गुढीपाडवा माहिती मराठी | गुढीपाडवा माहिती इतिहास | Gudi Padwa information in marathi

Gudi Padwa information in marathi

मित्रांनो बघता बघता गुढीपाडवा हा सण आला आहे. यंदाच्या वर्षी गुढीपाडवा 13 एप्रिल, मंगळवारी साजरा करण्यात येणार आहे. हिंदू नववर्षाची सुरूवात हि गुढीपाडवा सणाने होते. हा सण मुख्यतः महाराष्ट्रात आनंदाने साजरा केला जातो. पंचांगानुसार नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदाने होते आणि या दिवशी हा सण साजरा करण्याची प्रथा आहे.


गुढीपाडवा माहिती मराठी | गुढीपाडवा माहिती इतिहास


गुढीपाडवा का साजरा केला जातो?


गुढीपाडवा या दिवशी भगवान विष्णूची आणि ब्रह्मदेवाची पूजा केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण हिंदू नववर्ष म्हणून साजरा केला जातो. रब्बी पिकांची कापणी झाल्यानंतर शेतकरी आनंदात हा सण साजरा करतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात बैलांची पूजा करून नांगरणी करतात. गुढीपाडवा हे पर्व महाराष्ट्रासोबतच गोवा, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, आंध्रप्रदेश, काश्मीर आणि बऱ्याच भागांमध्ये हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनवले जाते. याशिवाय, गोड भातही बनविला जातो. सूर्योदयाला भगवान विष्णूला आणि ब्रह्माला या सर्व पदार्थांचं नैवेद्य दाखवलं जाते.

गुढीपाडवा माहिती इतिहास


गुढीपाडव्याचे महत्त्व

पौराणिक कथांनुसार, असा विश्वास आहे की ब्रह्माजींनी या दिवशी विश्वाची निर्मिती केली.  म्हणूनच गुढीला ब्रह्मध्वज देखील मानले जाते.  याला इंद्रध्वज असेही म्हणतात. मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि घरात सुख-समृध्दी नांदते.


हिंदूंमध्ये वर्षभरात येणारे साडेतीन मुहूर्त अतिशय शुभ मानले जातात.  या साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवाहा एक आहे आहे.


काही लोक 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून अयोध्येत परत आलेल्या भगवान रामांच्या स्मरणार्थ गुढी पाडव्याचा सण साजरा करतात.

गुढी पाडवा 2021 शुभ मुहूर्त आणि तिथी


गुढीपाडव्याचा उत्सव – 13 एप्रिल 2021


प्रतिपदा तिथीची सुरुवात – 12 एप्रिल 2021 ला रात्री 8 वाजता


 चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये सूर्योदयाच्या वेळी प्रतिपदाच्या दिवशी नव संवत्सर त्या दिवसापासून सुरू होतो.


 प्रतिपदा जर दोन दिवस सूर्योदयांवर पडत असेल तर पहिल्या दिवशी गुढी पाडवा साजरा केला जातो.


सूर्योदयाच्या वेळी कोणत्याही दिवशी प्रतिपदा नसल्यास प्रतिपदाला सुरुवात व समाप्ती झाल्यावर नवीन वर्ष साजरे केले जाते.


गुढी कशी उभारावी?


जिथे गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून पुसून घेतली जाते. त्या जागेवर स्वस्तिक आणि रांगोळी काढली जाते. गुढी उभारण्यासाठी उंच लाकडाची काठी घेतली जाते. काठीला पाण्याने धुवून स्वच्छ केले जाते. काठीवर कुंकू आणि हळद लावून पूजा केली जाते. काठीवर लावण्यासाठी तांबे, चांदी किंवा पितळ यांचा तांब्या किंवा कलश बसवून सजविला जातो. नंतर काठीला आंब्याची डहाळी, कडुलिंबाची डहाळी, फुलांचा हार आणि साखरेची गाठी लावली जाते. गुढीला साधारणतः भगव्या रंगाचा कपडा किंवा रेशीम लावला जातो. नंतर तयार केलेली गुढी उभी केली जाते. हिंदू धर्मानुसार गुढी हि घराच्या मुख्य दरवाज्यावर किंवा खिडकी जवळ उभी केली जाते.


संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी परत हळद-कुंकू, फुले, अक्षता, वाहून गुढी उतरवली जाते.


मला आशा आहे की, आपल्याला गुढीपाडवा माहिती मराठी |गुढीपाडवा माहिती इतिहास | Gudi Padwa 2021 याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना हि पोस्ट शेअर करायला विसरू नका. ☺️


आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻


➡️रंगपंचमी 2021 सणाची माहिती

➡️होळी सणाची माहिती

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने