इंटरनेट नसते तर मराठी निबंध - Internet Naste Tar Marathi Nibandh


Internet essay in marathi मित्रांनो या काळात इंटरनेट हा शब्द कोणाला माहित नाही? प्रत्येक व्यक्ती इंटरनेटचा वापर करतो. खऱ्या अर्थाने पाहिले तर इंटरनेट हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आणि आयुष्याची गरज बनला आहे. इंटरनेटने आपले बरेच कार्य सुलभ केले आहेत. ज्यामुळे आपल्याला प्रत्येक कार्य अतिशय सोपे वाटते. आजच्या काळात इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय नेटवर्क बनले आहे. या युगात आधुनिक, डिजिटल आणि उच्च तंत्रज्ञानाचा विकास हा इंटरनेटमुळेच झाला आहे. पण कधी आपण हा विचार केला आहे का, कि इंटरनेट नसते तर Internet Naste Tar किंवा इंटरनेट बंद झाले तर आपल्या देशाचे काय झाले असते. चला तर मग जाणून घेऊया...


इंटरनेट नसते तर मराठी निबंध - Internet Naste Tar Marathi Nibandh


इंटरनेट नसते तर मराठी निबंध - internet naste tar marathi nibandh

इंटरनेट नसते तर आज आपला देश जो आधुनिक डिजिटल झालेला आहे आणि उच्च तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे तो झाला नसता.


Uses of internet in marathi

जर इंटरनेट नसते तर आपल्या सर्वांचे आयुष्य आजच्यासारखे घडलेच नसते, जर आपण आज पाहिले तर आपण इंटरनेटद्वारे आपल्या मित्र, नातेवाईकांशी सोशल नेटवर्किंग साइटवर बोलत असतो, फोटो शेयर करत असतो. अशा प्रकारे संपूर्ण जग इंटरनेटद्वारे एकमेकांशी जोडलेले आहे. जर इंटरनेट नसते तर आपण आपल्या मित्र, नातेवाईकांशी बोलू शकलो नसतो किंवा फोटो शेयर करू शकलो नसतो.


इंटरनेट नसते तर प्रत्यक्षात आपण आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी पहात आहोत त्या घडल्या नसत्या आणि आपले आयुष्य एक प्रकारे रंगहीन झाले असते.


आज आपल्याला प्रत्येक गोष्टींची माहिती इंटरनेटवर मिळते. आपल्याला गूगलवर किंवा यूट्यूबवर वेगवेगळ्या गोष्टी शिकता येतात. असे खूप विद्यार्थी आहेत जे इंटरनेट वरून शिक्षण घेतात. जर इंटरनेट बंद झाले तर आपल्याला विविध गोष्टींची माहिती कुठून मिळणार? आपले ज्ञान कसे वाढणार? इंटरनेट नसते तर गूगल, यूट्यूब यांसारखे सर्च इंजिन निर्माण झाले नसते.


➡️मोबाईल नसता तर मराठी निबंध 

➡️डिजिटल इंडिया मराठी निबंध

➡️इंटरनेट म्हणजे काय? इंटरनेट चे फायदे आणि तोटे


आजच्या या काळात भरपूर असे लोकं आहेत जे इंटरनेटद्वारे पैसे कमावतात. बरेच असे व्यवसाय, कंपन्या आहेत ज्या इंटरनेटद्वारे चालतात. जर इंटरनेट नसेल तर हे सर्व शक्य होणार नाही. घरी बसून इंटरनेटद्वारे पैसे कमवू शकणार नाहीत.


आजच्या व्यापारी क्षेत्रातील व्यवसाय, व्यापार आणि पेमेंटसाठी इंटरनेट हे मुख्य माध्यम बनले आहे. यामुळे बॅंकांचे व्यवहार, पैशांची देवाणघेवाण यांसारखे कार्य काही मिनिटांत होतात. इंटरनेट नसते तर हे शक्य झाले नसते.


➡️फोन पे काय आहे? फोन पे कसे वापरावे?


आपल्याला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण आपला व्यवसाय इंटरनेटद्वारे जास्तीत जास्त लोकांना सांगू शकतो. इंटरनेट नसते तर हे शक्य झाले नसते.


इंटरनेटच्या माध्यमातून बराच रोजगार निर्माण होतो. जर इंटरनेट नसते तर बरेच लोकं बेरोजगार राहिले असते. लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले असते.


इंटरनेट नसते तर परदेशात असलेल्या आपल्या नातेवाईकांसोबत व्हिडिओ कॉल द्वारे बोलू शकलो नसतो. आपण मोबाईलवर किंवा संगणकावर आपल्या आवडीचे कार्यक्रम किंवा चित्रपट इत्यादी पाहू शकलो नसतो. त्यामुळे आपली करमणूकही झाली नसती.

इंटरनेट नसते तर आपण घरी बसून विमान, बस रेल्वे यांचे टिकिट आणि वीज बिल भरू शकलो नसतो. 


100 वर्षांपूर्वी कोणालाही असा विचार नव्हता की, मानव स्वतःहून काहीतरी तयार करेल, ज्याद्वारे जगाची सर्व माहिती एकाच ठिकाणी सहज मिळेल आणि जगातील जवळजवळ सर्व देश आपापसात जोडले जातील. पण आज इंटरनेटने ज्या प्रकारची सुविधा आपल्याला दिली आहे त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आज संपुर्ण जग इंटरनेटच्या जाळ्यात अडकले आहे. इंटरनेट आपल्या जीवनाशी जोडले गेले आहे. त्यामुळे आजच्या काळात इंटरनेट हि अशी गोष्ट आहे की त्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. इंटरनेटमुळे नक्कीच आपला आणि आपल्या देशाचा विकास झाला आहे. जर इंटरनेट नसते किंवा इंटरनेट बंद झाले तर हे शक्य झाले नसते.

 

➡️हॅलो! गुगल असिस्टंट काय आहे? कसे वापरावे?

➡️गूगल मॅप काय आहे? कसे वापरावे? 

➡️GPS म्हणजे काय हे कशासाठी वापरले जाते?


मला आशा आहे की, आपल्याला इंटरनेट नसते तर मराठी निबंध - Internet Naste Tar Marathi Nibandh याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना हि पोस्ट शेअर करायला विसरू नका. ☺️


आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻


➡️इंटरनेट शाप की वरदान निबंध मराठी


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने