संगणकाचे फायदे व तोटे | Advantages And Disadvantages Of Computer In Marathi


आजचा आधुनिक काळ हा पूर्णपणे डिजिटल उपकरणांचा आहे. आजच्या विकास आणि तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात संगणक हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. संगणक हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे उत्पादन आहे. आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाद्वारे कार्य केले जात आहे.

संगणकाचे-फायदे-व-तोटे-Advantages-And-Disadvantages-Of-Computer-In-Marathi

संगणकामुळे आपल्या मानवी जीवनाची रोजची कामे सुलभ झाली आहेत. संगणकाशिवाय आपण आजच्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. जर आपण एखाद्याला संगणकाच्या फायद्यांविषयी विचारले तर तो आपल्याला बरेच फायदे सांगू शकेल, परंतु संगणकाच्या नुकसानाबद्दल मोजकेच लोक सांगू शकतील. म्हणून आजच्या पोस्टमधे आपण संगणकाचे फायदे व तोटे | Advantages And Disadvantages Of Computer In Marathi याबद्दल जाणून घेणार आहोत...

संगणकाचे फायदे व तोटे | Advantages And Disadvantages Of Computer In Marathi

संगणकाचे फायदे

या युगात संगणकाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात योगदान दिले आहे त्यामुळे आपले जीवन खूप सुलभ झाले आहे. संगणक हा आतापर्यंतचा सर्वोत्तम शोध आहे ज्याने मानवी जीवनाचे स्वरूप बदलले आहे.

आज आपल्या देशाचा जो काही विकास झाला आहे तो संगणकामुळे झाला आहे. आजच्या काळात असे कोणतेच क्षेत्र नाही की, जेथे संगणक उपलब्ध नाही.

संगणकाचा वेग हा सर्वात मोठा फायदा मानला जातो कारण तो अविश्वसनीय वेगाने सर्व कार्ये अचूकतेसह करतो.

पूर्वी कठीण वाटणारी कामे आज संगणकाच्या वापरामुळे सोपी झाली आहेत.

आपल्याला जगभरातील कोणतीही माहिती हवी असल्यास आपण ती माहिती काही सेकंदात संगणकावर इंटरनेट द्वारा घेऊ शकतो. संगणकामुळे लोक जगभरातील विविध समस्यांविषयी जागरूक होत आहेत.

संगणक हे शिक्षणासाठी एक अनमोल वरदान बनले आहे. संगणकाद्वारे सर्व शिक्षण संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे. या आधुनिक युगात शिक्षण व्यवस्था खूप चांगली विकसित झाली आहे.

आजच्या काळात संगणक आणि इंटरनेटचा वापर करून विद्यार्थी संगणकावरून शिक्षण घेतो. बरेच असे यूट्यूब वर चॅनल्स आहेत जेथे अभ्यासाबद्दल शिकवले जाते.

संगणकाद्वारे आपण काहीही सहजपणे शिकू शकतो आणि आपली कौशल्ये सुधारू शकतो.

व्यवसाय क्षेत्राला संगणकामुळे चालना मिळाली आहे. आज संगणक कोट्यावधी लोकांच्या व्यवसायाचे व्यासपीठ बनले आहे. संगणकाच्या विस्तारामुळे होणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण संगणकाचा वापर करून घरी बसून ऑनलाईन अनेक प्रकारची कामे करुन पैसे कमवू शकतो. जसे की आपण आपले स्वत: चे उत्पादन ऑनलाइन वेबसाइटवर विकू शकतो किंवा आपण त्याचा प्रचार करू शकतो, YouTube वर व्हिडिओ बनवू शकतो, आपली स्वतःची वेबसाइट तयार करून कमवू शकतो.

बॅंकिंग क्षेत्रात संगणकाची फार मोठी कामगिरी आहे. आज आपण संगणकाच्या च्या मदतीने सर्व ऑनलाईन सेवा वापरू शकतो. जसे की, पैसे पाठवणे किंवा घेणे, मोबाइल रिचार्ज, मोबाइल बिल, गॅस बिल, वीज बिल, डिश रिचार्ज, क्रेडिट कार्ड बिल, केबल टीव्ही बिल, रेल्वे तिकीट बुक, विमानाचे टिकिट बूक, ऑनलाईन शॉपिंग, अश्या बऱ्याच प्रकारचे पेमेंट करु शकतो.

संगणकावर ऑनलाईन बँकिंग सुविधा उपलब्ध असल्यामुळे बँकेचे व्यवहार करण्यासाठी बॅंकेच्या बाहेर दूरवर रांगेत उभे राहावे लागत नाही.

संगणकामुळे आपण जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात संपर्क साधू शकतो, संदेश पाठवू शकतो. ईमेल करू शकतो, आपल्या मित्रांना, नातेवाईकांना व्हिडियो कॉल द्वारे संवाद साधू शकतो.

वैद्यकिय क्षेत्रात संगणकाचे मोलाचे योगदान आहे. संगणकामुळे हॉस्पिटलचे काम करण्याची सुलभता आणि वेग वाढला आहे. आज संगणक कोणत्याही प्रकारच्या ऑपरेशनसाठी एक वरदान असल्याचे सिद्ध झाले आहे. संगणकाद्वारे आपण शरीराच्या आत कोणत्याही प्रकारच्या हालचाली पाहू शकतो.

वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या किंवा रोगांची तपासणी संगणकाद्वारे विकसित झाली आहे तसेच विविध आरोग्याच्या समस्या संगणकाद्वारे सहजपणे शोधल्या जात आहेत.

औषध आणण्यासाठी आपल्याला मेडिकलला पण जाण्याची गरज, संगणकावरून आपण औषध ऑर्डर करू शकतो.

उद्योग क्षेत्रात संगणकामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे माणसासारखी सर्व कामे करु शकणार्‍या स्मार्ट मशिन्स विकसित झाल्या आहेत.

प्रत्येक सरकारी व खासगी कार्यालयांमध्ये संगणक उपलब्ध आहेत, यामुळे कार्यालयांचे कागदी कार्य सोपे झाले आहेत आणि रेकॉर्ड फाईल्सची आवश्यकता कमी झाली आहे.

संगणकाचे तोटे

संगणकाने आपले कार्य सोपे केले आहे, परंतु त्यामध्ये आपण काही सावधगिरी बाळगणे देखील आवश्यक आहे. संगणकाचा आपल्या मेंदूवर चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारचा प्रभाव पडतो, आपण संगणक कश्याप्रकारे वापरतो त्यावर हे अवलंबून आहे. जर संगणकाचा वापर संतुलित पद्धतीने केला गेला तर तो खूप फायदेशीर आहे.

संगणकामुळे आपल्या शरीराची हानी होते, संगणकासमोर सतत बसून डोळ्यांना त्रास होतो, डोळे लाल होतात आणि डोळे दुखू लागतात.

काही गुन्हेगारी स्वभावाचे लोक अश्लील संदेश पाठवून, गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देऊन आणि नको असलेली माहिती पाठवून संगणकाचा गैरवापर करतात. ज्यामुळे समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे.

आजकाल, सर्व लोक आपली महत्त्वाची व्ययक्तिक माहिती संगणकामध्ये ठेवतात, जी संगणक हॅक केल्यामुळे चोरी जाऊ शकते.

जर आपण काळजीपूर्वक इंटरनेट बँकिंगचा वापर न केल्यास आपला वैयक्तिक डेटा चोरीला जाण्याचा धोका असतो, ज्यामुळे आपले आर्थिक नुकसान होऊ शकते.

सायबर हल्ल्याचा धोका संगणकावर नेहमीच असतो.

आजच्या काळात, संगणक खरोखर एक शक्तिशाली डिव्हाइस आहे आणि यामुळे आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. आपण संगणकाचा योग्य प्रकारे आणि आवश्यक उपयोग केल्यास तो आपल्यासाठी नक्कीच वरदान ठरू शकतो.

पण चुकीच्या वापरामुळे संगणकाला दोषी ठरवले जाऊ शकत नाही. कारण संगणकाच्या दुरुपयोगासाठी मनुष्य स्वतः जबाबदार आहे.  आपण संगणकाचा योग्य वापर करतो की गैरवापर करतो हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे

आपण एक जबाबदार नागरिक असाल तर आपण संगणकाचा वापर योग्य व गरजेनुसार केला पाहिजे.

मला आशा आहे की, मित्रांनो तुम्हाला संगणकाचे फायदे व तोटे | Advantages And Disadvantages Of Computer In Marathi हा मराठी लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा लेख तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.  🙏🏻

वाचा 

➡️संगणक निबंध मराठी 

➡️माहिती तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे

➡️इंटरनेट नसते तर मराठी निबंध

➡️मोबाईल नसता तर मराठी निबंध


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने