टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य - टायगर ग्रुप चे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव (Tanaji Bhau Jadhav)

मित्रांनो नक्कीच आपण टायगर ग्रुप हे नाव ऐकले असेल. तर याच टायगर ग्रुप चे अध्यक्ष म्हणजे पै. तानाजी भाऊ जाधव (tanaji bhau jadhav). तर या पोस्टमधे आपण पै. तानाजी भाऊ जाधव यांची आणि यांच्या टायगर ग्रुप Tiger Group Maharashtra विषयी माहिती जाणून घेणार आहोत...


टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य - टायगर ग्रुप चे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव (Tanaji Bhau Jadhav)

Tiger group maharashtra tanaji bhau jadhav information


महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप चे अध्यक्ष पै. तानाजी भाऊ जाधव यांचा जन्म 2 नोव्हेंबर ला सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या गावी झाला. लहानपणी तानाजी भाऊ जाधव यांना नवनवीन मित्र जोडण्याची आणि तालमीत जाण्याची आवड होती. त्यांचं स्वप्न होत की, त्यांना मोठेपणी पैलवान व्हायचं. मोठेपणी त्यांनी हे स्वप्न पूर्ण केले. जेव्हा तानाजी भाऊ शाळेत होते तेव्हापासून त्यांनी मित्रपरिवार जोडायला सुरूवात केली.


2008 या साली टायगर ग्रुप ची स्थापना त्यांचा मोठा भाऊ जालिंदर जाधव यांनी केली. जालिंदर जाधव म्हणतात की, "गोरगरिबांची सेवा, मदत करणे" हाच आमचा धर्म.


टायगर ग्रुप ची स्थापना झाल्यानंतर त्यांनी अनेक नवनवीन मित्रपरिवार जोडून एकत्र आणले आणि बघता बघता त्यांचा एवढा मित्रपरिवार वाढला की, महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर पण त्यांचे आणि त्यांच्या टायगर ग्रुपचे अनेक चाहते झाले.

पै. तानाजी भाऊ जाधव हे अनेक युवकांचे प्रेरणास्थान झाले आहेत.


टायगर ग्रुप च्या माध्यमातून त्यांनी बरीच महत्त्वाची कार्य केली आहे. तसेच ते ग्रुप च्या माध्यमातून लोकांचे वैयक्तिक प्रश्नही सोडवतात. आतापर्यंत त्यांनी बऱ्याच लोकांना नौकरीवर लावले आहे.


➡️टायगर ग्रुप सदस्य नोंदणी अशी करा.


तानाजी भाऊ जाधव हे सदैव समाजसेवा करणारे आणि मदतीसाठी सदैव तयार असणारे असे हे दिलदार व्यक्ती आहेत. त्यांचा दिलदार स्वभाव असल्यामुळे ते कायम चर्चेत असतात.


टायगर ग्रुप च्या साहाय्याने लोकांच्या अडी-अडचणी दूर करणे, गोर गरीबांची मदत करणे, आणि मित्रपरिवार वाढवणे यासाठी ह्या ग्रुपची स्थापना करण्यात आली होती.


टायगर ग्रुप हा मदत करण्याची भावना मनात रुजवण्याचे काम करतो.


टायगर ग्रुप ने गोरगरिबांना गहू, तांदूळ शिक्षणासाठी शाळेत वह्या अश्या वस्तू दान केल्या आणी नेहमीच ते अश्या प्रकारची समाजकल्याणाची कामं ते या ग्रुप च्या माध्यमातून करत असतात.

आता काही दिवसांपूर्वी तानाजी भाऊ जाधव यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल गोवा येथे नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार व अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पिस या विद्यापिठाची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.


तानाजी भाऊ जाधव पुरस्कार

जगातील नामांकित असा नेल्सन मंडेला नोबेल शांतता पुरस्कार मला मिळालेली डॉक्टरेट पदवी मी माझ्या तमाम टायगर ग्रुप च्या कार्यकर्त्यांना समर्पित करत असून या मिळालेल्या पुरस्कारामुळे इथुन पुढील काळात जास्त वेगाने मदतीचे आणि समाजसेवेचे कार्य करू असा विश्वास तानाजी भाऊ जाधव यांना व्यक्त केला.


तानाजी भाऊ जाधव यांचा हा मैत्री चा प्रवास एका छोट्या गावातून सुरु झालेला आता हळूहळू संपूर्ण भारत भर पसरत चाललेला आहे.


वाचा

➡️डॉ. ए पी जे अब्दुल कलाम माहिती

➡️छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास

➡️नरेंद्र मोदी माहिती 

➡️महात्मा गांधी निबंध मराठी


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने