मोबाईल नसता तर मराठी निबंध - Mobile Nasta Tar Marathi Nibandh

 मित्रांनो आजच्या काळात मोबाईल फोन हा आपल्या जिवनाचा एक महत्त्वचा भाग बनला आहे. आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मोबाईल फोन मुळे आपले जीवन खूप सोपे झाले आहे. आज आपल्याला मोबाईल फोन वापरून बरेच कामे करता येतात. असे कुठलेही काम नाही की ते आपण मोबाईल विना करू शकत नाही. आजच्या वेगवान युगात मोबाईल फोन ने खूप मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसित केले आहे. परंतु आपण कधी विचार केला आहे का, की भ्रमणध्वनी मोबाईल नसता तर किंवा मोबाईल कायमचे बंद झाले तर काय झाले असते?


मोबाईल नसता तर निबंध मराठी - Mobile Nasta Tar Nibandh In Marathi

मोबाईल नसता तर मराठी निबंध  Mobile Nasta Tar Nibandh In Marathi


या युगामध्ये प्रत्येक वस्तूचे काहीना काही फायदे आणि नुकसान आहेत. म्हणुन त्यामुळे भ्रमणध्वनी मोबाईल फोन नसता तर काही गोष्टींसाठी फायदा झाला असता आणि काही गोष्टींसाठी नुकसान झाले असते.

आजच्या या युगाला आधुनिक युगामध्ये परिवर्तित करण्यासाठी मोबाईल फोनची भूमिका हि खुप मोठी आहे. त्यामुळे मोबाईल फोन नसता तर हे आजचे युग आधुनिक झाले नसते. तसेच या युगाला डिजिटल करण्यामागे सुद्धा मोबाईल फोन चे खूप मोठे योगदान आहे. 


मोबाईल चे उपयोग

आज आपण मोबाईल वरुन सर्व ऑनलाईन सेवा वापरू शकतो. जसे की, पैसे पाठवणे किंवा घेणे, आपल्याला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर आपण आपल्या सीट चे Reservation करू शकतो ज्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही, आपण विमानाचे टिकिट बूक करू शकतो, ऑनलाईन शॉपिंग करू शकतो, आपल्याला कोठे जायचे असेल आणि आपल्याला मार्ग माहिती नसेल तर आपल्याला कोणाला विचारण्याची देखील गरज नाही कारण आपण मोबाईल च्या साहाय्याने मार्ग शोधू शकतो, आपल्याला कोणतीही माहिती हवी असल्यास आपण ती माहिती काही सेकंदात मोबाईल द्वारा घेऊ शकतो. एखाद्या जागी अपघात झाला तर त्या अपघातस्थळापासून पोलिसांशी, डॉक्टरांशी मोबाईल फोन मुळे सहज संपर्क साधता येतो यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहे.


वाचा➡️इंटरनेट नसते तर मराठी निबंध

➡️ मोबाईल म्हणजे काय? मोबाईल चा शोध कोणी लावला?

➡️मोबाईल पाण्यात पडल्यावर काय करावे? हे उपाय करा.


आजच्या युगात विद्यार्थी इंटरनेटचा वापर करून मोबाईल वरुन शिक्षण घेतो. बरेच असे youtube वर व्हिडिओ आहेत जे अभ्यासाबद्दल शिकवत असतात. मोबाईल Application मुळे देखील विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत मिळत असते. सांगायचे तात्पर्य येवढेच की, मोबाईल नसता तर ह्या सर्व गोष्टी शक्य झाल्या नसत्या.

काही वर्षा अगोदरच्या काळात जे टेलिफोन होते त्या टेलिफोन पेक्षा आताच्या काळातले मोबाईल फोन स्मार्ट आहेत. त्या काळात आपल्याला एकाद्या व्यक्तिसोबत बोलायचे असेल तर आपल्याला टेलिफोन बॉक्स च्या बाहेर रांगेमध्ये उभे राहावे लागत होते. त्या काळात टेलिफोनवर बोलणेच हे खूप मोठी गोष्ट होती. एकमेकांपासून ते दुसर्‍यापर्यंत संदेश पाठवणे हे खूपच अवघड होते. संदेश पाठवायचा असल्यास पोस्टमन द्वारा संदेश पाठवला जात होता. हा संदेश पाठविण्यासाठी कधी - कधी काही महिन्याचा कालावधी लागत होता.

पण आता आजच्या आधुनिक काळात अमेरिकेत गेलेला मुलगा त्यांच्या म्हातार्‍या आईवडिलांना व्हिडिओ कॉल द्वारा संवाद साधतो. त्यांच्यासाठी तर मोबाईल फोन हे वरदानच ठरले आहे. आपण मोबाईल फोन द्वारा एकमेकांशी सहजतेने बोलू शकतो आणि काही सेकंदात संदेश पाठवू शकतो. मग तो व्यक्ति जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात  असला तरीही आपण हे करू शकतो.

पण जर मोबाईल नसेल तर? मोबाईल नसता तर आजचे युग जे आधुनिक डिजिटल झाले आहे ते झाले नसते. खूप सार्‍या गोष्टी अवघड होतील. आईवडिलांपासून दूरवर असलेल्या मुलांना आपल्या आईवडिलांशी संपर्क साधता येणार नाही. बँकेचे व्यवहार करण्यासाठी बॅंकेच्या बाहेर दूरवर रांगेत उभे राहावे लागेल. डॉक्टरांशी संपर्क न झाल्यामुळे अनेकांचे प्राण जातील. 


➡️फोन पे काय आहे? फोन पे कसे वापरावे?

➡️गूगल पे म्हणजे काय? गूगल पे कसे वापरावे? 


आपल्याला कुठे जायचे असेल तर आपल्याला प्रत्येक जागी मार्ग लोकांना विचारावे लागतील. बरेच विद्यार्थी इंटरनेटचा वापर करून मोबाईल वरुन शिक्षण घेत होते ते आता मोबाईल नसल्यामुळे बंद होईल. ऑनलाईन शॉपिंग करता येणार नाही. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी पत्रव्यवहाराचा उपयोग करावा लागेल त्यामुळे पत्रविभागात अधिक प्रमाणात काम वाढेल. 

आपल्या परिवारातील एखादी व्यक्ति घराच्या बाहेर गेलेली असेल तर त्या व्यक्तीचा ठावठिकाणा कसा शोधता येईल? आपल्याला एखादी माहिती हवी असेल तर ती माहिती सहज शक्य होणार नाही म्हणजेच सांगायचे झाले तर प्रत्येकजागी आपला वेळ जाईल आणि अडथळा निर्माण होईल.

मोबाईल नसेल तर - मोबाईल बंद झाले तर खूप काही गोष्टी चांगल्या घडतील... मोबाईल नसल्यामुळे लोकांकडे वेळ निर्माण होईल त्यामुळे लोकं त्यांचा परिवारातील लोकांशी चर्चा करतील, बोलतील, वेळ घालवतील. लहान मुले जे रात्री झोपेच्या वेळी मोबाईल मध्ये कार्टून व्हिडिओ पाहून झोपत होते ते आता आजीबाईंच्या गोष्टी ऐकून झोपतील. 

मोबाईल मुळे जे मुलं घरी मोबाईलवर वेळ घालवत होते ते आता मोबाईल नसल्यामुळे बाहेर मैदानावर खेळतील. जे लोकं सोशल साइटवर व्यस्त राहत होते ते आता एकमेकांशी भेटतील. काही लोकं वाहन चालवत असताना मोबाईल वापरायचे किंवा मोबाईलवर बोलायचे ते आता कमी होईल आणि यामुळे अपघाताचे प्रमाण देखील कमी होईल बर्‍याचदा अपघात हा दारू पिऊन वाहन चालविल्याने किंवा मोबाईल वापरत असल्याने होतो. 

आपण एकदिवस मोबाईल फोन शिवाय राहू शकत नाही. एकवेळ आपल्याला जेवायला नाही मिळाले तरी चालेल पण आपल्याला मोबाईल फोन जवळ हवा अशी परिस्थीती या काळात बनली आहे. त्यामुळे मोबाईल नसेल तर नक्कीच लोकांचे आरोग्य देखील चांगले होईल. 

मित्रांनो मोबाईल मुळे चांगल्या आणि वाईट गोष्टी घडतच राहतील. पण हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे की आपण मोबाईलचा वापर कशाप्रकारे करत आहोत.


वाचा➡️मोबाइल आणि बालपण - मोबाईलचे व्यसन मुलांवर होणारे दुष्परिणाम

➡️मोबाईल गरम का होतो? मोबाईल गरम होण्याची कारणे

➡️मोबाईल हँग होत आहे...या टिप्स वापरा! मोबाईल कधीही हँग होणार नाही.  

हा निबंध तुम्ही मोबाईल शाप की वरदान Mobile shap ki vardan nibandh in marathi यासाठी सुद्धा लिहू शकता. 

मला आशा आहे की, मित्रांनो तुम्हाला मोबाईल नसता तर Mobile Nasta Tar हा मराठी निबंध आवडला असेल. तुम्हाला हा निबंध कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा निबंध तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.  🙏🏻


➡️ई-मेल आयडी म्हणजे काय? 

➡️सोशल मीडिया म्हणजे काय? सोशल मीडिया चे फायदे व तोटे


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने