कोरोना लस नोंदणी - 18 वर्षांवरील लोकांसाठी अनिवार्य - Vaccine Registration in maharashtra

Vaccine Registration in maharashtra सध्या आपल्या भारत देशातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने, आज पासून सुरु होणाऱ्या लसीसाठी म्हणजे 28 एप्रिल 2021 रोजी दुपारी 4.00 वाजल्यापासून 18 वर्षांवरील लोकांना लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. 1 मे 2021 रोजी पासून 18 ते 45 वयोगटातील सर्व लोकांना लस देण्यात येणार आहे.


कोरोना लस नोंदणी - 18 वर्षांवरील लोकांसाठी अनिवार्य - Vaccine Registration in maharashtra


कोरोना लस नोंदणी - 18 वर्षांवरील लोकांसाठी अनिवार्य - Vaccine Registration in maharashtra

Covid-19 लसीकरणाचा हा तिसरा टप्पा असून, 28 एप्रिल 2021 रोजी दुपारी 4.00 वाजल्यापासून 18 ते 45 वर्षाच्या वयोगटातील लोकांसाठी लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हि लस घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक लस घेत आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे की, आता 18 वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार आहे. 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील वयाच्या लोकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या तिसऱ्या लसीकरणाच्या टप्यामध्ये आरोग्य मंत्रालयासह केंद्र सरकारने नवीन धोरण तयार केलेय. त्यामध्ये म्हंटले 18 ते 45 वर्षाच्या वयोगटातील लोकांना नोंदणी न करता ही लस मिळू शकणार नाही. नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आपल्या भारत देशात सद्या दोन प्रकारच्या लस दिल्या जात आहेत, एक कोवॅक्सिन आणि दुसरी कोविशिल्ड.


नोंदणी नाही केली तर लस मिळणार का?

जे लोकं 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत त्यांना पूर्वीप्रमाणेच नोंदणीची प्रक्रिया सुरू राहील. पण जे 18 वर्षांवरील लोकं आहेत त्यांना लस नोंदणी करणे आणि लसीकरणासाठी वेळ निश्चित करणे आवश्यक आहे. नोंदणी नाही केली तर लस मिळणार का? तर केंद्र सरकारने Mygov ट्विटर अकाऊंटमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, नोंदणी केल्याशिवाय कोरोना लस मिळणार नाही.


कोरोना लस नोंदणी कशी करावी?

हि कोरोनाची लस घेण्यासाठी आपल्याला प्रथम सरकारच्या कोविन वेब प्लॅटफॉर्म, उमंग ॲप किंवा आरोग्य सेतू ॲपवर नोंदणी करावी लागेल. हि नोंदणी आपण घरी बसून मोबाईल वरून करु शकतो.

कोविड लस नोंदणी करण्याच्या तीन पद्धती आहेत.
1. सरकारचा कोविन वेब प्लॅटफॉर्म
2. उमंग ॲप
3. आरोग्य सेतू ॲप

यांमधील आपण सरकारच्या कोविन वेब प्लॅटफॉर्म यावर लस नोंदणी कशी करावी याबद्दल जाणून घेऊया...


सरकारचा कोविन वेब प्लॅटफॉर्म

सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये

 https://selfregistration.cowin.gov.in 

हि वेबसाईट उघडा. मोबाईल नंबर टाकून Get OTP बटणावर क्लिक करा >> नंतर मोबाईल नंबरवर आलेला OTP 180 सेकंदात टाका आणि VERIFY बटणावर क्लिक करा. >> आता आपल्यासमोर Register For Vaccination हे पेज ओपन होइल. या पेज मध्ये आपल्याकडे असलेले ओळखपत्र निवडा. ओळखपत्रावर असलेले आपले नाव, Gender आणि आपले जन्म वर्ष इत्यादी माहिती टाका आणि Register या बटणावर क्लिक करा.


Vaccine Registration in maharashtra

आता आपले Registration (नोंदणी) Successful झाली आहे.

येथे आपल्याला एका मोबाईल नंबरवर फक्त चार व्यक्ती Add करता येतात. व्यक्ती Add करण्यासाठी Add More बटणावर क्लिक करू शकता.

हे सर्व झाल्यानंतर आपल्याला लस घेण्यासाठी Schedule बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर पिन कोड टाकून आपल्या जवळील जे सेंटर आहे ते निवडायचे आहे. सेंटर निवडल्यानंतर आपली Appoinment बुक होइल ज्यामध्ये तारीख आणि वेळ असेल.

ज्या सेंटर ची आपण Appoinment बुक केली त्या सेंटरवर आपल्याला 20 मिनिटे अगोदर जावे लागेल. जाताना आपण Registration च्या वेळी जे ओळखपत्र अपलोड केले ते घेऊन जावे लागेल.

ओळखपत्र घेऊन सेंटर वर जा आणि लस घ्या.

याच पद्धतीनं तुम्ही उमंग ॲप किंवा आरोग्य सेतू अॅपवर रजिस्ट्रेशन करु शकता.

लसीची नोंदणी करण्यासाठी आपल्याकडे यांपैकी एक आवश्यक कागदपत्रे म्हणजे ओळखपत्र असणे गरजेचे आहे. सरकारने खाली दिलेल्या 12 प्रकारच्या ओळखपत्रांना मान्यता दिली आहे.

▪ आधार कार्ड
▪ मतदार ओळखपत्र
▪ पासपोर्ट
▪ ड्राइविंग लाइसेंस
▪ PAN कार्ड
▪ हेल्‍थ इंश्‍योरेंस स्‍मार्ट कार्ड
▪ पेंशन डॉक्‍युमेंट
▪ बैंक/पोस्‍ट ऑफिस पासबुक
▪ मनरेगा जॉब कार्ड
▪ खासदार / आमदार / एमएलसी आयडी कार्ड
▪ सरकारी कर्मचार्‍यांचे सर्व्हिस आयडी कार्ड
▪ राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत दिलेले स्मार्ट कार्ड

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने