आता व्हॉट्सअॅप पेमेंट द्वारे पैशाचा व्यवहार करा, मेसेज पाठविणे यापेक्षाही अधिक सोपं
व्हॉट्सअॅप हे अॅप जगभरात वापरले जाते. जवळपास प्रत्येक मोबाईल मध्ये हे अॅप इंस्टॉल आहे. आपल्याला तर माहित आहे की व्हॉट्सअॅप दर काही आठवड्यांनी नव-नवीन फिचर्स लॉन्च करत असतो. आणि आता व्हॉट्सअॅपने एक नवीन पेमेंट्स हे फिचर लाँच केले आहे. हे फिचर अँड्रॉइड आणि आयफोन या डिव्हाइस वर उपलब्ध केले आहे.
व्हॉट्सअॅप चे नवीन पेमेंट फिचर Whatsapp new features in marathi
व्हॉट्सअॅप हे फेसबुक च्या मालकीची कंपनी आहे. आणि आता व्हॉट्सअॅप जगातील सर्वात मोठ्या खुल्या टेक्नॉलॉजीच्या बाजारपेठेत आपली 'यूपीआय पेमेंट्स सर्व्हिस' वापरण्यासाठी देत आहे. व्हॉट्सअॅप कंपनीने ट्विट करून सांगितले आहे की भारताचे यूजर्स व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पैसे पाठवू शकतील. ही पेमेंट करण्याची एक सुरक्षित पद्धत असून, पैसे पाठवणे एकाद्या मेसेज पाठविण्याइतकेच सोपे आहे. या पेमेंट फिचर ला वापरण्यासाठी नैशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया National Payments Corporation of India (NPCI) यांनी मंजुरी दिली आहे.
Whatsapp payment फिचर काय आहे?
तर ही एक यूपीआय-आधारित व्हॉट्सअॅपची पेमेंट सर्व्हिस आहे. याच्या माध्यमातून यूजर्स त्यांच्या बँक अकाऊंट ला लिंक करून पैसे पाठवू किंवा घेऊ शकतात. हे पेमेंट सर्व्हिस वापरण्यासाठी यूजर्स कडे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे. आणि आपण जे आपल्या बँक ला मोबाईल नंबर लिंक केला आहे त्या नंबरचे व्हॉट्सअॅप अकाऊंट असणे गरजेचे आहे. तरच आपण या व्हॉट्सअॅप पेमेंट फिचर ला वापरु शकतो. व्हॉट्सअॅप पेमेंट हे जवळपास सर्व बँकांना सपोर्ट करते. त्यामुळे पेमेंट करण्यास आपल्याला काहीही अडथळा येणार नाही.
व्हॉट्सअॅप पेमेंट फिचर कसे अॅड करावे?
हे फिचर वापरण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपले व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागेल. अपडेट केल्यानंतरही जर आपल्याला हे पेमेंट फिचर मिळाले नसले तर नाराज होऊ नका, कारण आताच्या वेळेत व्हॉट्सअॅपचे जवळपास चाळीस दशलक्ष यूजर्स आहेत. आता व्हॉट्सअॅपने वीस दशलक्ष यूजर्स ना हे व्हॉट्सअॅप पेमेंट फिचर रोल आउट केले आहे. आणि जे बाकी राहिलेले यूजर्स आहेत त्यांना पण काही दिवसांनी हे फीचर मिळायला लागेल.
या ट्रिक ने आपण व्हॉट्सअॅप पेमेंट फिचर मिळवू शकता.
आपल्या ज्या पण मित्रांना किंवा नातेवाईकांना हे पेमेंट फिचर मिळाले आहे त्यांना तुम्हाला notify करायला सांगा. यामुळे आपल्याला एक मॅसेज येईल, मॅसेज आल्यानंतर आपण या फीचर ला वापरू शकाल.
व्हॉट्सअॅप पेमेंट फिचर कसे वापरावे?
हे वाचा ➡️आता व्हॉट्सअॅपवरुन सुरक्षित पैसे पाठवता येणार... जाणून घ्या संपूर्ण माहिती
सर्वप्रथम व्हॉट्सअॅप उघडा >> उजव्या साइड च्या वरच्या तीन डॉट वर क्लिक करा >> Payments >> Add payment method
व्हॉट्सअॅप पेमेंट फिचर मधून पैसे कसे पाठवावे?
ज्याला पैसे पाठवायचे त्याला सिलेक्ट करा >> Attachment आयकॉन वर क्लिक करा >> Payment वर क्लिक करा.
ईथे आपण दोन प्रकारे पैसे पाठवू शकतो.
1. ज्या यूजर्स ने व्हॉट्सअॅप मध्ये बँक लिंक केली आहे त्या यूजर्स ला पैसे पाठवू शकतो.
2. UPI ID द्वारे पैसे पाठवू शकतो.
मला आशा आहे की, आपल्याला व्हॉट्सअॅप चे नवीन पेमेंट फिचर Whatsapp new features in marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला व्हॉट्सअॅप पेमेंट फिचर कसे वापरावे? व्हॉट्सअॅप पेमेंट फिचर मधून पैसे कसे पाठवावे? हे समजलेच असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना किंवा फेसबुक आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻