मोबाईलच्या बॅटरी बद्दल काही खास माहिती जी आपल्याला माहीत असलीच पाहिजे!
आजच्या काळामध्ये स्मार्टफोन ही प्रत्येकाची गरज बनली आहे, प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो. प्रत्येक व्यक्तींकडे स्मार्टफोन आहे. माझ्या मते तर प्रत्येक घरांमध्ये माणसांपरत एक स्मार्टफोन आहे. आणि हर एक घरांमधे कमीत-कमी चार ते पाच स्मार्टफोन आहेत. आजच्या फोनमध्ये आपल्याकडे चांगल्या वैशिष्ट्यांसह चांगली बॅटरी आहे. पंरतु काही कारणांमुळे आपल्या स्मार्टफोन च्या बॅटरी चा परफॉरमेंस कमी होतो. ज्यामुळे आपल्याला पाहिल्यासारखा बॅटरी बॅकअप मिळत नाही. तर आजच्या पोस्टमधे आपल्या मोबाईलच्या बॅटरी चे आयुष्य कसे वाढवावे? आपल्या स्मार्टफोन चि बॅटरी कशी improve करावी याबद्दल पाहणार आहोत.
Smartphone battery life improve tips in marathi
मित्रांनो जर आपण एक फोन एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ वापरला असेल तर कदाचित आपल्या अलक्षात आले असेल की, जेव्हा आपला फोन नवीन होता त्यावेळेस चा बॅटरी बॅकअप आणि एक ते दीड वर्ष फोन वापरल्या नंतर चा बॅटरी बॅकअप यामधे आपल्याला फरक दिसला असेल.
आपल्या मोबाईलची बॅटरी खूप लवकर कमी होते आणि आपण पुन्हा पुन्हा फोन चार्जिंग करता आपल्याला आपल्या स्मार्टफोन च्या बॅटरी चे आयुष्य वाढवायचे आहे, जास्तीत जास्त आपल्याला फोन बॅटरी सेव्ह करायची आहे. अशा काही टिप्स आहेत ज्या आपण आपल्या मोबाइल बॅटरी चे आयुष्य वाढण्यासाठी फॉलो करू शकता.
मोबाइल फोन चार्ज कसा करावा? मोबाईल चार्जिंग समस्या समाधान
1. मोबाईल चार्जिंग करण्याची सवय
मोबाईल जास्त वेळ चार्जिंग ला लावू नका. बहुतेक लोक झोपेच्या वेळी आपला फोन चार्जिंग ला लावतात त्यामुळे रात्रभर फोन चार्जिंग होत राहतो. असं अजिबात करू नका. कारण असं केल्याने बॅटरी वर जास्त दबाव पडतो आणि बॅटरी लवकर खराब होते. मोबाईल चि बॅटरी कधीही फुल चार्ज करू नये. बॅटरी नेहमी 85% इतकीच चार्ज करावी.
2. आपल्या मोबाईलची बॅटरी कधीही पूर्णपणे कमी होऊ देऊ नये. कारण जेव्हा आपल्या स्मार्टफोनची बॅटरी डिस्चार्ज होते तेव्हा बॅटरी सेलवर पुन्हा रीचार्ज करण्यासाठी अतिरिक्त दबाव पडतो. म्हणुन जेवढं का होईना आपल्या स्मार्टफोनची बॅटरी चार्ज पूर्णपणे संपण्याअगोदर आपला फोन चार्ज केला पाहिजे.
3. जेव्हा जेव्हा आपण आपला फोन चार्जिंग करण्यासाठी लावतो तेव्हा आपल्या फोन चे कव्हर काढून टाकले पाहिजे. बर्याचदा बहुतेक लोक आपल्या मोबाईलच्या कव्हरसह मोबाईल चार्जवर ठेवतात परंतु हे कव्हर्स मोबाईलची बॅटरी खराब करतात कारण ते बॅटरीची उष्णता काढून टाकत नाहीत, म्हणून मोबाइल चार्ज करताना अतिरिक्त कव्हर काढून टाकले पाहिजे.
4. Don't Use Your Phone On Charging
5. आपला स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी नेहमीच मूळ(original) चार्जर वापरा. आपल्याकडे चार्जर नसेल तर original चार्जर विकत घ्या. कमी किमतीचे चार्जर विकत घेऊन पैसे वाचवू नका. कारण प्रत्येक चार्जर चा स्वतःचा एक आउटपुट असतो. आणि जेव्हा आपण कमी आउटपुट किंवा जास्त आउटपुट वाला चार्जर वापरुन आपला फोन चार्ज करतो तेव्हा आपल्या फोनची बॅटरी खराब होण्यास सुरवात होते. आपल्या स्मार्टफोनचे चार्जर विशिष्ट एम्पीरेज द्वारे दर्शविले जाते; आणि आपल्याला खरोखर दुसरे चार्जर वापरायचे असल्यास, नेहमी चार्जर चा व्होल्ट्स आणि एम्प्स तपासून वापरा.
हे पण वाचा ➡️ मोबाईल ची बॅटरी कशामुळे फुगते?
मला आशा आहे की, आपल्याला मोबाईलच्या बॅटरी चे आयुष्य कसे वाढवावे? Mobile battery life improve tips in marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला मोबाइल फोन चार्ज कसा करावा? हे समजलेच असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना किंवा फेसबुक आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻