एप्रिल लॉकडाऊन मुळे जनतेला आर्थिक मदत | Maharashtra lockdown news in marathi

lockdown in maharashtra april 2021

मित्रांनो आपल्याला माहित असेल महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा आजपासून म्हणजेच 14 एप्रिल 2021 रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 15 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन आणि पूर्णपणे संचारबंदी जाहिर करण्यात आली आहे. राज्यातील जनतेला या लॉकडाउनच्या काळात दिलासा मिळावा म्हणून सरकार शासनातर्फे आर्थिक मदत करण्यास येणार आहे. अशी घोषणा ठाकरे सरकारने केली आहे.


एप्रिल लॉकडाऊन मुळे जनतेला आर्थक मदत | Maharashtra lockdown news in marathi

खाली दिलेल्या लाभार्थ्यांना हि मदत मिळणार आहे.


दारिद्र रेशेखालील व्यक्ति

अन्नसुरक्षा योजनेतून ७ कोटी लाभार्थ्यांना मोफत धान्य!

अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत दारिद्र रेशेखालील लाभार्थ्यांना प्रती व्यक्ति 3 किलो गहु आणि 2 किलो तादुळ एका महिन्यासाठी मोफत देण्यात येणार आहेत. जवळपास 7 कोटी लाभार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे.

विविध योजनतेतील निवृत्तीधारकांना आर्थिक मदत

३५ लाख लाभार्थ्यांना आगाऊ आर्थिक मदत

1. संजय गांधी निराधार योजना
2. श्रावन बाळ योजना
3. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
4. इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना
5. केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना

या पाच योजनेतील लाभार्थ्यांना पुढिल दोन महिन्याकरीता प्रत्येकी 1 हजार रुपये म्हणजेच एकूण दोन हजार रूपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे. जवळपास या पाच योजनांचा एकुण 35 लाख लाभार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे.


शिवभोजन थाळी

10 रूपयात दिल्या जाणारी शिवभोजन थाळी 5 रूपयात करण्यात आली होती पण आता मात्र पुढचा एक महिना शिवभोजन थाळी मोफत देणार आहोत. जवळपास दिवसाला रोज 2 लाख शिवभोजन थाळ्या मोफत दिल्या जाणार आहे.


नोंदणीकृत बांधकाम कामगार

महाराष्ट्र इमारत व इमारत कामगार कल्याणकारी मंडळात राज्यातील नोदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 1500 रूपये इतके आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. जवळपास 12 लाख इतक्या लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.


घरेलु नोंदणीकृत कामगार 

घरेलु नोंदणीकृत कामगारांना सुध्दा सरकारतर्फे आर्थिक मदत दिल्या जाणार आहे. किती मदत देण्यात येणार आहे हे सध्या जाहीर केले नाही.

अधिकृत फेरिवाले

अधिकृत फेरिवाल्यांना एकावेळी प्रत्येकी 1500 रूपये मदत दिल्याजाणार असून स्वनिधी योजनेअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. जपळपास 5 लाख लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.


परवाना धारक रिक्षावाले 

परवानाधारक रिक्षा चालकांना एकावेळी 1500 रूपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. जवळपास 12 लाख परवाना धारक रिक्षावाल्यांना याचा लाभ होणार आहे.


आदिवासी जनता

खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या आदिवासींना प्रती कुटुंब 2 हजार रूपये इतके आर्थिक सहाय्य म्हणून मदत देण्यात येणार आहे. जवळपास 12 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ हा होणार आहे.


तर अश्याप्रकारे महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन जाहिर करण्यात आला असून या लॉकडाउनच्या काळात गरिब जनतेला मदत करण्यात येणार आहे.


➡️ नरेंद्र मोदी यांचा जीवन परिचय

➡️नरेंद्र मोदी यांचा मोबाईल नंबर

➡️राज ठाकरे मोबाईल नंबर

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने