मोबाईल गरम का होतो? मोबाईल गरम होण्याची कारणे

Smartphone heating problem solution in marathi मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की, आजच्या काळात स्मार्टफोन हा सर्वाधिक वापरला जातो. दिवसेंदिवस स्मार्टफोन चि मागणी वाढत चालली आहे. अशातच मोबाईल गरम होणे हे जवळपास प्रत्येकाच्या समस्येचे कारण बनले आहे. काही दिवस मोबाईल वापरल्यानंतर बर्‍याच लोकांचे मोबाईल गरम होतात. जर आपलाही मोबाईल गरम होत आहे तर ही पोस्ट आपल्यासाठी आहे. या पोस्ट मध्ये मोबाईल गरम का होतो? मोबाईल गरम होण्याची कारणे आणि मोबाईल गरम होण्याच्या समस्येपासून कसे थांबावे? याबद्दल पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.


मोबाईल गरम का होतो? मोबाईल गरम होण्याची कारणे

जर आपला मोबाईल खूपच जास्त गरम होत असेल तर तो डिवाइस ला डैमेज करू शकतो आणि त्याचा परफॉरमेंस पण कमी होऊ शकतो. मदर बोर्ड खराब होऊ शकतो किंवा फोन फुटू पण शकतो.

मोबाईल गरम का होतो? मोबाईल गरम होण्याची कारणे

जगातील सर्व इलेक्ट्रॉनिक डिवाइस गरम होतात. असे एकही इलेक्ट्रॉनिक डिवाइस नाही की ते गरम होत नाही. जसे मोबाइल, टीवी, फैन, फ्रीज़, सर्व इलेक्ट्रॉनिक डिवाइस गरम होतात.

या कारणांमुळे आपला मोबाईल गरम होतो.

1. इंटरनेट - मोबाइल फोन गरम होण्याचे पहिले कारण म्हणजे आपण आपल्या फोनमध्ये वापरत असलेले इंटरनेट, जर आपल्या इंटरनेट चि स्पीड कमी असेल तर आपला फोन गरम होतो. कारण आपण बर्‍याचदा पाहिले असेल की जेव्हा आपल्या फोन चे इंटरनेट कनेक्शन बंद असते तेव्हा फोन गरम होत नाही. जसे आपण इंटरनेट कनेक्शन चालू करू आणि आपल्या इंटरनेट चि स्पीड कमी असेल तर अशा इंटरनेट कनेक्शनमध्ये फोन गरम होऊ शकतो.


2. गेम्स खेळणे - मित्रांनो जर आपण खूप जास्त प्रमाणात गेम्स खेळत असाल तर आपल्या मोबाईल फोनची रॅम, ग्राफिक कार्ड, प्रोसेसर आणि इंटरनेट हे एकाच वेळी खूप वेगाने कार्य करत असतात आणि यामुळे आपला फोन गरम होऊ लागतो.


3. बैकग्राउंड अ‍ॅप्स - मित्रांनो आपण सर्वच आपल्या मोबाईल फोन मध्ये मल्टीटास्किंग करत असतो. मोबाईल मध्ये बरेच application आपण वापरत असतो. तर हेच application बैकग्राउंड मध्ये रनिंग करत असतात आणि आपल्या फोन चि बॅटरी वापरत असतात यामुळे फोन गरम होऊ लागतो. किंवा आपण हे देखील पाहिले असेल की बरेच application बैकग्राउंड मध्ये आपला इंटरनेट डाटा वापरत असतात तर साहजिकच आहे की आपला मोबाइल फोन गरम होणार.


4. मोबाईल ब्राइटनेस - बरेच वापरकर्ते मोबाईलची ब्राइटनेस पूर्ण ठेवतात, यामुळे मोबाईल च्या बॅटरी चा जास्त वापर होतो आणि फोनही गरम होतो, म्हणून गरजेनुसार ब्राइटनेस वाढवावी.


5. आपण जर फोन उन्हात वापरत असाल तरीही आपला फोन गरम होऊ लागतो.


तर ही काही कारणे होती ज्यामुळे आपला मोबाईल फोन गरम होऊ लागतो. आपला फोन नवीन जरी असला तरी तो गरम होऊ शकतो जर आपण वर दिलेली कारणे जास्त प्रमाणात वापरत असाल तर.


हे पण वाचा ➡️स्मार्टफोन च्या बॅटरी चे आयुष्य कसे वाढवावे?


आपल्या फोनला गरम होण्यापासून कसे थांबवावे?

1. फालतू (अनावश्यक) फंक्शन बंद करून टाका.


2. काम झाल्यावर आपला इंटरनेट डाटा बंद करत जा. जेव्हा पासून जिओ 4G आला आहे तेव्हा पासून आपण इंटरनेट कनेक्शन बंद करायचे विसरूनच गेलो आहे.


3. आपल्या फोनचे GPS लोकेशन, वायफाय, ब्लूटूथ तपासात जा आणि चालू असेल तर बंद करत जा. ज्या वेळेस याचे आपल्याला काम आहे त्याच वेळेस हे चालू करत जा. ही फंक्शन्स सतत चालू ठेवल्याने बॅटरीवर दबाव येतो आणि फोन गरम होतो.


4. एकाच वेळी अनेक Application बैकग्राउंड मध्ये ठेऊ नका. फोनची रॅम वेळोवेळी क्लीन करत रहावी.


5. फोन मधील applications वेळोवेळी अपडेट करत रहावे. यामुळे अॅप्स चि Bugs फ्री राहते. तसेच फोनचे सॉफ्टवेयर अपडेट केल्याने पण फोन गरम होण्याची समस्या दूर होऊ शकते.


6. जर आपला फोन नेहमीच कव्हरमध्ये असेल तर थोडावेळ त्याची cover काढून टाकावी यामुळे फोन चि उष्णता बाहेर पडण्यास मदत होईल.


7. आपल्या फोन सोबत येणार्‍या चार्जर ने नेहमी आपला फोन चार्ज करा. किंवा original चार्जर वापरा. आपल्याकडे चार्जर नसेल तर original चार्जर विकत घ्या. कमी किमतीचे चार्जर विकत घेऊन पैसे वाचवू नका. कारण प्रत्येक चार्जर चा स्वतःचा एक आउटपुट असतो. आणि जेव्हा आपण कमी आउटपुट किंवा जास्त आउटपुट वाला चार्जर वापरुन आपला फोन चार्ज करतो तेव्हा आपल्या फोनची बॅटरी खराब होण्यास सुरवात होते.
इतर कोणतेही फोन चार्जर वापरू नका आणि इतर कोणालाही आपला चार्जर देऊ नका.


मला आशा आहे की, आपल्याला मोबाईल गरम का होतो? मोबाईल गरम होण्याची कारणे Smartphone heating problem solution in marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला स्मार्टफोन गरम होण्याच्या समस्येपासून कसे थांबावे? हे समजलेच असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना किंवा फेसबुक आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने