Share Market Information In Marathi मित्रांनो आजच्या युगामध्ये पैसा किती महत्त्वाचा आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. असा एकही व्यक्ति नसेल ज्याला पैसा नको आहे. प्रत्येकाच्या गरजा भागवण्यासाठी पैशाचे महत्त्व खूप आहे. आज सर्वजण पैसा कमावण्यासाठी धावत आहेत, पैसा कमावत आहेत. पण पैसा कमावणे आणि बचत करण्यापेक्षा पैसा कोठे गुंतवला पाहिजे हे आपल्याला माहिती नसते.
आजच्या काळात गुंतवणूकीचे बरेच प्रकार आहेत जसे की., बँकेतील मुदतठेवी, अल्पबचत योजना, जमीन-जुमला, व्यवसाय, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड इत्यादी..
तर आजच्या पोस्टमधे जगातील सर्वात मोठा गुंतवणूकिचा मार्ग असणार्या शेअर मार्केट (स्टॉक मार्केट) बद्दल म्हणजेच शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट मराठी माहिती | Share Market Information In Marathi याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत...
आपल्यापैकी बर्याच लोकांनी शेअर मार्केट बद्दल ऐकले असेल, काही लोकांना त्याबद्दल चांगलेच माहिती असेल, पण काही लोकांना माहिती नसेल. जर आपल्यालाही शेअर बाजाराबद्दल माहिती नसेल तर आजची हि पोस्ट आपल्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
शेअर मार्केट माहिती मराठी | Share Market Information In Marathi
शेअर मार्केट हा कोणत्याही विकसित देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असतो. ज्याप्रमाणे रस्ते, वाहतूक, वीज, पाणी हे एखाद्या देश, गाव किंवा शहराच्या विकासासाठी सर्वात महत्वाचे आहे, त्याच प्रकारे देशाच्या उद्योगांच्या विकासासाठी शेअर मार्केट आवश्यक आहे.
कदाचित मित्रांनो तुम्हाला माहितच असेल, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी वॉरेन बफे आणि राकेश झुनझुनवाला देखील शेअर बाजारात गुंतवणूक करून अब्जाधीश झाले आहेत.
शेअर मार्केट बेसिक माहिती - Share Market Basic Information In Marathi
शेअर मार्केट म्हणजे काय? What Is Share Market In Marathi
शेअर मार्केट ज्याला आपण स्टॉक मार्केट देखील म्हणतो. या शेअर मार्केटमध्ये कंपन्यांचे शेअर खरेदी-विक्री केले जातात.
शेअर बाजाराच्या भाषेत "शेअर" चा अर्थ म्हणजे "भाग".
जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे शेअर (भाग) खरेदी करतो तेव्हा आपण त्या कंपनीत भागधारक होतो म्हणजे त्या कंपनीचे काही टक्के मालक बनतो. समजा आपण ज्या कंपनीचे शेअर खरेदी केले आणि त्या कंपनीला भविष्यात फायदा झाला तर नक्कीच आपला नफा होतो आणि जर नुकसान झाले तर आपला देखील तोटा होतो.
पण ज्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये पैसे कमावणे सोपे असते तितकेच पैसे गमावणे देखील सोपे असते, कारण या शेअर बाजारात प्रत्येक क्षणात चढ-उतार होत असतो.
आपल्या भारतात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) हे दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत आणि संपूर्ण देशात 27 क्षेत्रीय स्टॉक एक्सचेंज आहेत.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे १८७५ मध्ये कार्यान्वित झाले तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज हे १९९२ मध्ये स्थापन झाले व १९९४ ला त्यामध्ये ट्रेडिंगला सुरुवात झाली.
या शेअर मार्केट (stock market) चे सर्व नियंत्रण सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड (SEBI) च्या ताब्यात असते.
NSE / BSE मध्ये कोणतीही कंपनी रजिस्टर कशी होते.
कोणत्याही कंपनीला शेअर बाजारांमध्ये रजिस्टर होण्यासाठी शेअर बाजारासोबत लेखी करार करावा लागतो. यानंतर कंपनी आपले सर्व आवश्यक कागदपत्रे, भांडवली सेबीकडे सादर करतो. सेबीच्या तपासणीत कंपनीचे सर्व कागदपत्रे माहिती योग्य असल्यास आणि सर्व अटी पूर्ण होताच कंपनीला NSE / BSE मध्ये रजिस्टर केले जाते.
सेबीच्या परवानगीनंतरच एखादी कंपनी आपला प्रारंभिक IPO शेअर बाजारात सूचीबद्ध करुन जारी करू शकते.
रजिस्टर केल्यानंतर कंपनी वेळोवेळी आपली सर्व माहिती शेअर बाजाराला देत असते. ही माहिती गुंतवणूकदारांना महत्त्वाची असते.
सध्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये अंदाजे 5000 कंपन्या लिस्टेड आहेत तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज मध्ये अंदाजे 1500 कंपन्या लिस्टेड आहेत.
शेअर मार्केटचे प्रकार - Types Of Share Market In Marathi
शेअर मार्केटच्या प्रकारांना दोन प्रकारे वर्गीकृत केले आहे.
1. प्राथमिक मार्केट - Primary Market
इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) च्या प्रक्रियेद्वारे एखादी कंपनी पहिल्यांदा प्राथमिक मार्केट मध्ये शेअर्स जारी करते. हे शेअर्स सार्वजनिक किंवा खाजगी प्लेसमेंटद्वारे
केले जाते. जेव्हा 200 हून अधिक लोकांना शेअर्स वाटप केले जातात तेव्हा ते सार्वजनिक प्लेसमेंट असते आणि जेव्हा 200 पेक्षा कमी वाटप असतो तेव्हा ते एका व्यक्तीसाठी केले जाते ज्याला खाजगी प्लेसमेंट असते या प्रकाराला प्राथमिक मार्केट म्हणतात.
द्वितीय मार्केट - Secondary Market
प्राथमिक मार्केटच्या IPO द्वारे योग्य शेअर्सचे वाटप झाल्यानंतर त्यांचे व्यवहार स्टॉक एक्सचेंजद्वारे द्वितीय मार्केटकडे जाते. हे द्वितीय मार्केट OTC आणि एक्सचेंज ट्रेडेड मार्केट च्या मदतीने संचालित होते. OTC मार्केट अनौपचारिक बाजारपेठ आहे. आज NSE आणि BSE हे असे दोन स्टॉक एक्सचेंज आहेत ज्यात अनेक शेअर्सचे व्यवहार केले जातात.
कंपन्या शेअर्स कश्या जारी करतात?
सर्वप्रथम, कंपन्या त्यांचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करतात आणि इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) जारी करतात. त्यानंतर त्या कंपन्या त्यांचे शेअर्स स्वत: ठरवलेल्या किंमतीवर लोकांकडे देतात. नंतर गुंतवणूकदारांकडून ते शेअर्स विकत घेतले जातात.
शेअर खरेदी करणे म्हणजे काय?
समजा आपण NSE मध्ये रजिस्टर केलेल्या एखाद्या कंपनीचे 100 शेअर्स खरेदी केले तर आपण त्या कंपनीच्या खरेदी केलेल्या शेअर्स चे मालक बनतो. आणि जेव्हा आपल्याला ते खरेदी केलेले शेअर्स विकायचे आहेत तेव्हा आपण ते विकू शकतो.
भूतकाळात शेअर्स हे भौतिक सर्टिफिकेटच्या स्वरुपात खरीदी-विक्री होत होते पण आता या डीजीटल युगात हे सर्व काम शेअर बाजारात आभासी स्वरुपात आभासी मंचावर होते.
शेअर्स (स्टॉक) चे दर कमी जास्त का होतात?
कंपन्या IPO जारी करताना शेअर्स ची किंमत ठरवतात. पण IPO पूर्ण झाल्यावर बाजारातील मागणी व पुरवठ्यावर अवलंबून शेअर्सचे मूल्य बदलत असते.
शेअर बाजारामधील दर कमी आणि जास्त होण्यामागील मुख्य कारण म्हणजे मागणी आणि पुरवठा.
एखाद्या कंपनीचे मूल्यांकन कमी-जास्त होणे, कामगिरी मध्ये फरक पडणे, मार्केट ऑर्डर कमी-जास्त होणे, नफ्यात वाढ / घट यांसारख्या माहितीच्या आधारे शेअर्स (स्टॉक) चे दर कमी जास्त होत असतात.
सेन्सेक्स (Sensex) म्हणजे काय?
सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा निर्देशांक आहे आणि सेन्सेक्स BSE मध्ये सूचीबद्ध असलेल्या टॉप 30 कंपन्यांच्या बाजार भांडवलाच्या आधारे निश्चित केले जाते.
जर सेन्सेक्स वाढला तर त्याचा अर्थ असा आहे की BSE मध्ये नोंदणीकृत बहुतांश कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे.
आणि त्याचप्रमाणे सेन्सेक्स कमी झाल्यास त्याचा अर्थ बहुतांश कंपन्यांनी खराब कामगिरी केली आहे.
निफ्टी (Nifty) म्हणजे काय?
निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निर्देशांक आहे आणि निफ्टी NSE मध्ये सूचीबद्ध असलेल्या टॉप 50 कंपन्यांच्या बाजार भांडवलाच्या आधारे निश्चित केले जाते.
जर निफ्टी वाढला तर त्याचा अर्थ असा आहे की NSE मध्ये नोंदणीकृत बहुतांश कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे.
आणि त्याचप्रमाणे निफ्टी कमी झाल्यास त्याचा अर्थ बहुतांश कंपन्यांनी खराब कामगिरी केली आहे.
शेअर चे प्रकार - Types of Share in Marathi
शेअर मुख्यतः तीन प्रकारचे असतात.
1. Equity Share (इक्विटी शेअर)
जेव्हा स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असलेली एखादी कंपनी आपले शेअर्स जारी करते तेव्हा सर्वात जास्त शेअर्स कंपनीच्या मालकाकडे असतात आणि काही शेअर्स गुंतवणूकदारांसाठी असतात जे आपण स्टॉक मार्केटद्वारे खरेदी करतो. तर याच समभागांना इक्विटी शेअर असे म्हणतात.
हे शेअर्स सामान्य प्रकारचे असतात. या शेअर्सची किंमत वाढली तर इक्विटी शेअरधारकास फायदा होतो आणि जर ते खाली गेले तर तोटा होतो.
इतर समभागांच्या तुलनेत इक्विटी शेअर्सची सर्वाधिक विक्री केली जाते कारण हे शेअर्स जवळपास सर्व कंपन्यांद्वारा दिले जातात.
प्रत्येकजण इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करु शकतो कारण या शेअर्सची किंमत खूपच कमी असते. स्टॉक एक्सचेंजमध्ये सर्वाधिक लोक या इक्विटी शेअर्सवर गुंतवणूक करतात.
2. Preference Share (प्रेफरन्स शेअर)
शेअर बाजारामध्ये इक्विटी शेअर्स नंतर प्रेफरन्स शेअर्स ला ओळखले जाते. प्रेफरन्स शेअर धारकाला कधीही कंपनीच्या बैठकीत वोटिंग करता येत नाही कारण प्रेफरन्स शेअर होल्डर ला याचा अधिकार नसतो.
प्रेफरन्स शेअर्स बद्दल बोललो तर जेव्हा एखाद्या कंपनीला त्वरित पैशांची आवश्यकता असेल किंवा कंपनीला असे वाटते की येणाऱ्या काळात सर्व काही ठीक होईल तेव्हा ती कंपनी प्रेफरन्स शेअर्स जारी करते.
या शेअर्स मध्ये फिक्स्ड रिटर्न मिळतात. या शेअर्सची किंमत खाली जावो की वर काही फरक पडत नाही.
प्रेफरन्स शेअर मध्ये जेव्हा कंपनी इच्छित असेल तेव्हा गुंतवणूकदाराने खरेदी केलेले शेअर्स कंपनी गुंतवणूकदाराला मूळ रक्कम देऊन परत घेऊ शकते.
प्रत्येकजण प्रेफरन्स शेअर्समध्ये गुंतवणूक करु शकत नाही कारण या शेअर्सची किंमत खूपच जास्त असते. या शेअर्सला विशेषत: मोठे भांडवलदार वर्ग ज्यांच्याकडे खूप जास्त पैसा आहे ते किंवा व्हेंचर कॅपिटल फर्म वाले खरेदी करू शकतात.
3. DVR Share (डी वी आर शेअर)
DVR चा फूल फॉर्म आहे - Differential Voting Rights.
DVR शेअर धारकाला इक्विटी शेअर्ससारखे फायदे मिळतात पण त्यांना वोटिंगचे हक्क मिळत नाहीत.
असे नाही की DVR शेअर धारक वोटिंग करू शकत नाही, DVR धारक वोटिंग करू शकतो परंतु त्याच्या वोटिंगचे हक्क निश्चित असतात. जेथे त्याला वोटिंगचा हक्क दिला जाईल, तेथेच तो वोटिंग करू शकतो.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक (ट्रेडिंग) कशी करावी? How To Invest Share Market In Marathi
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (ट्रेडिंग) करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला डिमॅट व ट्रेडिंग खाते उघडावे लागेल.
डिमॅट खाते (Demat Account) काय आहे?
ज्याप्रमाणे आपण पैसा जमा करण्यासाठी बँक खाते उघडतो त्याचप्रमाणे शेअर्स ठेवण्यासाठी डिमॅट खाते उघडावे लागते. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आपल्याकडे आपले डीमॅट खाते असणे खूप महत्वाचे आहे.
या डिमॅट खात्यात आपले शेअर्स इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये स्टोर केले जातात.
ट्रेडिंग खाते (Trading Account) काय आहे?
ट्रेडिंग खात्याचा उपयोग शेअर मार्केटमध्ये शेअर्स खरेदी आणि विक्री करण्यासाठी केला जातो.
आपण हे खाते कोणत्याही चांगल्या ब्रोकरसह उघडू शकतो आणि ऑनलाइन सुविधेमुळे आपण या खात्याच्या मदतीने कधीही शेअर्सची खरेदी विक्री करू शकतो.
डिमॅट खाते कसे उघडावे?
आपल्याला डीमॅट आणि ट्रेडिंग खाते उडवण्यासाठी या महत्त्वाच्या डॉक्युमेंट्स चि आवश्यकता लागेल.
PAN Card
Address Proof
Income Proof
Bank Account / Cancel Cheque
2 Passport Size Photo
ट्रेडिंग आणि डिमॅट खाते उघडण्यासाठी आपल्याला बेस्ट डीमॅट खात्यात आपले खाते उघडणे आवश्यक आहे. आपण हे खाते ब्रोकरच्या मदतीने किंवा आपल्या मोबाईलवर आपण स्वतः उघडू शकतो. डिमॅट खाते उघडण्याचे बरेच प्रकार आहेत. पण आपण या Zerodha आणि Upstox मध्ये खाते उघडू शकता. यात आपण लवकर, सहजपणे खाते उघडू शकता आणि हे अतिशय सुरक्षित आहेत. खाते उघडण्याची लिंक खाली दिली आहे.
Zerodha
Upstox
डिमॅट खाते उघडल्यानंतर डिमॅट खात्याला आपल्या बँक खात्याशी लिंक करावे लागेल. त्यानंतर काही पैसे आपल्या बँक खात्यातून आपल्या डिमॅट खात्यामध्ये हस्तांतरित करावे लागतील. त्यानंतर आपण कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकतो आणि जेव्हा इच्छित तेव्हा विकू शकतो.
शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचे प्रकार - Trading Types In Marathi
शेअर मार्केटमध्ये चार प्रकारे ट्रेडिंग केली जाते.
1. इंट्रा डे ट्रेडिंग - What Is Intraday trading In marathi
इंट्रा डे ट्रेडिंग मध्ये एका दिवसात शेअर खरेदी करून विक्री केला जातो त्याला intraday trading म्हणतात.
या इंट्रा डे ट्रेडिंग ला MIS (Margin Intra day Square off) असे देखील म्हणतात.
म्हणजेच जर आपण सकाळी शेअर खरेदी केला तर आपल्याला तो शेअर दुपारच्या 3:30 पर्यंत विकावा लागतो. आणि जर आपण तो शेअर 3:30 पर्यंत नाही विकला तर आपल्याला ब्रोकरला charges द्यावे लागतील.
या ट्रेडिंग मध्ये आपण सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत ट्रेडिंग करू शकतो कारण शेअर मार्केट चालू आणि बंद होण्याचा हा वेळ आहे.
या Intraday Trading ला सर्वात जास्त धोका असलेला trade मानला जातो.
2. स्कैल्पर ट्रेडिंग - What Is Scalper Trading In marathi
स्कैल्पर ट्रेडिंग ही एक अशी पद्धत आहे, ज्यात शेअर खरेदी करून 5-10 मिनिटांत विकला जातो.
कोणताही कायदा किंवा आर्थिक जगाच्या कोणत्याही मोठ्या बातमीच्या आगमनानंतर स्कॅल्पर ट्रेडिंग केले जाते.
या ट्रेडिंग मध्ये शेअर मार्केटचे जुने दिग्गज ग्राहक ट्रेडिंग करतात. यात सर्वाधिक धोका असतो.
3. शार्ट टर्म (स्विंग) ट्रेडिंग - What Is Swing Trading In Marathi
स्विंग ट्रेडिंग ला शार्ट टर्म ट्रेडिंग असे म्हणतात. या ट्रेडिंग मध्ये थोड्या काळासाठी शेअर्स चि खरेदी विक्री केली जाते. शेअर खरेदी केल्यानंतर तो शेअर आपल्या डीमैट खात्यात ट्रान्सफर केला जातो.
स्विंग ट्रेडिंगसाठी ब्रोकर कोणतेही मार्जिन प्रदान करत नाही.
आपल्या गुंतवणूकीच्या उद्दीष्टानुसार जर आपल्याला शेअर बाजारात 5-10% नफ्याच्या अपेक्षेने शेअर्स खरेदी विक्री करायचे असतील तर आपण स्विंग ट्रेडिंगद्वारे ट्रेडिंग करू शकता.
4. लॉंग टर्म ट्रेडिंग - What Is Long Term Treding In Marathi
जेव्हा आपण एखादा स्टॉक विकत घेतो आणि दीर्घ कालावधीसाठी ठेवतो, तेव्हा त्याला लॉंग टर्म ट्रेडिंग असे म्हटले जाते. हे ट्रेडिंग 6 महिन्यांपासून काही वर्षांच्या कालावधीसाठी असते.
या ट्रेडिंग मध्ये आपण एखादा शेअर एक, तीन किंवा पाच वर्षांसाठी खरेदी-विक्री करू शकतो. या ट्रेडिंग मध्ये आपल्याला चांगला नफा मिळू शकतो. आतापर्यंतचे सर्व मोठे गुंतवणूकदार या ट्रेडिंग द्वारे गुंतवणूक करतात.
शेअर मार्केटमध्ये शेअर्स कधी खरेदी करतात?
शेअर बाजार म्हणजे काय याची तुम्हाला थोडीशी कल्पना आली असेलच. चला शेअर शेअर मार्केटमध्ये शेअर्स कधी खरेदी करतात? याबद्दल जाणून घेऊया? शेअर बाजारामध्ये शेअर्स खरेदी करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम शेअर मार्केटचे ज्ञान, अनुभव असणे आवश्यक आहे. ज्ञान असेल तरच आपण केलेल्या गुंतवणूकीचा फायदा आपल्याला होईल.
शेअर मार्केट टिप्स - Share market tips in marathi
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टींबद्दल जाणून घेतले पाहीजे?
शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्याला शेअर बाजाराबद्दल अधिक माहिती घेणे आवश्यक आहे, अन्यथा या बाजारात बरेच धोके आहेत. बर्याचदा असे घडते की काही कंपन्या फसव्या असतात आणि आपण त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करून आपले पैसे गुंतवलेले असतात तर अशा कंपन्या प्रत्येकाचे पैसे घेऊन पळून जातात. म्हणून, कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी तपशील नीट तपासून पाहा. एखाद्या चांगल्या तज्ञाकडून चांगली माहिती घेतल्यानंतर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करा.
पैसे गुंतवण्यायापुर्वी सर्वप्रथम आपल्याला शेअर मार्केटमध्ये कोणत्या कंपनीचा वाटा वाढला किंवा घसरला आहे हे जाणून घ्यावे लागेल. जाणून घेण्यासाठी वर्तमानपत्रे वाचू शकतो, व्यवसायातील न्यूज चॅनेल पाहू शकता किंवा इंटरनेटची मदत घेऊ शकतो.
जर आपण प्रथमच शेअर बाजारात गुंतवणूक करणार असाल तर सुरुवातीच्या काळात आपल्याला शेअर बाजारामध्ये फारच कमी गुंतवणूक करायला पाहिजे आणि जेव्हा आपण एखादा तज्ज्ञ व्हाल आणि आपल्याला अनुभव आल्यावर आपण आपली गुंतवणूक हळूहळू वाढवू शकता.
स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्याला स्टॉक्सचे फंडामेंटल अॅनालिसिस, संशोधन करणे माहित असले पाहिजे.
Long-Term Goals set: जर आपल्याला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर आपणास आपले लक्ष्य निश्चित करावे लागेल. म्हणजेच आपल्याला Long-Term Goals set चा विचार करावा लागेल, असं केल्याने आपल्याला त्यात चांगला नफा मिळू शकतो.
अशाप्रकारे, आपण आपली जोखीम घेण्याची क्षमता पाहून शेअर बाजारात उतरू शकता.
बहुतेक लोकांचे मत आहे की शेअर बाजारात फक्त शेअर खरेदी विक्री केले जातात पण तसे नाही.
शेअर बाजारात शेअर्सप्रमाणेच इतर बर्याच सिक्युरिटीज स्टॉक मार्केटमध्ये विकल्या जातात.
बॉण्ड्स / डेबेंचर्स - (Bond / Debentures):
हे एका प्रकारे लोनसारखे असते. जेव्हा कंपनीला एखाद्या प्रकल्पासाठी पैशांची आवश्यकता असते, तेव्हा ती एकतर बँकेकडून कर्ज घेऊ शकते किंवा लोकांकडून (Investors) कर्ज घेऊ शकते तेव्हा ती कंपनी Bond | Debentures जारी करते.
कंपनीचे Bond | Debentures निश्चित दराने व्याज देतात आणि बाँडची मुदत संपल्यानंतर ते रोख्यांच्या बदल्यात परतफेड करतात.
म्युच्युअल फंड (Mutual Funds):
Mutual Funds एका प्रकारचे शेअर्स आणि बॉन्ड मध्ये इनडायरेक्ट इनव्हेस्टमेंट असते.
म्युच्युअल फंड हे एक प्रकारचे संस्था किंवा ट्रस्ट असते. या म्युच्युअल फंड मध्ये इन्वेस्ट केलेली रक्कम म्युच्युअल फंडचे प्रोफेशनल मैनेजर त्यांच्या ज्ञान, अनुभव, समजूतदारपणा आणि विश्लेषणाच्या आधारे पैसा विविध शेअर्स आणि इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात.
म्युच्युअल फंडमध्ये पैसा गुंतवण्याचा असा फायदा आहे की, आपल्याला शेअर मार्केट बद्दल ज्ञान नसले तरीही चालते कारण म्युच्युअल फंडचे प्रोफेशनल मैनेजर त्यांच्या ज्ञान, अनुभवावरून आपला पैसा शेअर्स मध्ये गुंतवत असतात. त्या बदल्यात ते आपल्याकडून काही शुल्क आकारतात.
SIP (एसआईपी):
SIP चा फूल फॉर्म आहे - Systematic Investment Plan.
SIP हा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा एकमेव मार्ग आहे. यामध्ये दरमहा एक निश्चित रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतविली जाते.
गुंतवणूकदाराचे बँक खाते SIP सोबत जोडलेले असते ज्यामुळे प्रत्येक महिन्यात एक निश्चित रक्कम बँक खात्यातून म्युच्युअल फंडामध्ये ट्रान्सफर केली जाते आणि त्या रकमेच्या म्युच्युअल फंडाचे युनिट्स गुंतवणूकदाराच्या खात्यात येतात.
SIP साधे आणि ऑटोमॅटिक असल्याने आजकाल खूप लोकप्रिय झाले आहे.
डेरिव्हेटिव्ह्स (Derivatives):
डेरिव्हेटिव्ह्स चा अर्थ भविष्यातील व्यवहार आज निश्चित करणे. डेरिव्हेटिव्ह्स ला स्टॉक मार्केट मधील Options आणि Futures द्वारा परिणाम केले जाते.
Futures ट्रेडिंग अंतर्गत भविष्यात होणारे व्यवहार एका ठराविक किंमतीवर निश्चित केले जातात. यामध्ये डिलिव्हरी दिली जात नाही आणि किंमतीच्या फरकाच्या आधारे सेटलमेंट केली जाते. नंतर सर्व नियम डोळ्यासमोर ठेवून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला जातो.
शेअर मार्केट कसे शिकावे?
शेअर मार्केट शिकण्यासाठी अशा काही शेअर बाजाराच्या टिप्स बद्दल जाणून घेऊया ज्या सर्व सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना नक्कीच माहित असल्या पाहिजेत.
पुस्तके वाचा. पुस्तके वाचणे कधीच चुकीचे नसते, अशी अनेक पुस्तके आहेत जी नवशिक्यांसाठी आणि तज्ञांसाठी उपयुक्त आहेत.
शेअर बाजाराविषयी लेखकांच्या बहुलतेने लिहिलेले बरेच लेख आहेत. खात्रीने ते लेख वाचा.
संशोधन करा: संशोधनाचे नाव ऐकल्यावर बरेच लोक त्यातून पळून जातात. पण शेअर बाजाराच्या संदर्भात हे अजिबात करू नये. कारण हे फक्त संशोधन आहे जे आपणास शेअर बाजारामध्ये यशस्वी करते.
बरेच तज्ञ सापडतील जे आपल्याला शेअर मार्केट बद्दल मार्गदर्शन, ज्ञान देत आहेत. तसे, त्याचे काही शब्द कदाचित बरोबर असतील, पण माझा सल्ला आहे की आपण आपले संशोधन स्वतः करावे.
शेअर बाजाराला समजून घेण्यासाठी आपण गुंतवणूकदारांनी आयोजित केलेल्या ऑनलाइन कोर्स किंवा सेमिनार मध्ये भाग घेऊ शकता. कोर्स किंवा सेमिनार मध्ये इंट्राडे ट्रेडिंग, सेफ स्टॉक आयडेंटिफाइड यांसारख्या गोष्टी शिकविल्या जातात.
मला आशा आहे की, मित्रांनो तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट मराठी माहिती | Share Market Information In Marathi हा मराठी लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा तसेच तुम्हाला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता आणि तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻