Holi festival 2021 - होळी सणाची माहिती - Holi Information In Marathi

बघता बघता होळी हा सण आलेला आहे. सर्व लोकं भरपूर आनंदाने हा सण साजरा करतात. दिवाळी प्रमाणेच होळी हा सण देखिल दुसरा सर्वात मोठा सण आहे. यावर्षी 2021 ला होळी हा सण आपल्या हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला सूरू होतो आणि चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेला संपतो. 


Holi festival 2021 - होळी सणाची माहिती - Holi Information In Marathi

Holi festival 2021 - होळी सणाची माहिती - Holi Information In Marathi


होळी शुभ मुहूर्त 2021


पौर्णिमा तिथि प्रारंभ – 28 मार्च 2021 ला सकाळी 03.27 पासून


पौर्णिमा तिथि समाप्त – 29 मार्च 2021 ला दुपारी 12.17 पर्यंत.


होलिका दहन मुहूर्त 2021 – संध्याकाळी 6.37 पासून ते 8.56 पर्यंत


एकूण कालावधी- 2 तास 20 मिनिटे.


होळी का साजरी केली जाते?

होळीचे महत्व


सर्व लोकं भरपूर आनंदाने आणि मोठया थाटामाटाने  होळी हा सण साजरा करतात. यादिवशी लोकं आपली सर्व दुःख विसरून एकमेकांना रंग लावून आनंद व्यक्त करतात. आपल्याला तर माहितच असेल होळीचा सण हा वाईटावर विजय मिळविण्याचे प्रतीक मानला जातो आणि होलिका दहन नकारात्मकते पासून सकारात्मकतेच्या विजयाचे प्रतीक मानले जाते.


होळीचा इतिहास


इतिहासाच्या पुराणामध्ये कथेच्या अनुसार असे सांगितले आहे की, असूर हिरण्यकश्यप राज्याचा मुलगा प्रल्हाद होय. प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. पण हे सर्व हिरण्यकश्यपला अजिबात आवडत नसे. म्हणुन हिरण्यकश्यप राजाने आपल्या पुत्र प्रल्हाद ला विष्णूच्या भक्तीपासून दूर करायचे ठरवले. त्याने हे काम आपल्या बहिणीला म्हणजे होलिकाला दिले. होलिकाकडे वरदान होते. होलिकाला अग्नी जाळू शकत नव्हती. प्रल्हादला मारण्याच्या उद्देशाने होलिका आपल्या कडेवर प्रल्हाद ला घेऊन अग्नीमध्ये गेली. परंतु प्रल्हाद च्या भक्तीमुळे प्रल्हाद ला अग्नीमध्ये काहीच झाले नाही मात्र होलिका आगीत जळाली. तेव्हापासून दरवर्षी होळीच्या आठ दिवस आधी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पण होलिका दहन झाल्यावर अर्थात वाईटावर चांगल्याने विजय मिळवल्याचा आनंद साजरा केला जातो.


होळीचा सण आपल्याला जात, वर्ग यांच्यापेक्षा वर जाऊन प्रेम शांतीच्या रंगाला पसरवण्याचा संदेश देतो.


होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगवून जाते,

ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो…


आपणा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा...🙏🏻


➡️रंगपंचमी सणाची माहिती

➡️गुढीपाडवा सणाची माहिती आणि इतिहास


मला आशा आहे की, आपल्याला Holi festival 2021 - होळी सणाची माहिती - Holi Information In Marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना हि पोस्ट शेअर करायला विसरू नका. ☺️


आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने