व्हॉट्सॲप चे नवीन फिचर आता व्हॉट्सअ‍ॅपवरुन सुरक्षित पैसे पाठवता येणार... Whatsapp new payment feature in marathi


मित्रांनो आपण ज्या प्रकारे फोन पे, गूगल पे आणि Paytm वापरून पैसे पाठवतो त्याच प्रकारे आपण आता व्हॉट्सअ‍ॅपवरुन लोकांना पैसे पाठवू शकतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पेमेंट करण्याची हि एक सुरक्षित पद्धत असून, पैसे पाठवणे एकाद्या मेसेज पाठविण्याइतकेच सोपे आहे. तर आजच्या पोस्टमधे आपण व्हॉट्सअ‍ॅपवरुन पैसे कसे पाठवता येतील या बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया...

व्हॉट्सअ‍ॅपवरुन पैसे कसे पाठवावे?

व्हॉट्सॲप चे नवीन फिचर आता व्हॉट्सअ‍ॅपवरुन सुरक्षित पैसे पाठवता येणार... Whatsapp new payment feature in marathi


मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की, व्हॉट्सअ‍ॅप हे प्रत्येकाच्या मोबाईल फोन मध्ये इंस्टॉल आहे. माझ्या मते तर असा एकही व्यक्ति नाही की त्याच्या मोबाईल फोन मध्ये व्हॉट्सअ‍ॅप इंस्टॉल नाही. आपण व्हॉट्सअ‍ॅप द्वारा फोटो, विडियो, कॉन्टॅक्ट, PDF फाईल, डॉक्युमेंट इ. हे सर्व पाठवू शकतो.


पण मित्रांनो आता व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट हे फिचर लाँच केले आहे. ज्याच्या मदतीने आपण व्हॉट्सअ‍ॅपवर आपले बँक खाते जोडून व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या लोकांना पैसे पाठवू शकतो किंवा आपण व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या लोकांपासून पैसे घेऊ शकतो.

टीप:-  मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवरुन पैसे पाठवायचे असतील तर आपल्याकडे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे. आणि आपण बँक ला जे मोबाईल नंबर लिंक केला आहे त्या नंबरचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट असणे गरजेचे आहे. तरच आपण व्हॉट्सअ‍ॅपवरुन पैसे पाठवू शकतो.


➡️फोन पे काय आहे? फोन पे कसे वापरावे?

➡️गूगल पे म्हणजे काय? गूगल पे कसे वापरावे? 


व्हॉट्सअ‍ॅपवरुन पैसे कसे पाठवावे?


सर्वप्रथम आपण आपले व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करा.


अपडेट केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप उघडा. >> व्हॉट्सअॅप उघडल्यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या 3 बिंदू वर क्लिक करा >>


नंतर payment चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा >>


व्हॉट्सअ‍ॅपवरुन पैसे कसे पाठवावे?


Payment वर क्लिक केल्यानंतर Add Payment Method वर क्लिक करा. >> नंतर Accept And Continue वर क्लिक करा >>


आता आपली जी बँक आहे ती निवडा >> 

whatsapp payment Bank

बँक निवडल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर Verify करण्यासाठी आपल्या नंबरवर एक एसएमएस पाठवला जाईल. 


टीप - आता बँक अकाऊंटशी लिंक्ड असलेलं सिमकार्ड तुमच्या मोबाईलमध्ये अ‍ॅक्टिव्हेट असेल, आणि व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट त्याच नंबरशी लिंक्ड असेल, याची खात्री करा. आणि ते सिम कार्ड निवडा. 

नंबर निवडल्यानंतर आपल्या डेबिट कार्डचे शेवटचे चार नंबर टाका >> नंतर पुढे UPI PIN तयार करावा लागेल. हा UPI PIN आपल्याला पैसे पाठवण्यासाठी आवश्यक आहे. 


हे सर्व झाल्यानंतर आपण व्हॉट्सअ‍ॅपवरील पेमेंट ट्रान्सफर हे फिचर वापरु शकता.


Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल?


●  तुमच्या काँटॅक्ट लिस्टमधील ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत, त्याचे चॅट ओपन करुन आपण जेथे मॅसेज टाइप करतो तेथे Attachment 📎 आयकॉन वर क्लिक करून पेमेंट ऑप्शनवर जा.

Whatsapp payment

●  ज्या बँक अकाऊंटमधून पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, ते सिलेक्ट करा


● आता रक्कम टाकून ट्रांझॅक्शन पूर्ण करण्यासाठी तुमचा UPI पिन टाका.

Whatsapp payment

● पिन टाकल्यावर कन्फर्मेशन मेसेजसोबतच तुमचे ट्रांझॅक्शन सक्सेसफुल होईल.


व्हॉट्सअ‍ॅप द्वारे आपण दोन प्रकारे पैसे पाठवू शकतो. 


1. ज्या यूजर्स ने व्हॉट्सअ‍ॅप मध्ये बँक लिंक केली आहे त्या यूजर्स ला पैसे पाठवू शकतो.


2. UPI ID द्वारे पैसे पाठवू शकतो. 


मला आशा आहे की, आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवरुन पैसे कसे पाठवावे? हे समजले असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना किंवा फेसबुक, आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.


आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.  🙏🏻


➡️व्हॉट्सॲप मध्ये नंबर सेव्ह न करता पाठवू शकता मेसेज! जाणून घ्या संपूर्ण माहिती

➡️दुसर्‍यांचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज तुमच्या मोबाईल मध्ये वाचा
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने