फोन पे काय आहे? फोन पे कसे वापरावे? फोन पे बद्दल संपूर्ण माहिती Phonepe information in marathi


Phonepe information in marathi मित्रांनो आपला भारत देश हा बऱ्याच प्रकारे डिजिटल झालेला आहे. आपल्या भारत देशात ऑनलाईन डिजिटल पेमेंट करण्याच्या व्यवहारात बरीच वाढ झाली आहे. ऑनलाइन डिजिटल पेमेंट करण्याचे बरेच साधन आहेत. जसे की, गुगल पे, पेटीएम, भीम UPI, नेट बँकिंग. पण आजच्या पोस्टमधे आपण फोन पे ॲप बद्दल म्हणजे फोन पे काय आहे? फोन पे कसे वापरावे? फोन पे कसे चालू करायचे? Phonepe information in marathi फोन पे बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया...

फोन पे बद्दल संपूर्ण माहिती Phonepe information in marathi

फोन पे माहिती - Phonepe information in marathi

मित्रांनो फोन पे हे डिजिटल पेमेंट करण्यासाठी खूप लोकप्रिय असलेले ॲप आहे. हे ॲप वापरून आपण बऱ्याच डिजिटल पेमेंट ह्या आपल्या मोबाईल वरून करू शकतो.

फोन पे ॲप काय आहे? What is phonepe in marathi

फोन पे म्हणजे काय तर फोन पे हे UPI (Unified payment interface) आधारित ॲप आहे. या फोन पे ॲप ला Yes बँक ऑपरेट करते आणि या ॲप ला NPCI (National payments corporation of India) द्वारा विकसित केले आहे. NPCI हि भारताची बँकिंग प्रणाली व्यवस्थापित करते. त्यामूळे हे ॲप पूर्णपणे सुरक्षित आहे.


फोन पे चे संस्थापक कोण आहेत?

फोन पे चे संस्थापक राहुल चारी हे आहेत आणि राहुल चारी हे सह-संस्थापक म्हणून कार्यरत आहेत.


फोन पे ची स्थापना कधी झाली?

फोन पे ही डिजिटल पेमेंट सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय बैंगलोर, भारत येथे आहे. या कंपनीची स्थापना हि समीर निगम, राहुल चारी आणि बुर्जिन इंजीनियर यांनी डिसेंबर 2015 मध्ये झाली. या ॲप ने ऑगस्ट 2016 मध्ये यूपीआय वापरून पैसे एक्सचेंज करण्यास सुरूवात केली.

फोन पे कंपनीचा इतिहास

डिसेंबर 2015 मध्ये फोन पे हि कंपनी अस्तित्वात आली. एप्रिल 2016 मध्ये या कंपनीला फ्लिपकार्टने खरेदी केले होते. फ्लिपकार्टच्या खरेदीनंतर एफएक्समार्टचा परवाना फोन पे ला हस्तांतरित करण्यात आला आणि त्याचे नाव बदलून फोन पे वॉलेट करण्यात आले. यानंतर फोन पे चा संस्थापक समीर निगम यांची कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

फोन पे ॲप वरून आपण पैसे ट्रान्सफर, मोबाइल रिचार्ज, मोबाइल बिल, गॅस बिल, वीज बिल, डिश रिचार्ज, क्रेडिट कार्ड बिल, केबल टीव्ही बिल, एज्युकेशन fees, ब्रॉडबँड, आणि बरेच काही करू शकतो.

फोन पे ॲप व्दारे आपण investment करु शकतो.

फोन पे ॲप वरून आपण Fasttag विकत घेऊ शकतो.

पण मित्रांनो या सुविधांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला फोन पे ॲपवर एक अकाउंट तयार करावे लागेल, त्यानंतरच आपण या सुविधांचा लाभ घेऊ शकतो आणि आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने डिजिटल पेमेंट करू शकतो.


➡️गूगल पे म्हणजे काय? गूगल पे कसे वापरावे? 

➡️व्हॉट्सॲप चे नवीन फिचर आता व्हॉट्सअ‍ॅपवरुन सुरक्षित पैसे पाठवता येणार.


नोट: लक्षात असू दया ➡️ फोन पे ॲप वर अकाउंट तयार करण्यासाठी आपल्याकडे खालील गोष्टी असणे आवश्यक आहे.

▪ आपल्याकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.
▪ आपल्याकडे बँक खाते असावे.
▪ त्या बँक खात्याला आपला मोबाईल नंबर लिंक असावा.
▪ त्या बँक खात्याचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे.
▪ आपल्याकडे एल ईमेल आयडी असावी.

फोन पे कसे चालू करायचे? फोन पे वर अकाउंट कसे तयार करावे?

फोन पे चालू करण्यासाठी आपल्याला फोन पे वर अकाउंट तयार करावे लागेल. फोन पे ॲपवर अकाउंट तयार करणे खूप सोपे आहे. अकाउंट तयार करण्यासाठी खालील स्टेप ला फॉलो करा.

>> सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये Google Play Store वरून फोन पे ॲप इंस्टॉल करा किंवा खालील फोन पे डाऊनलोड बटणावर क्लिक करा.

फोन पे डाऊनलोड

>> फोन पे ॲप इंस्टॉल झाल्यानंतर ओपन करा.
आता आलेल्या स्क्रीनमध्ये आपल्या बँक खात्याला लिंक असलेला आपला मोबाइल नंबर टाका आणि PROCEED या ऑप्शनवर क्लिक करा.

>> आता आपल्याला फोन पे वापरण्यासाठी परमिशन मागितले जाईल तेव्हा परमिशन दया.

>> आता आपल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो ओटीपी automatically कन्फर्म होईल.

>> आपल्या खात्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला एक पासवर्ड (तुम्हाला हवा असलेला कोणताही) प्रविष्ट करा आणि Continue ऑप्शन वर क्लिक करा.

आता आपले फोन पे खाते तयार झाले.

आपल्याला डिजिटल पेमेंट करण्यासाठी आपले बँक खाते जोडावे लागेल.

आपण डिजिटल पेमेंट करू इच्छित असाल तर खालील स्टेप ला फॉलो करून बँक खाते जोडू शकता.

बँक खाते जोडण्यासाठी आपल्याकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे.

>>  आता आपल्यासमोर Add Bank हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर वेगवेगळ्या बँकेचे नाव येतील. त्यामधील आपली जी बँक आहे ती निवडा. बँक निवडल्यानंतर ऑटोमॅटिक प्रक्रिया पुर्ण होईल.

फोन पे कसे चालू करायचे?

>> आपण पहिल्यांदा फोन पे उघडले असेल तर आपल्याला ATM चे शेवटचे 6 आकडे आणि आपल्या कार्ड ची expiry date टाकावी लागेल. त्यांनतर आपल्याला UPI पिन तयार करावा लागेल. हा UPI पिन आपल्याला Transaction करते वेळेस टाकावा लागतो.

UPI पिन तयार झाल्यानंतर आपली बँक जोडली जाईल.

आपण एकापेक्षा जास्त बँक खाते येथे जोडू शकता.


फोन पे कसे वापरावे? How to use Phonepe in marathi

फोन पे वापरणे खूप सोपे आहे.

फोन पे ओपन केल्यानंतर आपल्याला विविध प्रकारचे पर्याय दिसतील. या पर्यायांबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया...

फोन पे कसे वापरावे? How to use Phonepe in marathi

1. Transfer money

▪️ To Contact: या ऑप्शन व्दारे आपण Contact नंबरला पैसै पाठवू शकतो.

▪️To Account: येथून आपण बँकेत पैसे पाठवू शकतो.

▪️To Self: या पर्यायाने आपण आपल्या कोणत्याही दुसऱ्या बँक खात्यात पैसे पाठवू शकतो.

▪️Bank Balance: येथून आपण बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकतो.

2. Recharge & Pay Bill

▪ येथून आपण मोबाईल रिचार्ज, डीटीएच, वीज बिल, क्रेडिट कार्ड बिल, गॅस बिल, केबल टीव्ही बिल, एज्युकेशन fees, ब्रॉडबँड, विमा, नगरपालिका कर इत्यादी सर्व प्रकारचे बिल भरू शकतो.

▪ आपल्याला सोने खरेदी करायचे असल्यास आपण ते देखील येथून करू शकतो.


फोन पे वापरण्याचे फायदे

▪ फोन पे व्दारे आपण दररोज 1 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकता.
▪ येथे आपण ऑनलाइन शॉपिंग करू शकता, शॉपिंग केल्यास आपल्याला Discount किंवा कॅशबॅक देखिल मिळतो.
▪ हे ॲप बर्‍याच प्रकारच्या भाषांमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे आपण आपल्या आवडीची भाषा निवडू शकतो.
▪ या ॲप मध्ये जवळजवळ सर्व बँक खाती उपलब्ध आहेत, ज्यातील 40 बँक ह्या यूपीआय सक्षम आहेत.
▪ आपण आपल्या मित्रांना फोन पे अ‍ॅप शेअर करुन पैसे कमवू शकतो. जेव्हा आपण आपल्या फोन पे ॲप वरून आपल्या मित्रांना Refferal link शेअर करतो आणि त्या Refferal link व्दारे कोणीही हे ॲप इंस्टॉल करून खाते तयार केले आणि त्यानंतर त्याने प्रथम transaction केल्याबरोबर आपल्याला 100 रुपये मिळतात.


मला आशा आहे की, आपल्याला फोन पे काय आहे? फोन पे कसे वापरावे? फोन पे कसे चालू करायचे? Phonepe information in marathi फोन पे याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना हि पोस्ट शेअर करायला विसरू नका. ☺️

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻

➡️ Share Market Information In Marathi शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट मराठी माहिती


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने