला व्यावसायिक युनिव्हर्सल ऑटोमॅटिक संगणक होता जो बाजारात विकला गेला.
सन 1953 मध्ये जगातील पहिली संगणक भाषा कोबोल. या कोबोल भाषेला ग्रेस हॉपर या वैज्ञानिकाने विकसित केले. नंतर तीन वर्षांनी 1956 मध्ये आणखी एक प्रोग्रामिंग भाषा फोरट्रान विकसित केली. त्यानंतर आधुनिक संगणकाच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण योग आला जेव्हा 1959 मध्ये इंटिग्रेटेड सर्किट (आयसी चिप) चा शोध लागला. हा शोध जैक किलबी आणि रोबर्ट नॉएस यांनी लावला.
या इंटिग्रेटेड सर्किट मध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक घटक, कैपिसिटर आणि ट्रांजिस्टर यांना एकत्र आपापसात जोडले होते. ज्यामुळे संगणक पूर्वीपेक्षा आकाराने खूपच लहान आणि अधिक शक्तिशाली झाला. इंटिग्रेटेड सर्किटच्या विकासामुळे मोबाईल फोन्स, लॅपटॉप सारख्या बर्याच इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीचा शोध लागला.
MS-Dos
सन 1980 मध्ये MS-Dos (Microsoft Disk Operating System) विकसित केले. ज्याचा उपयोग IBM च्या पहिल्या वैयक्तिक IBM Model 5150 या संगणकाबरोबर केला गेला.
Osborne
Osborne या संगणकाला ओसबोर्न कंप्यूटर कॉर्पोरेशनने सन 1981 मध्ये रिलीज केले होते.
Osborne हा पहिला पोर्टेबल संगणक होता.
त्यानंतर पुढे देखील, संगणक तंत्रज्ञानामध्ये बरेच बदल होत गेले, ज्यामुळे हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आज इतके उपयुक्त झाले. आपण त्याच्या उपयुक्ततेचा अंदाज लावू शकता की आज संगणक जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात विविध कामांसाठी वापरले जात आहे.
मला आशा आहे की, मित्रांनो तुम्हाला संगणकाचा इतिहास | History Of Computer In Marathi हा मराठी लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा लेख तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻
वाचा
Khup chan and important information aahe
उत्तर द्याहटवाkhup upayukt mahiti aahe. ashich mahiti amchyapryant pochvat rahal ashi apeksha thevato.
उत्तर द्याहटवाdhanyawad!
Marathi Motivation
Very very important information sir thanks for sharing such a great informationnice information
उत्तर द्याहटवाVery very important information sir thanks for sharing such a great informationnice information
उत्तर द्याहटवा