रंगपंचमी 2021 सणाची माहिती - Rang Panchami Information In Marathi

रंगपंचमी [Rang Panchami] ज्याला आपण धुलीवंदन असे म्हणतो. या रंगपंचमी सणाची प्रत्येकाला आतुरता असते. हिंदू पंचांगानुसार, रंगपंचमीचा उत्सव कृष्ण पक्षाच्या दरम्यान फाल्गुन महिन्यात पाचव्या दिवशी येतो. या दिवशी प्रत्येक व्यक्ती आपले सर्व दुःख विसरून रंगपंचमीच्या सणामध्ये आनंदाने मोहून जातो. रंगपंचमी देखिल होळीप्रमाणे साजरी केली जाते. परंतू या दिवशी रंग खेळला जातो, गुलाल उडवला जातो. लोक रंगीबेरंगी पाण्याने खेळतात आणि मोठ्या आनंदात आणि उत्साहात हा सण साजरा करतात.


Rang Panchami Information In Marathi

रंगपंचमी 2021 सणाची माहिती - R Rang Panchami Information In Marathi


रंगपंचमी दिवस हा देशभरातील एक प्रमुख सण आहे. देशाच्या काही विशिष्ट भागात होळी साजरी करण्यासाठी रंगपंचमी हा दुसरा दिवस मानला जातो. हा सण गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक उत्साहात, आनंदाने आणि मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. महाराष्ट्रातील काही भागांमधे शिमगा नावाने हा उत्सव साजरा करतात. हिंदू धर्माच्या धार्मिक श्रद्धेनुसार लोकं होळीच्या पाच दिवसानंतर हा उत्सव साजरा करतात. रंगपंचमी या शब्दातील पंचमी म्हणजे पाच आणि रंग हा शब्द रंगाला दर्शवितो.


बऱ्याच ठिकाणी रंगपंचमी हि चौकात किंवा जेथे जास्त गर्दी असते तेथे रंग फेकून साजरी करतात. लोकं आपल्या कुटूंबासोबत, नातेवाईक आणि मित्रांसह रंग खेळतात. या दिवशी लोकं उत्साहाने गाणे लावून नाचतात. हा असा एकमेव सण आहे जेथे लहान मुलांपासून ते आजोबांपर्यंत सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश असतो.

रंगपंचमी का साजरी करतात?


हिंदू पौराणिक कथा आणि शास्त्रानुसार, रंगपंचमीचे असे महत्व आहे की, या दिवशी नकारात्मक गोष्टींचा नाश होतो आणि सकारात्मक गोष्टींमधे प्रवेश होतो. 


रंगपंचमीच्या संबंधित आणखी एक महत्त्व म्हणजे ते ब्रह्मांड निर्मितीस समर्थन देणारी पाच प्रमुख घटक म्हणजे पंच तत्व सक्रिय करण्यास मदत करते. या पाच प्रमुख घटकांमध्ये हवा, आकाश, पृथ्वी, पाणी आणि प्रकाश यांचा समावेश आहे. श्रद्धा आणि पौराणिक कथांनुसार मानवी शरीर देखील या पाच घटकांनी बनलेले आहे आणि या घटकांचा आवाहन मानवी जीवनात संतुलन पुनर्संचयित करण्यास मदत करते. हे मानवी आध्यात्मिक विकासाचे समर्थन देते.


रंगपंचमीचे रंग जणू,

एकमेकांच्या रंगात रंगतात,

असूनही वेगळे रंगांनी,

रंग स्वतःचा विसरूनी,

एकीचे महत्त्व सांगतात…


रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...🙏🏻


➡️होळी सणाची माहिती

➡️ गुढीपाडवा सणाची माहिती आणि इतिहास


मला आशा आहे की, आपल्याला रंगपंचमी 2021 सणाची संपूर्ण माहिती - Rang Panchami Information In Marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना हि पोस्ट शेअर करायला विसरू नका. ☺️


आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने